रिसॉर्टवर पोचताच वातावरणात उत्साह उसळून आला. कुणी स्विमिंग पूलजवळ उभं राहून सेल्फी घेत होतं, कुणी टीम गेम्समध्ये गुंतलेलं होतं. स्त्री, पुरुषांमधली सहज जवळीक, खेळकर स्पर्श, मुक्त हसणं... हे सगळं किरणच्या डोळ्यांसमोर चाललं होतं.
पण तिच्या मनात मात्र वेगळाच चित्रपट सुरू होता.
त्याच्या नजरेतली चमक, हसण्यातली बेफिकिरी, आणि नकळत दिलेला तो ओळखीचा स्पर्श... या सगळ्यांनी तिच्या मनात एक गूढ जाळं विणायला सुरुवात केली होती. ती स्वतःला थांबवायचा प्रयत्न करत होती, पण भावना ऐकत नव्हत्या.
रात्र हळूहळू तरुण होऊ लागली. सामूहिक पिण्याचा कार्यक्रम सुरू झाला. सगळे जण वर्तुळात बसले होते... हसणे, गप्पा, गाणी, विनोद यांनी वातावरण हलकेफुलके झाले होते. किरण मात्र थोडी बाजूला होती. तिच्या हातातला ग्लास तसाच राहिला होता, पण मन मात्र नशेत होतं.
तो समोर बसला होता... उत्साही, मद्याच्या अमलात किंचित धुंद. अधूनमधून तिच्याकडे पाहून हसत होता, ग्रुपमध्ये तो काहीतरी बोलत होता. पण त्याचे शब्द किरण पर्यंत पोचत नव्हते. तसेही तिला ते महत्त्वाचे वाटत नव्हते. ती फक्त त्याच्या चेहऱ्यावरचं तेज पाहत होती... त्याच्या नजरेतून सांडलेले काही तेज ती मनाच्या एखाद्या गुप्त प्याल्यात साठवत होती.
त्या क्षणी तिच्या मनातला स्वार्थ सावलीसारखा वाढू लागला होता.
वोडकाची धुंदी सगळ्यांना ढगाळ करत होती, पण किरणच्या डोळ्यांत वेगळीच धुंदी उतरली होती... प्रेमाची, आसक्तीची, आणि निषिद्ध ओढीची. प्रत्येक सिप बरोबर वास्तवाचा धाक विरघळत चालला होता.
मनात एकच आवाज घुमत होता...
"आज आमच्यात कदाचित काहीतरी घडेल"…
"आज आमच्यात कदाचित काहीतरी घडेल"…
पण तो क्षण आलाच नाही.
रात्र संपू लागल्यावर, वर्तुळातील एक एक थकून विखरू लागले.. तो तिच्याकडे आला आणि सहज म्हणाला,
“किरण, तू झोप आता. थकलीस बहुतेक. मी काही इतक्यात झोपणार नाही.. बाहेरच मित्रांबरोबर राहाणार आहे... काही हवं असेल तर आवाज दे.”
“किरण, तू झोप आता. थकलीस बहुतेक. मी काही इतक्यात झोपणार नाही.. बाहेरच मित्रांबरोबर राहाणार आहे... काही हवं असेल तर आवाज दे.”
त्याने तिचा हात पकडून तिला तिच्या खोलीत झोपवलं, पांघरून काढून दिले.. दार बंद केलं आणि तो बाहेर गेला.
किरणला वाटलं, आता तो थांबेल... निदान घुटमळेल अगदीच नाही तर थोड्याच वेळात परत येईल.
पण तसं झालं नाही.
