सुयोँग : किती वेळा सांगायचं की वेळेत घरून निघायला हवयं नाहीतर आपली ट्रेन मिस होणार. तू किती बेफिकिर आहेस मॉरीस!
मॉरीस : आय एम सॉरी बट काल तू गाडी घेऊन शॉपिंगला गेलीस आणि तिचा खटारा करून आणलास म्हणून आपण इथे यायला लेट झालोय हनी. आठवलं ना?
सुयोँग : हो नक्कीच आठवतयं ना, पण प्रत्येक गोष्टीत तू माझ्यावर आरोप करू शकत नाहीस. तुझी गाडी ऑलरेडी खटाराच आहे, अगदी तुझ्यासारखी... कळलं ना!
मॉरीस : हे बघ आता यावेळी हा विषय नको. आपण एक छान ट्रीपला निघालो आहोत आणि माझ्या मूडचे तीन तेरा वाजवू नकोस प्लीज, आपलं ठरलंय ना की छान सुट्ट्या एन्जॉय करायच्या? तर मग कालपर्यंत जे घडले त्याकडे दुर्लक्ष कर आणि विसरून जा.
सुयोँग : मॉरीस, तू थोडा वेंधळेपणा कमी केलास ना तर नक्कीच सुधारणार आहेस. तुझ्या चेहऱ्यावर सतत लो कॉन्फिडन्स पाहून पाहून मला प्रचंड बॅड वाईब्स येताहेत रे, फ्रेश रहा ना जरा.
मॉरीस : याला तू कारणीभूत आहेस असं वाटतं माझ्या नातलगांना. लग्नाला तीन वर्ष पूर्ण तरीही आपण चक्क रोज वाद घालतोय. तुझं काय मत यावर?
सुयोँग :( विचारात हरवून)
होय, कारण लग्न झाल्यावर आपण प्रेम करायचं विसरून, जबाबदाऱ्यांना महत्व दिलं. आपण कमावण्याच्या नादात वाहत गेलो व कधी एकमेकांसाठी अनोळखी बनलो कळलचं नाही रे!
होय, कारण लग्न झाल्यावर आपण प्रेम करायचं विसरून, जबाबदाऱ्यांना महत्व दिलं. आपण कमावण्याच्या नादात वाहत गेलो व कधी एकमेकांसाठी अनोळखी बनलो कळलचं नाही रे!
मॉरीस : खरं आहे तुझं म्हणणं! आता ही ट्रिप आपण अजिबात वाया घालवायची नाही. मी तुला हसवण्याकरिता पूर्वी खूप विनोदी किस्से सांगायचो ना? आता यापुढे ही नियमित सांगत जाईन. तुझ्या आवडीचं जेवण ही तुला बनवून देईन, खटारा गाडीला कायमचा बाय बाय करून तुझ्या आवडीची कार घेऊ डिअर.
सुयोँग : ( किंचित गालात हसून) ओह मॉरीस, हे सुखद बदल खरंच शक्य आहेत का? मला फार आनंदी वाटतंय. मी तुझ्या आवडीचं गाणं म्हणू का रे?
मॉरीस : (हसून) छे आता नको गाऊ प्लीज, आसपासचे पॅसेंजर तुझ्यासकट मला सुद्धा हाकलून देतील. डेस्टिनेशनला पोचलो की निवांत गा तू.
सुयोँग : अच्छा बच्चू, बघतेच तुला थांब.
सौ. उन्नती सावंत, धन्यवाद
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा