Login

स्वतःची ओळख अंतिम भाग

"या आरशात रोज सकाळी बघ आणि स्वतःला तीन गोष्टी सांग – मी योग्य आहे. मी सक्षम आहे. मला विश्वास आहे स्वतःवर." सावंतने तो त्याच्या हातात देत म्हटलं.
मागील भागात आपण पाहीले की सावंत त्याच्या भूतकाळातील गोष्टी शीला सांगायला लागला होता.

आता पूढे.

पार्टीला जबरदस्ती आणल्यामुळे त्याला त्याचा एका मुलाखतीच्या दुसऱ्या फेरीला जायला जमलच नव्हतं. म्हणून त्याला मिळत असणारी नोकरी देखील त्याला गमवावी लागली. एकच तर तो होता त्यांच्या घरात कमावणारा. घरातल्या इतर अनेक समस्या त्याच्यापुढे तोंड वासून उभ्या होत्या आणि एक मी त्याला त्याच्या येणाऱ्या नशिबापासून ओढून घेऊन गेलो होतो. तो एवढा हळवा निघाला की त्याने थेट टोकाचे पाउल उचलले होते. तेव्हा माझे वडील मला खूपच ओरडले. ते माझ्यावर इतके रागवले होते की आमच्याच ऑफिसला मला मुलाखत द्यायला लावून कामाला लावल होत. मला घरातून काढून देत भाड्याच्या घरात राहायला लावलं. मला दिलेल्या पगारातून ते घर मी चालवलं. तेव्हा कुठे मला कष्टाचे महत्व समजले. तेव्हा मात्र मी माझ्या बाबांच्या पायाशी जाऊन खूप रडलो. मी काय केल होत? ते मला समजल होत. मी त्यांची माफी पण मागितली. तेव्हा त्यांनी आमच्याच ऑफिसला कामाला लावलेल्या त्या मित्राच्या बहिणीजवळ जाऊन तिची माफी मागायला लावली. माझ्या चुकीमुळे एक घर उध्वस्त झाल होत. तेव्हा त्यांनीच तिला आमच्या ऑफिसला कामाला लावलं. त्यावेळेसच त्यांच बोलण मला आजही आठवत. ‘आपल्याला सगळ काही दिल आहे. याचा अर्थ असा नाही की ते सगळ्यांनाच दिल आहे. जेवढं गरजेच आहे तेवढं आपण आपल्याजवळ ठेवावं आणि बाकीच लोक कल्याणसाठी वापराव. तेव्हापासून मी सगळ काही शिकायला घेतलं. स्वतः शिकून जो कोणी असा मुलगा किंवा मुलगी दिसेल त्यांना नीट पारखून घेऊ लागलो. थोडा काही प्रोब्लेम असेल तर तो सोडवण्याचा प्रयत्न करून त्याचं आयुष्य स्थिरावण्याचा प्रयत्न करतो. शेवटी हे कोर्पोरेटच जग खुपच स्वार्थी आहे. ज्यात सामान्य एमप्लोयी खूपच भरडला जातोय. तेच मला कमी करायचं आहे. प्रत्येक क्षेत्रात आपली कंपनी उभी करून ही प्रामाणिक मुल त्यांच्या पायावर उभी करायची आहेत. बरीच मूल उच्च पदावर काम करत आहेत. ते देखील अशाच स्वरूपात अश्या मूलांना मदत करत रहातात. तेव्हा वाटत की आपण काहीतरी थोडासा हातभार लावला आहे.”

एवढ सगळ शशी भारावून ऐकत राहीला होता. त्यानेही सावंतचे कष्ट पहिले होते. पण आता त्याचे फळ खायचे सोडून तो गपचूप अशी समाजसेवा का करत होता? हा प्रश्न त्याला पडला होता. ज्याच उत्तर त्याला आज मिळालं होत. त्याच्या वडिलांचे संस्कारच तर होते. जे या स्वार्थी दुनियेत मुलांना उभ करायचं करायचं काम करत होता.
तो त्याच्यासोबत कामाला होता. पण त्यांच्या घरात एवढं सगळ घडून गेल होत. तो त्याचा खर्च देखील स्वतःच करत होता ते बघून त्याला खूपच भरून आल होत.

“आता बघूया हा क्षितीज स्वतःहून किती तयारी दाखवत आहे.” सावंत विचार करत बोलले. “त्याने दाखवली तर त्याला आपल्या मुख्य कंपनीत प्रमोशनवर ट्रान्सफर करून घेऊ.”

“ठीक आहे.” शशी भारावून बोलू लागला. “तुझ्यासारखा विचार प्रत्येकाला जमत नाही. एवढं सगळ करून नामानिराळा राहतोस. त्याच क्रेडीट आज्जीबतच घेत नाही.”