बाहेर पुन्हा बोल्ड हशा सुरू झाला... गप्पा, मस्ती, बेधुंद विषयांचे जोक्स... आणि किरण मात्र खोलीत एकटी. त्या हशांच्या आवाजात हरवलेली. मन आतून तडफडत होतं. हृदय पिळवटून निघत होतं. ही रात्र कधी संपणार नाही, असंच वाटत होतं. दारावर घट्ट कडी बसली.. आणि त्या क्षणी, कुठलाही आवाज न करता, किरणच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मनाने पाहिलेल्या स्वप्नांची राख झाली होती. विचारांच्या गर्दीत तिचं अस्तित्वच विरघळून जात होतं.
"इतरही देखणे पुरुष आहेत.. मग तोच मला इतका महत्त्वाचा का वाटतो?
मी त्याच्यावर इतकी अवलंबून कधी झाले?"
मी त्याच्यावर इतकी अवलंबून कधी झाले?"
मनाच्या पटलावर प्रश्न उभे होते, पण उत्तर नव्हती. मनाच्या या द्वंद्वात कधी झोप लागली, ते तिलाच कळलं नाही. सकाळ झाली. खिडकीबाहेर पक्ष्यांची चिवचिव सुरू होती. नवा दिवस उजाडला होता. पण किरणच्या मनात अजूनही कालच्या रात्रीचं दाट धुके पसरलेलं होतं.
सकाळचा प्रकाश तिच्या मनापर्यंत पोचत नव्हता. उलट, भावना अधिकच तीव्र होत चालल्या होत्या. त्याला पाहिलं की मन पुन्हा त्याच वर्तुळात गुरफटत होतं. त्याचं एक साधंसं “गुड मॉर्निंग” ऐकून हृदय पुन्हा वेगाने धडधडू लागलं.
त्या रात्री वास्तवाचा धाक गळून गेला होता.
किरणला माहीत होतं... आपल्या मनातील ही भावना एकतर्फी आहे. पण ती थांबत नव्हती. उलट, अधिक खोलवर रुजत चालली होती. हे वादळ काय काय उध्वस्त करेल, हे तिलाच माहीत नव्हतं. पण त्या वेदनेतच तिला त्याचं अस्तित्व जाणवत होतं... आणि कधी कधी.. ही वेदनाच तिला सुखासारखी वाटत होती.
पिकनिक वरून परतल्या पासून तिच्या मनातली शांतता पूर्णपणे उडून गेली होती. अपेक्षा वांझ ठरली होती, पण त्याच वांझ अपेक्षेने मन रक्ताळून टाकलं होतं. तिचं अस्तित्व जणू तुटलेल्या वीणे प्रमाणे झालं होतं... ना सूर सापडत होता, ना ताल.
तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. काही समविचारी मैत्रिणींनी मार्गदर्शन केलं.
“किरण, तू स्वतःलाच दुखावतेयस. तूझे वय आणि त्याचे वय यात खूप तफावत आहे.. यातून काही निष्पन्न होणार नाही.”
“किरण, तू स्वतःलाच दुखावतेयस. तूझे वय आणि त्याचे वय यात खूप तफावत आहे.. यातून काही निष्पन्न होणार नाही.”
तिला ते सगळं समजत होतं. प्रत्येक शब्द सत्य होता. पण मन ऐकत नव्हतं. जणू एखादी अदृश्य शक्ती तिला त्याच दिशेने खेचत होती... जिथे फक्त वेदना होत्या.
मनाचे काही कोपरे फार दुष्ट असतात. तेच तिला मृगजळ दाखवत होते... जिथे काहीच नव्हतं, तरीही सुखाचा आभास होता. अशा मृगजळामागे धावताना कित्येकींची आयुष्यं उध्वस्त झाली आहेत, हे तिला माहीत होतं.
तरीही ती त्यामागे धावत राहिली.
कारण मनात एक वेडी आशा होती...
"कदाचित आपल्या बाबतीत तसे होणार नाही... कदाचित… त्याच्याकडून स्वीकार आला तर?"
"कदाचित आपल्या बाबतीत तसे होणार नाही... कदाचित… त्याच्याकडून स्वीकार आला तर?"
तिचे वागणे.. तिची प्रेमभावना जगाला हास्यास्पद वाटणार होती..
