Login

स्वतःची ओळख भाग १

आजवर छोटीशी कंपनी म्हणून कोणाच्या खिजगीणतीतही नव्हती, त्याच कंपनीची चर्चा आता मोठ मोठ्या कंपनीही करायाला लागल्या होत्या. पण ज्याच्यामुळे हे सगळ घडल होत. तो मात्र स्वतःच्या सावळ्या रंगाला पकडून बसला होता.
स्वतःची ओळख.

पूर्ण ऑफिसमध्ये टाळ्यांचा कडकडाट होत होता. अशोकने स्वतःच्या प्रेझेन्टेशनने त्यांच्या कंपनीसाठी भारतातील एका खूप मोठ्या नामाकिंत उद्योगाचा एक महत्वाचा प्रोजेक्ट त्या कंपनीसाठी ओढून आणला होता. ज्याच्यासाठी जवळपास पंधरा ते वीस नामांकित कंपन्यांनी त्यात भाग घेतला होता. आजवर त्या कंपनीचा एकही प्रोजेक्ट ह्यांच्या कंपनीला मिळाला नव्हता. तो आज अशोकने ओढून आणला होता. पूर्ण ऑफिस त्याच खूप कौतुक करत होत.

पण त्या कंपनीचा बॉस सावंत, तो मात्र जरा नाराज होऊन बसला होता. कारण ह्या प्रोजेक्ट येण्यामागचं खर श्रेय अशोकचं नव्हतचं. त्याने फक्त जाऊन प्रेझेन्टेशन दिल होत.

हे पूर्ण प्रेझेन्टेशन त्याने एकट्यानेच तयार केल होत. ते तयार करताना त्यातल्या एक एक बारीक गोष्टींवर विचार केला गेला. त्याच्या कंपनीची कमजोरी त्या कंपनीच्या सकारात्मक बाबींनी पूर्ण लपवली गेली. एखादा अनुभवी माणूसही कल्पना करू शकणार नाही अश्या गोष्टी त्यात मांडल्या गेल्या. पण जेव्हा हे प्रेझेन्टेशन मांडण्याची वेळ आली तेव्हा नेमका तो मागे राहीला आणि नाईलाजाने अशोकला त्यासाठी पाठवावं लागल.

थोड्याचवेळात त्यांच सेलिब्रेशन झाल आणि ते सगळेच ज्यांच्या त्यांच्या कामाला लागले. सावंतने अशोक आणि त्याला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले. तसा अशोक आणि तो पुढच्या काही मिनिटात तिथे येऊन पोहोचले. नेहमीप्रमाणे अशोक त्याला भांडतच त्यांच्या केबिनमध्ये आला होता.

“मागच्या जन्मात नवरा बायको होते का तुम्ही?” सावंत नाराज होऊन विचारू लागला.

“सॉरी” अशोक त्याच्याकडे आठ्या पाडून बोलला.

“सॉरी सर.” तो त्याची मान खाली घालून बोलला.

“आज ज्या टाळ्या अशोकसाठी वाजल्या ना त्या तुझ्यासाठी पण वाजल्या असत्या.” सावंत त्याच्याकडे बघून कडक आवाजात बोलू लागले. “असा कसा रे तू क्षितीज? अरे किमान तुझ्या नावाची तरी काहीतरी जाण ठेव रे.”

क्षितीज मात्र गपचूपच उभा राहीला.

“म्हणून मी याला भांडतो.” अशोकही जरा वैतागूनच बोलला.

“आता तुझा मित्र तुझ्या सोबत आहेस म्हणून ठीक आहे.” सावंत त्याला समजावत बोलले. “नाहीतर ह्या क्षेत्रात किती चढाओढ असते? किती एकमेकांचे पाय खेचायचे प्रयत्न चालू असतात? ते तुला चांगलच माहिती आहे की. कोण्या दुसऱ्या ठिकाणी असतास तर आतापर्यंत तुझा वापर करून तुला कुठे फेकून दिल असतं ना तरी तुला समजलं नसतं.”

आज सावंत खूपच रागाला आले होते. जे त्यांच्या ह्या कंपनीला मागच्या पाच ते दहा वर्षापासून जमलं नव्हतं ते आज क्षितीजने करून दाखवलं होत. पण ज्याने केल त्याच श्रेय त्यालाच भेटलं असत तर सावंतला खूपच आनंद होणार होता. त्याची संधी दुसरी कोणी घेऊ नये म्हणून सावंतने अशोकला घाईघाईत बोलवून घेतले होते. तो बिचारा तर त्याची सुट्टी मजेत घालवत होता. पण फक्त क्षितीजसाठी तो धावत आला होता.

तो क्षितीज, मध्यम उंचीचा. जरा सावळ्या रंगाचा. अतिशय हुशार. पण त्याचा रंग त्याच्या हुशारीला मागे लोटत होता. म्हणजे तो स्वतःच त्याच्या हुशारीला मागे लोटत होता. कामाचा म्हणाल तर अतिशय परफेक्ट.

जेव्हापासून त्या छोट्याश्या कंपनीमध्ये काम करायला लागला. तेव्हापासून मोठ मोठ्या कंपनीच्या ऑर्डर्स त्यांना मिळायला लागल्या होत्या. जेव्हा की त्याला कामाचा अनुभव नसताना फक्त त्याच्याकडे असणाऱ्या डिग्रीच्या भरोशावर आणि अशोकच्या सांगण्यावरून त्याला तिथे कामाला ठेवलं होत. त्याच्यावर ठेवलेला विश्वास क्षितीजने सार्थ ठरवत फक्त वर्षभरातच त्यांच्या त्या छोट्याश्या कंपनीचा प्रगतीचा आलेख उंचावायला घेतला होता.

आजवर ती छोटीशी कंपनी म्हणून कोणाच्या खिजगीणतीतही नव्हती, त्याच कंपनीची चर्चा आता मोठ मोठ्या कंपनीही करायाला लागल्या होत्या. पण ज्याच्यामुळे हे सगळं घडलं होत. तो मात्र स्वतःच्या सावळ्या रंगाला पकडून बसला होता.

त्यातल्या त्यात एक गोष्ट चांगली होती की त्याचा बॉस सावंत आणि त्याचा मित्र अशोक हे चांगल्या स्वभावाचे होते. म्हणून तो आज त्या कंपनीत बिनधास्त होऊन काम करत होता. पण हे किती दिवस चालणार होत? आज ना उद्या कंपनीचा विस्तार होणार होता. तेव्हा त्याच्यावर जबाबदारी वाढणार होती. एकदा का त्याला वाटणारा तो कमीपणा दूर झाला. तर त्याचा हात कोणीही पकडू शकणार नव्हत आणि असा एमप्लोयी प्रत्येक बॉसला हवाच असतो की. म्हणूनच क्षितीजसाठी आता काहीतरी वेगळा उपाय काढण्याचे त्यांनी ठरवले होत.

कारण आताही क्षितीज शांतपणे मान खाली घालून ऐकत राहीला होता.

“का सा मागे राहतो तू?” सावंतने आज सगळच फायनल करायचं ठरवलं होत. “तू हुशार आहेस, तुझ्याकडे स्किल आहे. मग असा काय प्रोब्लेम आहे की तू पुढे येत नाहीस?”

तरी तो गप्पच होता. मग अशोकने सावंतकडे पाहिलं आणि त्यांना नजरेनेच आश्वस्त केल की तो त्याच्याशी बोलून घेईल. मग सावंतने त्या दोघांनाही तिथून जायला सांगितलं. तस ते दोघेही तिथून बाहेर पडले.

ते दोघे गेल्यानंतर सावंतचा मित्र शशी तिथे येऊन पोहोचला आणि इकडे सावंतने दीर्घ श्वास सोडला. कारण तो कशासाठी आला होता? ते त्याला चांगलच माहिती होत.

“काय गरज आहे असे उपद्व्याप करायची?” शशी त्याच्या कपाळावर आठ्या पाडत बोलला. “आजचा प्रोजेक्ट जाता जाता राहीला.”

“पण आला ना.” सावंत मंद स्मित करत बोलला.

“पण स्वतःची ती मोठी कंपनी सोडून तुला ह्यात काय मिळत रे?” शशी पुरता गोंधळून गेला होता.

“समाधान.” सावंतच्या चेहऱ्यावर अजूनही ते मंद स्मित झळकत होत. “आधीच खूप काही कमवलेल आहे. अजून किती कमवू रे?”

“तुझी फिलॉसॉफीच मला समजत नाहीये.” शशी चिडून बोलला. “इथे प्रत्येक जण अजून प्रगती कशी करता येईल? अजून पैसे कसे कमावता येतील? याच्यामागे लागलेले आहेत आणि एक तूझ काय चालू आहे? अशाने ती कंपनी पडायला वेळ लागणार नाही.”

क्रमशः

अष्टपैलू लेखन स्पर्धा.
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all