लकी अंतःवस्त्रावर झोपलेला होता. त्याचे ते मोहक मदनरूप पाहून किरणचा श्वास पुन्हा जलद झाला, सर्वांग तापू लागले. नकळत ती पुन्हा त्याच्या बाजूला बसली आणि त्याला नखशिखांत न्याहाळू लागली. गोल चेहऱ्यावरची चमकदार मिशी, त्यातून डोकावणारे गुलाबी ओठ… केसाळ छातीच्या मध्यावरून नाभीकडे उतरणारी कुरळ्या केसांची नक्षी आणि त्यानंतर अजूनही खाली उतरत अंतःवस्त्रात लुप्त होणारा तो रेषांचा मोहक प्रवास…
खोलीत अंधुक पिवळसर प्रकाश पसरला होता. पार्टीचा गोंगाट कधीच संपून गेला होता, बाटल्यांचे रिकामे ग्लास कोपऱ्यात विसावले होते, आणि घरावर एका विचित्र शांततेची चादर पसरली होती. बाहेर रस्त्यावर दूर कुठेतरी एखादं वाहन जात होतं, पण आत… फक्त श्वासांचा मंद आवाज. लकीचा... तो शांत झोपलेला होता आणि त्याला नखशिखांत आपल्या डोळ्यात साठवणारी किरण जागी होती.
तशीच बसून ती त्याच्याकडे पाहत राहिली. त्याच्या झोपेत हालचालींनी तिच्या छातीत उन्माद घुटमळू लागला. तिच्या श्वासाचा वेग नकळत वाढला. इतके दिवस मनात साठलेलं आकर्षण आज अचानक तिच्या समोर 'मांसल' वास्तव बनून उभं होतं.
त्या जिवंत वास्तवाला आपल्यात सामावून घेण्यासाठी तिचे रोमरोम अतुरले होते... परंतु स्वप्नांच्या या उन्मादी दुनियेत असतानाच लकीने पुन्हा कूस बदलली, आणि एक क्षणापूर्वी दिसत असलेलं ते मोहक वास्तव त्या पलीकडच्या अंधारात लपून गेलं. किरणची घोर निराशा झाली. परंतु आता मात्र मनात अंगार फुलू लागला.
“हा पुरुष… ज्याने आपल्या मनावर कब्जा केला आहे. याच्या एका कटाक्षाने माझं अस्तित्व डळमळून जाते. आज मात्र तो इथे आहे… आपल्याच घरात… आपल्याच खोलीत… अगदी बाजूला, नशिल्या झोपेत. ही नशेची पैज आपण जिंकलीच पाहिजे…”
किरण सावकाश त्याच्या बाजूला पहुडली... हळूहळू त्याच्या अगदी निकट सरकत तिने त्याच्या मधील अंतर मिटवून टाकले. क्षणभर आपल्या वाजणाऱ्या श्वासांच्या आवाजालाही तिने दाबून टाकले, जणू स्वतःच्या इच्छेलाही जाग येऊ नये म्हणून.
त्याच्यात आणि तिच्यात प्रकाश रेषेचे अंतर होते... त्याच्या शरीराची धग तिच्या शरीराला जाणवत होती. किरणच्या शरीरात उठलेली बेभान वावटळ गोलगोल फिरू लागली... त्या वावटळीला लकी उडवून न्यायचा होता.
किरणच्या मनात विचारांचा कल्लोळ सुरू झाला.
"हा तोच आहे… ज्याने मला इतकं छळलं… ज्याला माझी कमजोरी समजली… ज्याला माझं प्रेम खेळ वाटलं"…
तिच्या आत राग उसळला. पण त्या रागाच्या आगीतही शृंगाराची फुलं उमलत होती. कारण इच्छा आणि क्रोध यांच्यातली रेषा फारच पातळ असते. ती नकळत त्याच्या जवळ झुकली. त्याच्या शरीरातून येणारी उष्णता तिच्या त्वचेला गोंजारू लागली. त्या उष्णतेत एक वेगळीच नशा होती. तिच्या श्वासात एक गर्द सुगंध मिसळत होता.... पुरुषी... रानटी.... तरीही हवाहवासा वाटणारा मोहक.
किरणने डोळे मिटले. तिच्या आठवणींमध्ये लकीचा दमदार आवाज घुमला. त्याचं भुरळ पाडणारं हसणं. त्याची छेडछाड. त्याची बेपर्वाई आणि स्वतःचं त्या बेपर्वाई समोर वारंवार कमजोर होणं. तिच्या मनात अचानक एक विचार उमटला.
“एकदा… फक्त एकदाच माझ्या मनातील चातकावर या कृष्णमेघाने आपल्या जलाने भिजवले…तर माझ्या मनातली ही तृष्णा कायमची संपेल. मी या जोखडातून मुक्त होईन. मी त्याच्या जाळ्यातून बाहेर पडेन…”
हा स्वतःला दिलेला दिलासा होता की सत्य? किरणलाच कळत नव्हतं. ती एवढंच जाणत होती की आज तिचं मन नियंत्रणाच्या सीमारेषा ओलांडत होतं… लकी झोपेत हलका हलला. त्याच्या श्वासात क्षणभर बदल झाला. किरण थांबली. क्षणभर तिला वाटलं… मागे हटावं. या आगीपासून दूर जावं. पण मग आतल्या गाभ्यातून दुसराच आवाज उसळून आला...
“नाही… नाही! आता थांबायचं नाही. समोर मृगनक्षत्र भरून आलं आहे… आणि तू तृषित आहेस. इतके दिवस तू मागे हटत आलीस. इतके दिवस तू त्याच्यापुढे झुकत आलीस. आज मात्र… आज सत्ता बदलायची आहे.”
ती अलगद त्याच्या कुशीजवळ सरकली...आणखीन जवळ... दोन श्वासांमध्ये अंतर कमी होऊ लागलं. लकीच्या ओठांतून अस्पष्ट सुस्कारा निसटला. तो अजूनही झोपेत होता, पण त्याच्या शरीराच्या आत कुठेतरी जाग येत होती. किरणच्या अंगात मदनज्वर पसरला. तिच्या मनात एक विचित्र विजयाची भावना आली.
“बस… आता माझी पाळी आहे.”
त्या रात्री शब्द संपले. शब्दांना जागा उरली नाही. स्पर्शांनी भाषा घेतली. श्वासांनी संवाद केला. दोन शरीरांमध्ये केवळ इच्छा नव्हती… एक झुंज होती... आकर्षणाची… सूडाची… आणि स्वतःला सोडवण्याची. लकीने नकळत तिला जवळ ओढलं. क्षणभर किरणला वाटलं, ती पुन्हा हरली. पण लगेचच दुसऱ्या क्षणी तिला जाणवलं... ती हरत नव्हती. ती स्वतःच्या आयुष्याचा एक बंद दरवाजा उघडत होती. त्या रात्री जे घडलं. जे फक्त शरीरा पुरतं नव्हतं. ते तिच्या मनाच्या खोल कप्प्यांवर परिणाम करत होतं. लकीचा श्वास वाढला. किरणचं अस्तित्व त्याच्यात मिसळलं. आणि त्या क्षणी किरणला वाटलं...
“हेच तर हवं होतं. हेच तर मला मुक्त करणार आहे.”
अखेर… शांतता उतरली. लकीचा श्वास स्थिर झाला. त्याचं शरीर विसावलं. आणि किरण… किरण अनेक महिन्यां नंतर पहिल्यांदा… पूर्ण शांत झाली. तिच्या मनातली आग विझल्या सारखी वाटली. तिला वाटलं...
“आता ती तगमग संपली... आता माझं आकर्षण संपले.. मी मुक्त झाले.. स्वतंत्र झाले.”
त्या हर्षत ती त्याच्या कुशीत विसावली. डोळे मिटले. मनातला पिळ सुटला. आणि त्या रात्री… किरण गाढ झोपली. पण झोपेच्या दाराशी उभी असलेली सावली अजूनही तिथेच होती… कारण ही कथा इथे संपत नव्हती. ही तर सुरुवात होती.
क्रमशः
किशोर तरवडे
