स्वतःसाठी जगा भाग 2

स्वतःसाठी वेळ काढायला हवा
स्वतः साठी जगा भाग 2

©️®️शिल्पा सुतार
.....

दुसर्‍या दिवशी सतीशला बिझनेस ट्रीपला जायच होत. पॅकिंग बाकी होत. सतीश करत होते त्यांची तयारी. पण नीताला समाधान नव्हत. स्वतः भरली पूर्ण बॅग. दुसर्‍या दिवशीची नाश्त्याची तयारी केली. तिला रात्र भर नीट झोप आली नाही. सतीश गावाला गेले. ते आता सात दिवसांनी येणार होते. तिच्या डोळ्यात पाणी होत. तिने चहा ठेवला. मुलांना उठवल. मुल शाळेत गेले.

दिवस भर काय करावे नीताला करमत नव्हते. रात्रीही झोप येईना. तिने उठून दार चेक केल. बाल्कनी बंद आहे का बघितल. मुल झोपले की नाही ते बघितल.

"काय ग आई काय चाललय तुझ? कशाला एवढ टेंशन घेतेस सगळ्या गोष्टीच. झोप आरामात."

" मला आज झोप येत नाही."

"मुव्ही लावून देवू का तुला? बघत बस की आरामात. नाही तर तुला इतर वेळी वेळ नसतो." प्रिया विचारत होती.

"नको मी जाते रूम मध्ये तू स्टडी कर."

सकाळी मुल स्कूल कॉलेजला गेली. त्यांच्या आवडीचे डोसे बनवले. नीताला पोळी भाजी लागायची. पण स्वतः साठी कोण करेन एवढा स्वयंपाक. सगळे घरी असला की होत पोहे उपमा, साग्रसंगीत स्वैपाक, नीताने एक डोसा बनवून खावून घेतला.

दुपारी प्रिया आली घरी. "आई काय आहे जेवायला?"

"काही नाही केल आज, तू सांग आता बनवू या."

"मग तू काय खाल्लं?"

डोसा.

"पण तुला नाही आवडत ना? तुला पोळी भाजी लागते ना?"

"हो, जाऊ दे खाल्ल तरी."

"धन्य आहे, आई तू बस मी करते मस्त पोहे आणि चहा."

हो नाही करता करता दोघींनी मिळून केले पोहे. रात्री छान खिचडी केली. दोघ मुल अभ्यास करत होते.

"संध्याकाळ पासून तुझ्या बाबांचा फोन लागत नाही प्रिया. " नीता काळजीत होती.

"आई अग बाबा बोलले होते मोठी कॉन्फरन्स आहे करतील फोन , बिझी असतिल ते. मेसेज टाकून ठेव. " प्रिया समजावत होती.

तरी नीता घाबरून गेली होती. दर पाच मीनटांनी फोन चेक करत होती. नीट जेवली ही नाही. शेवटी रात्री साडे दहाला सतीशचा फोन आला." दिवस भर बिझी होतो. आता डिनर झाल. रूम वर आलो. काय करता आहात तुम्ही सगळे. "
सतीश बर्‍याच वेळ बोलत होते. आता नीताला बर वाटत होत.

"मी बोलत होती ना आई बाबा बिझी असतिल तू उगीच घाबरते आणि टेंशन घेते." प्रिया बोलत होती. आता नीता झोपली.

असे एक नाही अनेक प्रसंग होते ज्यात नीता टेंशन घेत होती. बर ती काही हुशार नाही अस नव्हत . स्कूल मध्ये पहिल्या पाचात असायची. ती ग्रजुएट होती. सुरुवातीचे पाच सहा वर्ष जॉब ही केला होता. मुलांना सांभाळण्यासाठी जॉब सोडला होता . घरच पूर्ण तिच बघत होती. सतीशला भाजी कुठून घेता. गॅस वाला कोण होता ते माहिती नव्हतं. शाळेत जाण मुलांचा अभ्यास सगळ ती मॅनेज करत होती. काही त्रास झाला तर त्याला स्वतः तोंड देत होती. पण मूल नवरा यांची वेळ आली की हळवी होत होती. घाबरत होती.

हे एवढ्यात जास्त होत होतं. पूर्वी ती अशी नव्हती.


🎭 Series Post

View all