स्वरागिनी भाग 2
सुरेश रावांचे निधन झाल्याचे आपण मागच्या भागात वाचले आता पुढे.....
अचानक ओढावलेल्या परिस्थितीमुळे अनघा कोलमडून पडली होती. थोडे दिवस नातेवाईक सांत्वन करून गेले होते. आता मात्र रागिनी साठी तिला स्वतःला सावरायचे होते. समोर फक्त अंधार दिसत होता. मदतीसाठी तसा त्याच शहरात तिचा भाऊ होता पण त्याच्यावरही आपले ओझे नको म्हणून अनघाने उभ्या राहिलेल्या परिस्थितीतून आपणच मार्ग काढायचा ठरवले.
आपल्या लाडक्या लेकीच्या चेहऱ्याकडे बघत तिने स्वतःला सावरायला सुरुवात केली.
रागिनी तर बाबा गेलेत हे मानायला तयार होत नव्हती. सतत त्यांच्या फोटोकडे बघत तिथेच बसून रहायची.
एक दिवस अनघाने तिला छातीशी कुरवाळले आणि म्हणाली,
एक दिवस अनघाने तिला छातीशी कुरवाळले आणि म्हणाली,
" रागिनी बास आता. बाबा खूप लांब गेलेत कधीही न येण्यासाठी. तुला आता मोठं व्हायचंय त्यांच स्वप्न पूर्ण करायचे आहे. तुझं रडणं आता बाबांना ऐकू नाही येणार."
असं म्हटल्याबरोबर रागिनीने मोठ्याने हंबरडा फोडला.
आईच्या गळ्यात पडून ती खूप रडली.त्यादिवशी दोघींनीही एकमेकींना सावरले.अनघाची आर्थिक स्थिती बिकट होती. घर चालवण्यासाठी तिने घरगुती खानावळ चालू केली.
आईच्या गळ्यात पडून ती खूप रडली.त्यादिवशी दोघींनीही एकमेकींना सावरले.अनघाची आर्थिक स्थिती बिकट होती. घर चालवण्यासाठी तिने घरगुती खानावळ चालू केली.
रागिनी आता कॉलेजला जाऊ लागली होती. त्याबरोबर तिचा गाण्याचा क्लास चालू होता, पण पैशांच्या होत असलेल्या ओढाताणीमुळे रागिनीने गाण्याचे शिक्षण मध्येच सोडून दिले. तिने घेतलेल्या या निर्णयामुळे अनघालाही खूप वाईट वाटले पण ती काहीही करू शकत नव्हती. तिच्या या परिस्थितीमुळे तिला हतबल झाल्यासारखे वाटत होते. रागिनी मात्र समजदार आणि शांत झाली होती. तिने गाण्याची शिक्षण तरी सोडले होते तरी तिने गाणं गाणे बंद केलं नव्हतं. रोज बाबांच्या फोटो समोर बसून ती अर्धा- एक तास रियाज करायची. बाबांच्या आवडीची गाणे म्हणायची. अनघाही तिच्या शेजारी बसून राहायची. दिवसभर घडलेल्या गोष्टी बाबांच्या फोटो समोर उभी राहून त्यांना सांगायची. तिच्या गाण्यातून जणू तिने सुरेश रावांना जिवंत ठेवले होते.
बाबांचे स्वप्न पूर्ण करण्याची एक संधी मिळावी यासाठी देवाची ती मनोमन रोज प्रार्थना करीत होती. त्याचबरोबर आईलाही मदत करण्यासाठी कॉलेज पूर्ण झाल्याबरोबर तिने जॉब शोधायला सुरुवात केली. तिच्या परिश्रमामुळे एका खाजगी कंपनीत तिला जॉबही मिळाला होता. आता पुन्हा एकदा गाण्याचं शिक्षण सुरू करण्याच्या विचारात असतानाच मामाने रागिनी साठी स्थळ आणले.
" ताई अगं काय विचार करते असं स्थळ परत मिळणार नाही."
"अरे आत्ता तर कुठे तिचे कॉलेज पूर्ण झाले आहे. लगेचच लग्न करायचं. जरा घाईच होईल आणि तसेही आता ती गाण्याचे शिक्षणही सुरू करणार आहे."
