Login

स्वतः चा खर्च भाग 3

स्वतः चा खर्च स्वतः उचला
स्वतः चा खर्च भाग 3
स्वतः उचला.

©️®️शिल्पा सुतार

रात्री ती झोपायला आली. तिने मोहन जवळ बोलून दाखवलं. त्याने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. नेहमीच होतं. स्वतः आई-वडिलांचा विषय त्यांना ऐकू येत नाही. त्यात चूक दिसत नाही.

"अहो मी पुढच्या आठवड्यात आईकडे जाणार आहे ताई येणार आहे. आमच्या सगळ्यांचे जमायचं ठरलं आहे." अनघा कपड्यांच्या घड्या घालत म्हणाली.

"जाऊन ये."

"आधीच सांगून ठेवलं. मला तेव्हा पाच हजार रुपये लागणार आहेत."

"एवढे काय करणार आहेस?"

" सगळे जमले की लागतात. आईला साडी घेणार आहे. तिचा वाढदिवस आहे. "

"एवढे जमणार नाही. दोन हजार रुपये देतो. " मोहन म्हणाला.

"तुमचं नेहमीचच आहे. माझा नंबर असला की खर्च नको असतो. " अनघा म्हणाली.

" तुला काय म्हणायचं आहे? "

" घरचे इतर लोक काही मागतात तर तुम्ही काही म्हणत नाही. मला नेहमी काटकसर करायला सांगतात. आणि आज तुम्ही वरदच्या खाऊ वरून ही किती ओरडले." अनघा म्हणाली.

" हे अस बोलायच नाही अनघा. ही बचत कोणासाठी चालली आहे. आपल्यासाठी ना ." मोहन म्हणाला.

" याला काय अर्थ आहे? मन मारून जगायचं. बचत महत्त्वाची आहे पण एका लिमिट पर्यंत. अगदी हे घ्यायचं नाही, ते घ्यायचं नाही. इकडे जायचं नाही तिकडे जायचं नाही. उमेदीचे वर्षे गेल्यानंतर भरपूर पैसा हातात टिकून काय उपयोग आहे. तुम्ही मला तुमचा खर्च सांगत नाही. पगार सांगत नाही. फक्त सगळ्या गोष्टीवर रोखठोक मला हे चालणार नाही. "

मोहन काही म्हणाला नाही. तिला गावाला जातांना तीन हजार रुपये दिले. अनघा बस मधे विचार करत होती हे अस आयुष्य मला नकोय. याला काय अर्थ आहे. किती ती लाचारी मी सुद्धा हुशार आहे. माझं मला बघायला हवं.

ती आईकडे जावून आली. तिला थोड बर वाटत होत. परत नेहमी प्रमाणे रूटीन सुरू झालं. तिने आज सामान घ्यायला पैसे मागितले नेहमी प्रमाणे मोहन चिडला होता. तिने विषय पुढे वाढवला नाही.

मोहन संध्याकाळी घरी आला. स्वयंपाक झालेला नव्हता. मालूताईंनी कंप्लेंट केली.

"अनघा काय सुरू आहे? स्वयंपाक का झाला नाही?"

"मी सकाळी सांगितलं होत सामान नाही. किराणा संपला भाजी संपली. तुम्ही चार गोष्टी ऐकवल्या. मी आता काही करणार नाही. बाहेरून जेवण घ्या."

"खिचडी करायला ही काही नाही का? एवढं सामान संपल?" मोहन विचारत होता.

"खिचडी होईल पण त्यात टाकायला काही भाज्या नाहीत. तुम्हा लोकांना आवडत नाही. परत जेवतांना नाराजी. "

" कढी खिचडी कर. मी बाकी किराणा आणतो. "

" हो थोड्या वेळाने करते." अनघा खाली फिरायला निघून गेली.

मोहन दुकानात गेला. सगळं सामान घेतलं. भाजी घेतली. तो घरी आला. तिने बिल बघितल त्याला साडे तीन हजार रुपये लागले होते.

मोहनला धडा मिळाला होता.

मी आता यांना सामान आणायला सांगत जाईल. उगीच हे का आणलं ते का आणलं नकोच. यांनी सामान आणलं तर स्वयंपाक करत जाईल. ती विचार करत होती.

" मी तुला दर महिन्याला एक ठराविक रक्कम देत जाईल. त्यात घर चालव आणि तुझे खर्चही कर. " मोहन रात्री तिला म्हणाला.

" चालेल मी उद्या हिशोब करून सांगते." अनघाने पूर्ण हिशोब केला. किराणा, भाजी, खाऊ, येणं जाणं. मोहनला रक्कम सांगितली. त्याने होकार दिला. तिला कसतरी वाटत होत. काय करणार काय परिस्थिती आली आहे. ती नाराज होती.

दुसर्‍या दिवशी ती नेहमी प्रमाणे फिरायला गेली. ती बाकावर बसली होती. काय कराव अस झाल होतं. स्वाती दिसली.

" काय ग स्वाती कुठे निघालीस? इतकी काय घाई आहे?"

" अग मला नोकरी लागली. आवरायच बाकी आहे. चल मी घाईत आहे. संध्याकाळी भेटू."

" किती छान." अनघा म्हणाली.

"प्रत्येकाने काही तरी करायला हव ग. आधी मी काहीच करत नव्हते घरचे गृहीत धरत होते. मग मी सगळं बाजूला ठेवल. आता माझी छान नोकरी आहे. निदान स्वतःचा खर्च तरी स्वतः करते. चल मी निघते आवरायचं आहे."

अनघा विचार करत होती मला ही काहीतरी करायला हवं. नुसत घरच्यां पुढे हात पसरवणं सुरू आहे. ती घरी येत होती.

स्वातीने ब्लाऊज किती छान घातला होता. ती डिझाईन तिच्या मनात बसली होती. तिने मोबाईल वर अजून डिझाईन बघितल्या तिला एकच उत्साह आला. यात नक्की काहीतरी करता येईल.

तिने तिची शिलाई मशीन बाहेर काढली. ब्लाऊज पीसच्या गठ्यातून एक ब्लाऊज पीस घेतला. यू ट्यूब वर बघून अतिशय सुंदर ब्लाऊज शिवला. नवीन डिझाईनचा. आधी ती कधीतरी स्वतः चे ब्लाऊज शिवत होती. मला अजूनही हे काम येत. तिला खूप छान वाटत होतं. ब्लाऊजचे फोटो काढून तिने मैत्रिणींच्या ग्रुप वर टाकले. खूपच लाईक मिळाले. दोन तीन बायकांनी चौकशी ही केली. पहिल्याच दिवशी ऑर्डर ही मिळायला लागल्या.

तिने एक वहि घेतली त्यात ऑर्डर लिहून घेतल्या. तारखे प्रमाणे मैत्रीणींना ब्लाऊज कधी मिळेल ते सांगितलं. तिने संध्याकाळी उत्साहात स्वयंपाक केला.

🎭 Series Post

View all