तडजोड (भाग 12) प्रेमानंतर चे विदारक सत्य

Love story

तडजोड (भाग 12)

( माघील भागात आपण पाहिले वेदिका ला बघण्यासाठी येणारा मुलगा,  अजय च असतो)

आता पुढे ...................

अजय व वेदिका फक्त एकमेकांकडे बघतात पण कुणी काहीच बोलत नाही, 

जे चालू आहे ते चालू द्यावे असे दोघांना वाटते, 

अजय ची बहीण कपड्याची बॅग त्याच्या हातात देत म्हणते, मग नवरदेव चला, 
व सगळे हसू लागतात, 
अजय काहीच न बोलता तयार होण्यासाठी निघून जातो, 

इकडे वेदिका विचार करते, घेऊ का एकदा अजय शी बोलून लग्न म्हणजे खेळ नाही, 
आपण दोघे तयार आहोत का खरच की एक मज्जा म्हणून हे करतोय, एकदा जर साखरपुडा झाला तर काहीच बोलता येणार नाही व घरच्यांच्या तयारी वरून तर असेच वाटतेय की आज साखरपुडा उरकून घेतील ते, 
पण अजय ला का 
काही हरकत नाहीये, 
मग त्याला नाही तर मला का असावी, 
जाऊ दे विचार करून डोक्याचे भरीत करून घेण्यापेक्षा जे होईल ते बघू,
असे म्हणून तिने पण सोडून दिले,

अजय व वेदिका तयार होऊन हॉल मध्ये आले, 
त्यांना अजूनही काही सुचत नव्हते, 
अजय च्या आई ने त्यांचा समोर ताट धरले ज्यात दोन अंगठ्या होत्या, 
कोणती कुणाची आहे पटकन घ्या, त्या जोरात म्हणाल्या, 

दोघेही हात पुढे करेंनात हे समजल्यावर त्यांनीच त्यांच्या हातात दिल्या,
आता एकमेकांच्या हातात तुम्ही घालता की ते पण मीच करून देऊ असे म्हणत त्या हसू लागल्या, 

अजय व वेदिका ने एकमेकांना अंगठ्या घातल्या , 
सर्वांनी टाळ्या वाजल्या, 
त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत 
प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतून गेले, 

आज वेदिका च्या नावासमोर अजय चे नाव लागले होते, ध्यानीमनी नसताना इतकं सहज सगळं झालं, 
बालपणी च्या आठवणी आज डोके वर काढत होत्या, 
ते भांडण, रुसवे फुगवे, एकमेकांची बरोबरी करणे, सतत खोड्या करणे, चिडवणे, त्याने तिला सांभाळणे, काळजी करणे, तिला दिलेला आधार, ती रडली म्हणून कासावीस झालेला जीव, 
आणि तिला मुलगा बघायला येणार म्हणून झालेली चिडचिड, 
सगळं काही मनात चक्राप्रमाणे फिरत होत दिघांच्याही,
काय होत हे सगळं, 
खरच आम्ही प्रेमात पडलो होतो का????
मग आमच्या कसे लक्षात आले, 
नाही, 
दोघांनाही एकमेकांना भेटून बोलावेसे वाटत होते , 
पण आता अगोदर प्रमाणे सगळ्यांन समोर ते बोलू शकतही  नव्हते ते, 

सगळा प्रोग्राम आवरला, 
सगळ्यांची जेवणं झाली, 
हॉल मध्ये सगळे गप्पा मारत बसले होते, 
तितक्यात अजय घाबरत म्हणाला , 
आमचे थोडे काम आहे मी वेदिका ला घेऊन बाहेर जाऊ का???

काम......
काय काम आहे, 
व वेदिका च का ????
दुसरे कुणी सोबत घेऊन जा....
आणि काय रे एवढ्या दिवसाचे सोबत आहात मग अजून काम बाकी च आहे का???
वेदिका च्या आत्या च्या या बोलण्यावर सगळे हसायला लागले,

अजय चा मात्र मूड गेला, 
उगाच म्हणालो यार,
काय विचार करतील हे सगळे काय माहीत, तसे पण काही बोलायचे नाही मला वेदीकाला मग का भेटायचे आहे मला तिला, 

तो एका ठिकाणी शांत विचार करत बसला, 

ओ .......
नवरदेव आवरा व जा कुठे जायचे  तर पण लवकर घरी या, 
आणि हो हर कपडे बदलून जा नाहीतर लोक समजतील पळून जाऊन लग्न केलं की काय आत्या च्या या बोलण्यावर पुन्हा सगळे हसले, 

अजय पुन्हा काहीच बोलला नाही,

वेदिका ची आत्या खुप हुशार, व एका नामांकित कंपनी मध्ये जॉब करते, 
वेदिका च्या घरातील खुप निर्णय भावा च्या प्रेमापोटी त्याच घेतात व त्यात सर्वांची संमती देखील असते, 
वेदिका व अजय चे लग्न हा त्याचाच एक भाग होता, 
मुलगी बिनलग्नाची फिरण्यापेक्षा 
एंगेजमेन्ट करून देऊ असे त्यांचे मत होते,


वेदिका ला देखील अजय शी बोलायचे होते, 
ती पटकन ड्रेस चेंज करून खाली आली, अजय व वेदिका बाहेर पडले, पण जाणार कुठे, 

चला येथून निघू एकदाचे, 
ते दिसेल त्या रस्त्याने निघाले, 
दोघेही शांतच , 
बोल ना यार काहीतरी, 
नेमकं काय चुकतंय तेच कळेना, अजय 

मला पण , वेदिका 

शशांक ला सांगूंयात का?????
अजय , 

हो चालेल, थांबावं गाडी, वेदिका 


इथे नको जवळच एक गार्डन आहे तिथे जाऊ,  अजय

ते दोघे 
जवळ असलेल्या गार्डन मध्ये जातात, 
आणि तेथून शशांक ला व्हिडीओ कॉल लावतात, 

हॅलो, काय करतोय, 
अजय 

काही नाही आरती सोबत बोलतोय, 
शशांक, 

बर ऐक ना, 
अजय घडलेला सगळा प्रकार सांगतो, 

शशांक फक्त हसत असतो, 

शशांक ला असे हसताना बघून 
अजय व वेदिका आणखी लाजतात , 

अरे वेड्यानो , 
तुम्ही एक मेकांच्या प्रेमात पडलात हे घरी लक्षात आले पण तुमच्या नाही आले, 

तू ठेव बर आपण नंतर बोलू , अजय कंटाळून कॉल कट करतो, 

पुन्हा शांतता, 
तितक्यात पाऊस चालू होतो, 

काय यार, 
याला पण आताच यायचे होते,?
अजय नकारार्थी भावनेने म्हणतो, 

तो त्या पावसाचा राग राग करण्यात गुंतलेला असतो व इकडे वेदिका पावसापासून वाचवण्यासाठी 
अजय चा आधार घेते, 
पाऊस आणखी जोर धरू लागतो, व ते दोघे बागेतील एका झाडाच्या आडोशाला जातात, 
नकळत अजय चा हात वेदीकाच्या खांद्यावर जातो, 
आज तो स्पर्श दोघांनाही वेगळा जाणवत होता, रोज पटकन हातातून वस्तू हिसकावून घेणारा हात आज सावरून होता स्वतः ला , आज हक्क मिळाला होता तरीही, 
आधार मिळावा म्हणून किं आधार द्यावा म्हणून माहीत नाही पण वेदिका अजय च्या आणखी जवळ आली, 

आता इतकी जवळ आली च आहेस तर आणखी ये, 
अजय हसून म्हणाला, 

वेदिका अजय कडे बघू लागली, 

हो नाहीतर काय , 
आता तू माझी हक्काची बायको होणार आहेस, अजय दोनी हातानी  तिला मिठीत घेत म्हणाला, 

आता वेदिका ने देखील त्याला साथ देत, त्याचे प्रपोजल स्वीकारले होते, 

कोसळणारा पाऊस, वाऱ्यावर डुलणारी बागेतील फुले
आणि एकमेकात गुंतलेले अजय व वेदिका, 
कसे असेल या भांडखोर जोडीचे प्रेमातील दिवस, 
करतील प्रेम एकमेकांवर की भांडतील पुन्हा , 

क्रमशः .............

🎭 Series Post

View all