स्वप्नांच्या शहरातून गावाकडे
भाग – 2
भाग – 2
मनीष शहरात पोहोचला. त्याने कार्ड पाहिले. रिक्षा थांबवली आणि कार्डवरील पत्ता त्या रिक्षावाल्याला सांगितला. मनीष तिथे पोहोचला. रिक्षावाल्याला पैसे दिले.
तिथे घरात गेला. "कोणी आहे का?" समोर कोणी नव्हते, म्हणून मनीषने पुन्हा हाक मारली.
एक वयस्कर माणूस आला.
एक वयस्कर माणूस आला.
"तुला रूम हवी आहे का?" तो माणूस म्हणाला.
"हो," मनीष म्हणाला.
त्यांचं बोलणं झालं. त्या माणसाने एक रूम मनीषला दिली. त्या रूममध्ये चार मुलं होती.
मनीषने बॅग ठेवली. आईने डब्बा बनवून दिला होता, तो त्याने खाल्ला. थोडावेळ बेडवर आडवा झाला.
उद्यापासून तो नोकरी शोधायला जाणार होता.
त्या रूममधील मुलं आली. मनीषने त्यांच्याशी ओळख करून घेतली. "मला नोकरी कुठे मिळेल?" असं सगळं विचारून घेतलं. मुलं पण चांगली होती, छान माहिती दिली.
दुसऱ्या दिवशी मनीष लवकर नोकरी शोधायला गेला.
मुलांनी सांगितले होते त्या ठिकाणी तो गेला. तिथे चौकशी केली. त्यांचा इंटरव्ह्यू झाला. त्याला दोन दिवसांनी जॉईन होण्यासाठी सांगितले.
मनीषने त्या दोन दिवसांत लागणारे सामान घेतले.
मुलांसोबत छान वेळ गेला. आजपासून त्याला नोकरीला जायचे होते. मनीष मस्त तयार झाला आणि कंपनीत गेला.
तिथे त्याला काम सांगितले. तो काम करायला लागला. खूप मन लावून काम करत होता.
असेच दिवस जात होते. मनीष रोज रूम साफ करून, आपला डब्बा बनवून कामावर जात असे. संध्याकाळी खूप थकून यायचा.
"आज मनीषला फोन लावा," मनीषची आई म्हणाली. त्यांना मनीषची खूप आठवण येत होती.
मनीषच्या बाबांनी मोबाईल घेतला आणि त्याला कॉल लावला. रिंग झाली.
मनीषनेही लगेच कॉल घेतला. त्यालाही त्यांची खूप आठवण येत होती.
मनीषनेही लगेच कॉल घेतला. त्यालाही त्यांची खूप आठवण येत होती.
"हॅलो बाबा," मनीष म्हणाला.
"मनीष, कसा आहेस? नोकरीचा पहिला दिवस कसा गेला?" बाबा म्हणाले.
"मी मस्त आहे. तुम्ही कसे आहात? पहिला दिवस खूप छान गेला. तुम्ही पण इथे या," मनीष म्हणाला.
"तुला भेटायला येऊन जाऊ. जेवणाचं काय करतोस? आम्ही पण मस्त आहोत. गावातले तुझी आठवण काढतात, 'मनीष कुठे गेला?' असं विचारतात," बाबा म्हणाले.
"हाताने जेवण बनवतो. नंबर लावलेले आहेत, ज्याला जस बनवता येतं तसं बनवतात," मनीष म्हणाला.
"आईसोबत बोल," बाबा म्हणाले.
आईने लगेच कॉल घेतला.
"मनीष, नीट जेवण करतोस ना?" आई म्हणाली.
"मनीष, नीट जेवण करतोस ना?" आई म्हणाली.
"आई, तू काळजी करू नकोस. माझं सगळं छान चाललं आहे. आता नोकरी लागली आहे. सुट्टी असेल तेव्हा नक्की घरी येईन," मनीष म्हणाला.
"चाललं, बरं आहे," आई म्हणाली.
थोडावेळ बोलून मनीषने कॉल कट केला.
मनीष छान काम करत होता. रूमवर आला की तेव्हाही काहीतरी काम करत असे. त्याची खूप धावपळ होत होती.
---
क्रमशः…
दिपाली चौधरी
दिपाली चौधरी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा