Login

स्वतःच्या हिंमतीवर जगून बघ !!!!

Swtachya Himtivr


स्वतःच्या हिमतीवर


जगणे स्वतःच्या जीवावर असेल तर पुरून पुरून जगले जाते
तेच इतरांच्या जीवावर असेल तर उधळून उधळून जगले जाते

कपडे आपल्या मेहनतीच्या कमाईवर असेल तर फाटलेले ही शिवून शिवून वापरण्याची लाज वाटत नसते
ते इतरांच्या पैस्याने घेण्याची सवय असेल तर नवे कपडे ही तासात जुने वाटू लागतात..

आपण कमावलेली भाकरी ही गोड गोड लागते जेव्हा तिला मिळवण्यासाठी रोज मरावे लागते
इतरांच्या जीवावर खात असतो तेव्हा पुरणपोळी ही जास्त फिकी वाटू लागते

आपण कमावतो तेव्हा कोणाला उसनवारी देण्यावही ही हिम्मत होत नसते ,उदार होण्याची भीती जागते
तेच बापाच्या जीवावर इतरांना फुकट उसने दिले जाते, ती मोठे उदार मनाने मागितली ही जात नसते

स्वतःच्या हिमतीवर तर माथेरान ही खूप खर्चिक वाटते
पण बापाच्या कमाईवर तर भारत भ्रमण ही कमीच वाटते


आपण कमावतो तर घरात टेबल फॅन ही एसी सामना वाटे..
आणि बापाच्या जीवावर एसी ही गरम हवा फेकतो असे वाटते..

ऑफिस ला जातांना कमी तिकिट असलेली बस निवडतो ,आणि 5 रुपये वाचवतो
ते बापाच्या राज्यात कॅब करून हजार रुपये सहज उडवतो..

कपडे विकत घेतांना तूच आता सगळ्या कपड्यांचे लेबल चाफत असतोस,मग लेबल बघून तुझ्या तोंडाला फेस कसा येतो
तेव्हा मात्र लेबल जास्त कोणत्या कपड्यावर असेल तेच कपडे तू निवडतो.. मज्जा करत बाहेर निघतो


Anuradha andhale palve