“का घ्यायचं?” सावंत मंद स्मित करत बोलला. “कष्ट त्यांचे आहेत ना.”

“हो पण अश्या संधी तूच देत आहेस ना.” शशी “आजकाल थोड करून भरपूर दाखवलं जात. पण तू तर थोडपण दाखवत नाहीस.”

“काही गरज नाही मला.” सावंत “आपले कर्म लिहिणारा आहे ना त्याच बरोबर लक्ष असत. त्यामुळे मला नाही गरज दिखाव्याची.”

“बरं बाबा, तूच जिंकलास.” शशीने नेहमीप्रमाणे त्याच्यासमोर हात जोडले. “आता ह्या क्षितीजच काय करणार आहेस?”

“बघूया, पण तो हुशार तर आहे.” सावंत “त्याला एकदा चावी देऊन बघतो.”

तस शशी हलकाच हसला आणि नंतर बराच वेळ दोघेही गप्पा मारत बसले.

दुसऱ्या दिवशी सावंतने क्षितीजला दुपारच्या जेवणानंतर त्याच्या केबिनला बोलावून घेतले. क्षितीज समोर बसल्यावर सावंतने त्याचे जुने फोटो काढून त्याच्या समोर ठेवले. क्षितीज ते सगळच गोंधळून पाहू लागला.

एक एक फोटो दाखवताना सावंत त्याला स्वतःची एक मोठी कंपनी असल्याचे ण सांगता बाकी त्यांच्या जुन्या आठवणी सांगायला लागला. तसे क्षितीजला ते सगळचं ऐकून त्याला आश्चर्यच वाटल. तो फक्त अनिमिष नेत्रांनी त्याच्या ह्या बॉसला बघत राहीला होता. शेवटी समोरच्या माणसाने एवढ्या कष्टाने उभी केलेली कंपनी ऐकल्यावर कोणालाही स्फूर्ती चढणारचं की.

“मला सांग,” सावंतने त्याला विचारलं. “माझ्या सुरवातीला तर माझ्याकडे काहीच नव्हतं. पण तुझ्याकडे आता काय काय आहे?”

तसा क्षितीज गोंधळून गेला.

“तुझे स्किल्स सांग.” सावंतने त्याला अजून सोप करून विचारलं.

मग क्षितीजने त्याला येत असणारे सगळेच स्किल सावंतला सांगून दाखवले.

“ह्यातलं मला काय येत होत?” सावंतने पुढे विचारलं.

तसा क्षितीज त्याला फक्त बघत राहीला.

“आपल्याकडे कस आहे ना, जे आपल्याकडे नाहीये त्याकडे आपला जास्त लक्ष जात.” सावंत “तू फक्त तुझ्या न्युनगंडाला धरून बसला आहेस. बाकी सगळी स्किल्स तुझ्याकडे आहेत.” एवढ बोलून सावंतने त्यांच्या बाजूचा एक कप्पा उघडला. त्यातून एक छोटासा आरसा काढला आणि क्षितीजला दिला.

"या आरशात रोज सकाळी बघ आणि स्वतःला तीन गोष्टी सांग, मी योग्य आहे. मी सक्षम आहे आणि मला विश्वास आहे स्वतःवर." सावंतने तो त्याच्या हातात देत म्हटलं.

सुरुवातीला क्षितीजला ते फालतू वाटलं. पण हळूहळू, त्याने ते नियमाने करायला सुरुवात केल्यावर त्यातला फरक त्याला जाणवू लागला. दिवसेंदिवस त्याच्या वागण्यात बदल दिसायला लागले. आवाजात ठामपणा आला. निर्णय घेताना तो आता घाबरत नव्हता. आधीच हुशार असल्याने लोक त्याचं ऐकू लागले होते. हा बदल क्षितीजलाही जाणवला. मग त्यांने स्वतःची ओळख नव्याने करून घेतली.

काही महिन्यांनी त्याच क्षितीजने एक मोठं प्रोजेक्ट स्वतः प्रेझेन्टेशन करून मिळवलं. पहिल्यांदाच करत असल्याने सुरवातीला जरा अस्वस्थ झाला होता. पण नंतर जस जसा त्या प्रेझेन्टेशनमध्ये गुंतला तस तसा त्याच्यातला आत्माविशास अजूनच वाढला आणि त्याने उत्तम यशाची एक एक पायरी चढायला सुरवात केली. नंतर त्यानेही सावंतच्या मदतीने अश्याच गरजू, हुशार आणि प्रामाणिक मुलांना मदत करायला सुरवात केली.

एकदा का प्रेरणा स्थान मिळाल की पुढचे मार्ग आपोआप सापडत जातात.

समाप्त.

अष्टपैलू लेखन स्पर्धा.
कशी वाटली कथा? कमेंट करुन नक्की सांगा.

🎭 Series Post

View all