एक वयस्कर स्त्री, आणि एक तरुण पुरुष... हे काय?
एक वयस्कर स्त्री, आणि एक तरुण पुरुष... हे काय?
पिकनिक नंतरची प्रत्येक रात्र तिच्यासाठी असह्य झाली होती. तिला खूप आवडणारं सकाळचं कोवळं ऊन, ऑफिसच्या कामाचा गोंधळ, घरचं साधं जीवन... कशातच मन लागत नव्हतं. मैत्रिणींनी दिलेले सल्ले, सल्लेच राहिले, तिच्याच्याने कृती काही झाली नाही. शरीर जड वाटू लागलं. विचार मंदावले. हृदयाची धडधडही जणू थकली होती.
त्या रात्री तर तिला झोपच लागली नाही. ती रात्र वैऱ्याची होती...
मनात अस्थिरतेचं वादळ उसळत होतं. ते इतकं असह्य झालं की सकाळीच तिने ठरवलं...
"आता पुरे झाले. हा कोंडमारा सहन होत नाही.. आता त्याच्याशी बोलायचंच, काहीही होऊ दे"
"आता पुरे झाले. हा कोंडमारा सहन होत नाही.. आता त्याच्याशी बोलायचंच, काहीही होऊ दे"
फोन हातात घेताना हात थरथरत होता. तळहाताला घाम आला होता. थरथरत्या बोटांनी तिने नंबर डायल केला.
“हॅलो!”
त्याचा आवाज नेहमी सारखाच उत्साही होता. पण किरणचा गळा अडखळला.
त्याचा आवाज नेहमी सारखाच उत्साही होता. पण किरणचा गळा अडखळला.
“मला… मला... तुझ्याशी एकांतात काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. कधी वेळ देशील?”
फोनवर काही क्षण शांतता पसरली. ती काही सेकंदांची शांतता तिला युगासारखी वाटली. त्या शांततेत तिला स्वतःच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते.
“मॅडम काय झालंय?”
त्याचा आवाज थोडासा संभ्रमित होता.
त्याचा आवाज थोडासा संभ्रमित होता.
किरण काहीच बोलू शकली नाही. तिने फक्त खोल श्वास घेतला.
“शनिवारी भेटूया. नीट बोलू,”
तो म्हणाला... आणि फोन ठेवला.
तो म्हणाला... आणि फोन ठेवला.
मोबाईलची स्क्रीन काळी झाली. खोलीत एक पोकळी पसरली. अचानक तिला त्या पोकळीत कुजबुज ऐकू येऊ लागली. ती घाबरून गेली.. सर्वांग घामाने चिंब होऊ लागले... हळूहळू ती कुजबुज शब्दांत बदलली...
“शी! ही अशी आहे तर!”
“चेहेऱ्यावरून किती सोज्वळ वाटते... पण अंतरंगात वेगळेच काहीतरी.”
“आयला आधी कळलं असतं तर…”
“चेहेऱ्यावरून किती सोज्वळ वाटते... पण अंतरंगात वेगळेच काहीतरी.”
“आयला आधी कळलं असतं तर…”
त्या विषारी शब्दांनी तिचं अस्तित्व चिरलं. त्या क्षणी तिला वाटलं... ती एखाद्या गर्दीत उभी आहे आणि सगळे तिच्याकडे बोट दाखवत हसत आहेत. तिने स्वतःकडे पाहिलं... तिच्या अंगावर वस्त्र नव्हती. त्या हसण्यांनी, त्या किळसवाण्या नजरांनी, कानांमध्ये जाणाऱ्या विषारी शब्दांनी तिचं मन कोळसा झाले होते.. भोवळ येऊन ती खाली बसली. सर्वांग थरथरत होते.. तिने डोळे मिटले...
आणि काही क्षण…
काहीच जाणवलं नाही.
क्रमशः
©किशोर तरवडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा