कधी कधी आपण एखादी ओळ वाचतो आणि क्षणभर थांबतो. कारण त्या एका ओळीत संपूर्ण भावविश्व सामावलेलं असतं. अशाच ओळी निर्माण करणारी एक लेखिका माझ्या आयुष्यात आहे ती म्हणजे माझी प्रिय सखी स्वाती....! स्वाती नक्षत्राप्रमाणेच खरंच खूप गोड आहे. आणि आज तिचा वाढदिवस आहे.
तिच्यासाठी मी काय लिहावं, हेच सुचत नव्हतं, कारण जी स्वतः शब्दांची कलाकार आहे, तिच्यासाठी लिहीणं म्हणजे खूप जबाबदारीची गोष्ट होती.
तिच्या लघुकथा म्हणजे काहीतरी वेगळंच... प्रत्येक कथेत काही न काही संदेश असतो. अगदी वास्तववादी चित्रण आहे तिच्या कथांमध्ये, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या विषयांवर लिहायला तिला आवडतं कधी प्रेमाचं, कधी एखाद्या स्त्रीचं मनस्वी अस्तित्व मांडणारं, तर कधी परीस्थितीवर मात करणारं, तर कधी अगदी साध्या माणसाच्या अनोख्या जगण्यावर भाष्य करणारं. तिची पिठलं भाकरीचं जगणं आणि हरवलेलं माहेर सापडलं या आणि अजून बऱ्याच कथा मनाला खूप भावतात.
ती लिहिते तेव्हा फक्त शब्द उमटत नाही तर ती एखाद्याच्या मनाचा कोपरा उघडते, तिच्या कथा वाचून कधी डोळ्यात अश्रू तरळतात, तर कधी ओठांवर स्मितहास्य येतं.
आज तुझा वाढदिवस आहे स्वाती.....
म्हणून एकच प्रार्थना करते की तुझ्या लेखणीतून अजून असंख्य कथा जन्म घ्याव्यात, त्या कथा वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवाव्यात आणि तुझं स्वप्न कितीही मोठं असो ते तुझ्या शब्दांइतकंच ताकदवान व्हावं आणि पुर्ण व्हावं.
म्हणून एकच प्रार्थना करते की तुझ्या लेखणीतून अजून असंख्य कथा जन्म घ्याव्यात, त्या कथा वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवाव्यात आणि तुझं स्वप्न कितीही मोठं असो ते तुझ्या शब्दांइतकंच ताकदवान व्हावं आणि पुर्ण व्हावं.
तुझा प्रत्येक दिवस नव्या कथेसारखा नवा, सुंदर, आणि मनात घर करणारा असो. वाढदिवसाच्या निमित्ताने एकच सांगेन की तुला थांबायचं नाहीये, तुझ्या अजून खूप कथा वाचायच्या आहे, लघुकथा सोबत दिर्घ कथा सुद्धा वाचायला आवडेल. तुला लेखिका म्हणून खुप मोठं नाव कमवायचे आहे.
तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, शब्दांची जादूगार मैत्रीण तू असंच लिहीत राहा... आम्ही वाचत राहू… मनापासून.
तुझ्यासाठी आज एक कविता लिहावीसी वाटते....
तू लिहिलेल्या लघुकथांमध्ये एक जादू आहे,
कधी न बोललेले भाव सांगणारी,
कधी आठवणींना हलकेच कुरवाळणारी,
तर कधी मनाला विचारात टाकणारी.
कधी न बोललेले भाव सांगणारी,
कधी आठवणींना हलकेच कुरवाळणारी,
तर कधी मनाला विचारात टाकणारी.
प्रत्येक गोष्ट तुझ्या शब्दांत जीव घेत असते,
आणि तुझ्या लेखणीतून
एखादी छोटीशी भावना
एक संपूर्ण जग उभं करत असते.
आणि तुझ्या लेखणीतून
एखादी छोटीशी भावना
एक संपूर्ण जग उभं करत असते.
आज तुझा वाढदिवस –
तुझ्या जीवनातही अशीच काही
गोड, हळवी, आणि खास 'लघुकथा' घडो,
ज्यात असतील हसवणारे संवाद,
आणि शेवटी समाधान देणारा शेवट.
तुझ्या जीवनातही अशीच काही
गोड, हळवी, आणि खास 'लघुकथा' घडो,
ज्यात असतील हसवणारे संवाद,
आणि शेवटी समाधान देणारा शेवट.
तुझ्या लेखणीला अजून उंच भरारी मिळो,
वाचकांची मने तू असंच जिंकत राहो,
आणि प्रत्येक नव्या लघुकथेसोबत
तुझं नाव आणखी झळाळून उठो!
वाचकांची मने तू असंच जिंकत राहो,
आणि प्रत्येक नव्या लघुकथेसोबत
तुझं नाव आणखी झळाळून उठो!
तुझी मैत्रीण..... सौ. रोहिणी किसन बांगर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा