Login

स्वतःची ओळख भाग २

“तुझ्यात क्वालिटी नाही” अशोकने प्रश्नार्थक विचारलं. “आज जो प्रोजेक्ट आला आहे ना. तो गेले दहा वर्ष झाले तो आणायचा प्रयत्न चालू होता. तो आज तू बनवलेल्या प्रेझेन्टेशनमुले आपल्याला मिळाला आहे. तरीई तुला वाटत की तुझ्यात क्वालिटी नाही?”
मागील भागात आपण पाहीले की सावंतचा त्याचा मित्र शशी भेटायला आला होता. तो सावंतच्या वागण्यात कारण त्याला विचारू लागला होता.

आता पूढे.

“मग मी तुला कशाला तिथे ठेवलं आहे?” सावंत खुर्चीला रेलून बसत बोलला. “काहीच दिवस.”

“आणि ही पण कंपनी कोणाच्या तरी नावे करून पुढची कंपनी टाकायला मोकळा, नाही का?.” सावंत पुढे काही बोलण्याआधीच शशी बोलून मोकळा झाला.

तस सावंतला अजूनच हसायला आलं. “नावावर नाही रे. पण एखाद्या चांगल्या व्यक्तीला ह्या कंपनीचा सीईओ बनवेल. तशीही ही आपल्या मुख्य कंपनीची ही ब्रांचच असणार आहे.”

“मग तू तुझी ओळख का लपवून करत आहेस?” शशी

“कसं आहे ना, की इथे फायदे बघून स्वतःच्या स्वार्थासाठी चांगले वागणारे खूप आहेत. ज्याला आपण ओळखूही शकत नाही.” सावंत गंभीर होऊन बोलला. “त्यात हे क्षितीज सारखे मुल मागे फेकले जातात. खूप टॅलेंट आहे आपल्या देशात. तेच मला बाहेर आणायचे आहे.”

“पण तूच का हा ठेका घेतला आहे?” शशी जरा चिडूनच बोलला. “आणि अश्या किती जणांना तू मदत करत रहाशील?”

“जेवढ शक्य आहे तेवढ्या.” सावंतच्या चेहऱ्यावर एक निश्चय झळकत होता.

“पण माझ्या पहिल्या प्रश्नाच तू उत्तर दिला नाहीस.” शशी त्याला आठवण करून देत बोलला.

तर दुसरीकडे अशोकने क्षितीजला चहा पिण्यासाठी बाहेर नेल होत. जेणेकरून बॉससमोर नाही पण किमान त्याच्यासमोर तरी तो व्यक्त होईल. असही क्षितीजला तिथे जॉईन होऊन फक्त दीड वर्षच झाल होत. त्याला त्याच्या कॉलेजलाही काही मित्र नव्हते. जे पण होते ते फक्त त्यांच्या अभ्यासातल्या अडचणी सोडविण्यासाठीच होते. त्याव्यतिरिक्त मनापसून जवळचा मित्र असा कोणीही नव्हता. घरी आई, वडील आणि एक लहान बहिण इतकासा परिवार. वडीलही साधे कारकून होते. म्हणून आपल घर भलं आणि आपल काम भलं यातच धन्यता मानणारे कुटुंब होते.

ह्या कंपनीत कामाला लागल्यावर क्षितीजची अशोकसोबत ओळख झाली होती. ती देखील त्याने स्वतःहून करून घेतली होती. क्षितीजचा मागे मागे राहणारा स्वभाव त्याला समजून गेला होता. म्हणून त्याला जमेल तस तो मदत करत राहायचा.

चहाच्या टपरीवर पोहोचताच अशोकने दोघांसाठी चहाची ऑर्डर दिली.
“आता बोल नक्की काय प्रोब्लेम आहे?” अशोक काळजीने बोलू लागला. “जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत समजणार कस? आणि त्यावर उपाय कसा निघणार? तुला तुझ्या घरच्यांना आहे त्याच परिस्थितीत ठेवायचं आहे का? किमान त्यांचा तर विचार कर.”

“प्रयत्न खूप करतो रे,” क्षितीज गोंधळून बोलू लागला. त्याला आता काय बोलावं तेही समजत नव्हतं. “पण स्वतःला मी स्वतःच कमी समजतो.”

“म्हणजे नक्की कस?” अशोक

क्षितीज विचार करून बोलायला लागला. "माझं मत कोण ऐकणार? मी काय पुढे जाणार माणूस आहे का? माझ्यात नाही ते क्वालिटी."