" अग ताई गाणं काय ती लग्नानंतर ही शिकू शकते. आणि ते काय एक दोन दिवसात संपणार आहे का? पण हे स्थळ जर हातातन गेलं तर दुसरं याच्यासारखं चांगलं मिळणार नाही. नंतर मग परत म्हणशील भाचीच्या लग्नाची मामाला काळजी नाही."
अनघाचे मन तयार होत नव्हते. पण भावा शिवाय मदत करणारे दुसरे कोणीही नव्हतं. त्याचे मन राखण्यासाठी तिने बघण्याच्या कार्यक्रमाला होकार दिला.
रागिनीलाही आईची परिस्थिती समजत होती. त्यामुळे ती ही काहीही न बोलता तयार झाली.
रागिनीलाही आईची परिस्थिती समजत होती. त्यामुळे ती ही काहीही न बोलता तयार झाली.
बघण्याचा कार्यक्रम पार पडला. मुलाचे नाव विजय होते. तो एका खाजगी कंपनीत जॉबला होता.
नाजूक सुंदर शांत रागिनी कोणाला पसंत पडणार नव्हती.
मुलाच्या घरच्यांकडून लगेचच होकार आला. त्यामुळे अनघाही धीर करून मुलाच्या आईला (आनंदी ताईंना) म्हणाली,
नाजूक सुंदर शांत रागिनी कोणाला पसंत पडणार नव्हती.
मुलाच्या घरच्यांकडून लगेचच होकार आला. त्यामुळे अनघाही धीर करून मुलाच्या आईला (आनंदी ताईंना) म्हणाली,
" माझ्या रागिनीने लहानपणापासून खूप दुःख भोगले आहे. आत्ताशी कुठे तिने तिच्या आवडीचे गाणं शिकायला सुरुवात केली होती. माझी एवढीच विनंती आहे की लग्नानंतरही तुम्ही तिला तिचं गाण्याचं शिक्षण चालू ठेवू द्या."
यावर आनंदी ताई लगेच म्हणाल्या,
"काही हरकत नाही आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तिला आवडेल ते करू द्या."
"काही हरकत नाही आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तिला आवडेल ते करू द्या."
हे ऐकून अनघाला आनंद झाला. तिला वाटले आपण आपल्या मुलीच्या ज्या इच्छा पूर्ण करू शकलो नाही त्या इच्छा तिचा होणारा जोडीदार नक्की पूर्ण करेल.
पण तिचा भ्रमनिरास झाला.
हळूहळू रागिणीलाही आनंदी ताईंचा स्वभाव समजू लागला.
आनंदी ताईंनी रागिणीला गाणं गाण्यासाठी स्पष्ट नकार दिला.
"आमच्याकडे गाणं - बिन गायलेलं चालत नाही. घरातल्या बाईंनी घर व्यवस्थित सांभाळावं."
आनंदी ताईंनी रागिणीला गाणं गाण्यासाठी स्पष्ट नकार दिला.
"आमच्याकडे गाणं - बिन गायलेलं चालत नाही. घरातल्या बाईंनी घर व्यवस्थित सांभाळावं."
" अहो पण आई तुम्ही आधी म्हणाल्या होता ना."
"तुला एकदा सांगितलं ना नाही म्हणून. मोठ्यांना जाब विचारते. हेच शिकवले का तुझ्या आईने तुला."
आनंदी ताई रागिनीवर ओरडल्या.
आनंदी ताई रागिनीवर ओरडल्या.
आता यावर रागिनीने विजयशी बोलायचं ठरवलं. पण फारसा काही उपयोग झाला नाही.
" या घरात आईचा शब्द शेवटचा असतो." हे उत्तर विजय कडून तिला ऐकायला मिळाले.
शेवटी रागिनीने स्वतःच्याच मनाला समजावले. पण तरीही बाबांचं स्वप्न आणि गाणं काही तिच्या मनातून जात नव्हतं.
शेवटी रागिनीने स्वतःच्याच मनाला समजावले. पण तरीही बाबांचं स्वप्न आणि गाणं काही तिच्या मनातून जात नव्हतं.
क्रमशः
**********
काय करेल रागिनी आता. राहू शकेल का गाण्यापासून दूर. वाचू पुढच्या भागात
**********
काय करेल रागिनी आता. राहू शकेल का गाण्यापासून दूर. वाचू पुढच्या भागात