स्वीकार

Thankyou

"मनोविकार समजून घ्या, गैरसमज टाळा आणि उपचारानं आनंदी व्हा !" अच्युत गोडबोले आणि नीलांबरी जोशी यांच्या 'मनकल्लोळ' या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील माझं आवडतं प्रेरणादायी वाक्य.

खरंच आपण शरीराकडे किती लक्ष देतो. थोडं सर्दी पडसं झालं कि डॉक्टर कडे जातो. त्यातही आपल्या प्रत्येक इंद्रिया साठी एक स्पेशियालिस्ट आहे. दात दुखत असेल तर दाताच्या डॉक्टरकडे किंवा डोळ्यांना काही त्रास असेल तर डोळ्यांच्या स्पेशालिस्टकडे जातो. मग ज्याला आपण आपल्या शरीराचा आत्मा म्हणतो त्या मनाचं संतुलन बिघडलं असता आपण कधीच त्याचे स्पेशालिस्ट असलेल्या माणसशास्त्रज्ञाकडे, सायकियाट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट कडे का जात नाही? का आपण आपल्या मनाकडेच इतकं दुर्लक्ष करतो? का मनोविकारासाठी उपचार घ्यायला आपला जीव घाबरतो? का एखाद्याला एखादा मनोविकार जडलेला असेल तर आपण त्याला तूच्छ पाहतो, पागल असं म्हणून दूषणं लावतो? त्यालाच नाही तर त्याच्या कुटुंबालाही होणारा त्रास आपल्याला दिसत नाही? कदाचित म्हणूनच कितीतरी लोकं आतल्या आत कुढतात पण सायकोलॉजिस्टकडे जात नाहीत.
असेच प्रश्न मला पडायचे. म्हणून मी माणसशास्त्रात पदवीधर झाले आणि पुण्याला असतांना महर्षी कर्वे इन्स्टिटयूट मधून, 'मास्टर इन काउंसिलिंग इन मेंटल हेल्थ' हा कोर्स केला. त्यावेळी माझ्या मनात या कथेने जन्म घेतला. आता ही कथा पुस्तक रूपात मी आपल्या समोर प्रस्तुत करत आहे.
ही कथा कादंबरी लिहायचा माझा मुख्य उद्देश माणसशास्त्राबद्दल जागृती निर्माण व्हावी आणि ज्यांना मानसिक त्रास आहे त्यांनी माणसशास्त्रज्ञाची मदत जरूर घ्यावी हा आहे. तसेच सामान्य लोकांनी मानसिक रुग्णांना समजून घ्यावं हिच अपेक्षा. आपल्या बंधू भगिनी पैकी कोणाला असा त्रास असेल तर त्यांना वाळीत न टाकता उपचार घेण्यात मदत करावी.
लेखन रोचक असलं की वाचणाऱ्याला ते प्रेरित करतं. म्हणून एका बायपोलर असलेल्या स्त्रीची प्रेमळ कथा इथे मी रंगवली आहे.

तर ही कथा आहे आराधनाची. आज तिचा सत्तेचाळीसवा वाढदिवस मोठ्या थाटामाटात आणि धुमधामीत साजरा करण्यात आला. पहिल्यांदा सत्य हे स्वप्नापेक्षाही कितीतरी सुंदर असु शकतं याची प्रचिती आली. जीवन मनभरून जगल्यासारखं वाटतय तिला तेही तब्बल एकविस वर्षांनी ! गंमतीचीच गोष्ट आहे ना .... एकवीस वर्ष बाहेरच्या जगाचा स्पर्श नाही, अंधार्या कोठडीत राहणं आणि अचानक झोपेतून जाग आली म्हणून उठून बाहेरच्या जगाशी संपर्क साधायचा. किती वेगळं अन् कठीण ! सगळं बदलेलं होतं. वाढलेलं वय, पांढरे झालेले केस, चेहर्यावरची कांती जाउन आलेल्या सुकृत्या ... हे झालं आराधनाचं. पण हे जग ... हेही किती बदलेलं. किती टेक्निकल झालेलं. ते आराधनाला, एका पागलखान्यात एकविस वर्ष पागल म्हणुन वास्तव्य केलेल्या बाईला (नाॅर्मल म्हणून) स्वीकारेल का ? आणि ती सुद्धा ह्या बदललेल्या टेक्नोसॅव्ही झालेल्या जगाला स्वीकारू शकेल का ? दोन्हीही गोष्टी सहजा सहजी होणे फार कठीण. पण ज्याच्याजवळ कोणितरी असतं ना, अगदी आपलं, हृदयापासुन आपल्याला जपणारं, त्याच्यासाठी सगळंच शक्य असतं बघा

🎭 Series Post

View all