“तुझ्यात क्वालिटी नाही?” अशोकने प्रश्नार्थक विचारलं. “आज जो प्रोजेक्ट आला आहे ना. तो गेले दहा वर्ष झाले, तो आणायचा प्रयत्न चालू होता. तो आज तू बनवलेल्या प्रेझेन्टेशनमुले आपल्याला मिळाला आहे. तरीही तुला वाटत की तुझ्यात क्वालिटी नाही?”

क्षितीज त्याची मान खाली घालून बोलू लागला. “तरी मला वाटतं की मी पुरेसा नाही."

“हे तुझ तूच ठरवलं आहेस.” अशोक हताश होत बोलला. “तू मोटीव्हेशनल व्हिडीओ बघ. काहीतरी फरक पडेल.”

“बघूया.” क्षितीज उसासा सोडत बोलला आणि दोघेही त्यांचा चहा संपवून कामाला लागले.

तिकडे ऑफिसच्या केबिनमध्ये सावंत बोलता बोलता त्याच्या भूतकाळातल्या आठवणीत जाऊन पोहोचला.

“बर आज सांगतोच.” सावंत हलकेच हसत बोलला. तिथल्या फोनवरून त्यांच्या कॅन्टीनला फोन लावला आणि दोघांसाठी कॉफीची ऑर्डर दिली. शशी आणि त्याची ओळख तर सावंतच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये झाली होती. सावंतच्या वडिलांनी त्याची मुलखात घेऊन त्याला कामावर ठेवलं होत आणि सावंतही नेमकी त्याचवेळेपासून त्यांच्या वडिलांच्या ऑफिसला जॉईन झाला होता.

सावंतच्या वडिलांची कंपनी आधीपासूनच प्रसिद्ध अशी कंपनी होती. एवढा मोठा व्याप सांभाळायचा म्हटल्यावर सावंतच्या सोबत कोणीतरी असावं म्हणून सावंतच्या वडिलांनी शशीची कामाप्रती निष्ठा पाहून त्याला त्यांच्या मुलासोबत उभ राहायला सांगितलं होत. तेव्हापासून शशी हा सावंतच्या पाठीशी भक्कमपणे उभा रहिला होता.

सावंतने बोलायला सुरवात केली. “तुला तर माहितीच होत की मला शाळेपासूनच कशाचीही कमी नव्हती. जे हवं ते सहज मिळायचं. मग मला अस वाटायचं की सगळ काही सोप तर आहे. कष्ट नावाची गोष्ट मला माहितीच नव्हती. शाळा झाली, कॉलेज झाल. मी आहे त्या माझ्याच विश्वात. कसलाच टेन्शन नाही. मस्त खायचं प्यायचं आणि झोपायचं. शिक्षण पूर्ण झाल की बाबांची कंपनी जॉईन करायची.” सावंत त्यांचे ते शाळा आणि कॉलेजचे दिवस आठवून मंद स्मित करत होते.

तोपर्यंत त्यांची कॉफी पण आली. त्या दोघांनी ती घेतली आणि प्यायला सुरवात केली. ती पिता पिता सावंत परत बोलू लागला.

"कॉलेज संपल्या नंतर माझे बाकी मित्र लगेच काम शोधायला लागले. मी मात्र निवांत होतो. निकाल लागेपर्यंत म्हटलं जागून घेऊयात. म्हणून हिंडण, फिरणं चालूच ठेवलं होत. त्यात हॉटेलला जाऊन नुसतच खायचं कामही चालूच होत. पैसा होता ना खिशात. एके दिवशी पार्टी करायची म्हणून सगळ्या मित्रांना एका हॉटेलला बोलावलं. पण एक दोन सोडले तर बाकी तीघ जण मुलाखत आणि कामाची शोधाशोध यामुळे ते यायला नकार देत होते. याचा मला राग आला आणि मी त्यांना जबरदस्ती घेऊन आलो. स्वतःची लाईफ नीट आहे ना म्हणून दुसऱ्याची देखील नीटच असेल हा माझा समज. पार्टी झाली, सगळे आपापल्या घरी गेले. पण दोन दिवसांनी माझा एक मित्र हे जगही सोडून गेला होता.

क्रमशः

अष्टपैलू लेखन स्पर्धा.
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all