भाग - 3 ( अंतिम भाग )
दिवस जात होते, पण पूजा आणि साक्षीमधलं अंतर थोडं थोडं वाढत होतं.
साक्षीला वाटायचं – “घरात माझ्या मताला किंमत नाही.”
आणि पूजाला वाटायचं – “मी जरी शांत राहिले, तरी साक्षीला माझं प्रेम कळत नाही.”
एका संध्याकाळी साक्षी म्हणाली,
“आई, मला आणि आदित्यला स्वतःचं वेगळं घर हवं आहे. ऑफिस, ट्रॅफिक, आणि इथली दिनचर्या – सगळं खूप थकवणारं होतं.”
पूजाला धक्का बसल्यासारखं झालं.
“अगं, तू घर सोडून जायचं म्हणतेस का? इथे तुला एवढा कसला त्रास आहे,आम्ही काहीचं बंधनं टाकली नाहीत तुझ्यावर?”
साक्षी म्हणाली, “नाही आई, पण स्वतंत्र जगायचं आहे… आमची स्वतःचं स्पेस हवी आहे.”
त्या रात्री पूजा शांत बसली. तिच्या मनात जुन्या आठवणी चमकल्या –
ती स्वतः एकेकाळी अशाच गैरसमजांनी सासुशी वाद घालत होती.
तिला आठवलं — “एका हाताने टाळी वाजत नाही…”
आणि ती पुन्हा ठरवते – ही वेळ नातं वाचवायची, नातं तोडायची नाही.
दुसऱ्या दिवशी पूजा आणि सौरभ साक्षीकडे गेले.
पूजा म्हणाली,
“साक्षी, तू जे म्हणालीस ते खरं आहे. प्रत्येकाला स्वतःचं जग हवं असतं.
पण एक गोष्ट लक्षात ठेव, घर म्हणजे फक्त भिंती नाही, तर माणसांचे धागे. ते सहज सुटले, तर पुन्हा जोडायला वेळ लागतो.”
साक्षी थोडी गप्प झाली. पण तिच्या डोळ्यातं पाणी आलं,
“आई, पण मला स्वतःचं आयुष्य बनवायचं आहे.”
पूजा तिच्याजवळ गेली आणि म्हणाली,
पण अंतर मनाचं नसावं.
आम्हाला मुलगी नाही ना, , तूझ्या हसण्या- बोलण्याने आम्हाला तू आमची मुलगीचं वाटतेस, तूझ्या असण्याची सवय झाली आहे आता दूर जाऊ नकोसं.
आम्हाला मुलगी नाही ना, , तूझ्या हसण्या- बोलण्याने आम्हाला तू आमची मुलगीचं वाटतेस, तूझ्या असण्याची सवय झाली आहे आता दूर जाऊ नकोसं.
साक्षीने रडून सासूचा हात हातात घेतला आणि म्हणाली,
“आई, तुम्ही खरंच सगळं समजता.” आम्ही घरं सोडून नाही जाणार.
काही महिन्यांनी मंगला आजारी पडली.
तिचं वय झालं होतं, शरीर थकलं होतं.
एका रात्री ती पूजाचा हात धरून म्हणाली,
“माझ्या आयुष्यात दोन सूना आल्या — एक तू सून आणि एक साक्षी नातसून.
पहिल्यांदा मी टाळी एकहाती वाजवायचा प्रयत्न केला, म्हणून गैरसमज झाले.
दुसऱ्यांदा तू दोन्ही हात जोडलेस, म्हणून घर जुळलं.”
ती थोडं हसली.
“ लक्षात ठेव पूजाबाई — काळ कितीही बदलला तरी, नातं टिकवायचं असेल तर दोन्ही बाजूंनी समजूत हवी.”
“ लक्षात ठेव पूजाबाई — काळ कितीही बदलला तरी, नातं टिकवायचं असेल तर दोन्ही बाजूंनी समजूत हवी.”
ती रात्र मंगलाची शेवटची होती.
पण तिचा शब्द, तिचं तत्त्व घरात कायम राहिलं.
एका दिवशी सकाळी पूजा आणि साक्षी दोघी देवघरात एकत्र आरती म्हणत होत्या. त्या आवाजात प्रेम, समजूत आणि परंपरेचा संगम होता.
सौरभ आणि आदित्य मागून पाहत होते —
ती दोघी आता केवळ सासू-सून नव्हत्या, तर दोन पिढ्यांना जोडणाऱ्या धाग्याचं प्रतिक बनल्या होत्या.
देवघरातल्या दिव्याखाली प्रकाश होता —
कारण आता त्या घरात “अंधार” नव्हता,
फक्त समजुतीचा उजेड होता.
कारण आता त्या घरात “अंधार” नव्हता,
फक्त समजुतीचा उजेड होता.
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा