तडजोड (भाग 27)
(माघील भागात आपण पाहिले वेदिका च्या आत्या व आई ने अजय च्या घरी कॉल करून घटस्फोट हवाय म्हणून सांगितले हे ऐकताच अजय चे आई बाबा धावत आले, )
आता पुढे .....................
अजय ची आई काहीच न बोलता वेदिका व बाळाला कवटाळून रडू लागली,
तेवढ्यात आई व आत्या रूम मध्ये आल्या,
आई का रडताय तुम्ही
मला कारण कळेल का?
वेदिका
वेदिका तू कुठलाही निर्णय घे
पण मला व तुझ्या बाबा ना
तुझ्या व बाळापासून दूर करू नकोस,
आम्ही नाही जगू शकणार ग तुमच्याशिवाय
अजय ची आई रडत रडत म्हणत होती
आई अगोदर रडणे थांबवा
मला कळेल का ??
काय झाले,
वेदिका
वेदीकाचे बोलणे मध्ये तोडत आत्या म्हणाल्या
वेदिका ला काही माहीत नाही
तो निर्णय आम्ही च घेतलाय
कोणता निर्णय आत्या
व तो पण मला न विचारता,
वेदिका आत्याकडे बघून म्हणू लागली,
वेदिका शांत हो ,
आम्ही तू अजय पासून घटस्फोट घ्यावा असे ठरवले आहेत
आणि हो घरातील सर्वांची मान्यता आहे त्यासाठी
आत्या ला थांबवत वेदिका म्हणाली
खुप सोपं आहे का ग आत्या तुझ्यासाठी सगळं
मला न विचारता इतका मोठा निर्णय तू घेतलास
अग एकदा तरी माझा व माझ्या बाळाचा विचार करायला हवा होता,
आता वेदिका रडू लागली
मान्य आहे अजय चुकला असेल पण त्याला व स्वतः ला मी इतकी मोठी शिक्षा नाही देऊ शकत
मी काहीही झाले तरी घटस्फोट घेणार नाही,
असे बोलून वेदिका निघून गेली,
अजय च्या आई ला वेदिका च्या उत्तराने समाधान वाटले
पण ते समाधान खुप क्षणिक होते,
वेदिका निघून गेल्यावर सगळे शांत झाले
व आत्या बोलू लागल्या तुम्हांला मी इतकी वाईट वाटते का ??
मला काळजी नाही का वेदिका व अजय ची
पण मग काय आयुष्यभर असेच चालू ठेवायचे का??
आयुष्यात खुप कठीण प्रसंग येतात
पण त्या प्रत्येक प्रसंगात हार मानायची नसते
काही प्रसंगाचा सामना करायचा तर काही प्रसंगात तडजोड करावी लागते,
मग या दोघांना ठरवू द्या ना त्यांच्या आयुष्यात त्यांनी पुढे काय करायचे,
त्या कठीण प्रसंगाचा सामना करायचा की तडजोड करायची,
सध्या तरी त्यांना आत्या काय बोलतेय काहीच कळत नव्हते,
अजय ची आई म्हणाली हे बग आम्हाला नाही कळत काय करावे
पण जे सांगशील ते आम्ही करू
ठरलं तर मग,
तुम्ही आता घरी जा व अजय ला सांगा
पेपर तयार कर
वेदिका ला घटस्फोट हवाय, आत्या म्हणाली
पण वेदिका तर आत्ता नाही म्हणाली ना , वेदिका ची आई प्रश्नार्थक नजरेने म्हणाली
हो वहिनी पण हे आपल्याला व वेदिका ला माहीत आहे अजय ला कुठे, आत्या
पण आपण खोटं बोलायचं
अजय ची आई
बिलकुल नाही पण खरं देखील बोलायचे नाही, तुम्ही घरी जा व अजय ला निरोप द्या
पुढे मी बघून घेते,
आत्या च्या सांगण्याप्रमाणे अजय चे आई बाबा घरी गेले
अजय संध्याकाळी ऑफिस वरून आल्यावर आई म्हणाली
अजय
हो बोल, अजय
आज वेदिका चा कॉल आला होता, आई
काय म्हणाली, अजय
तिला घटस्फोट हवाय, आई
आई ने फक्त घटस्फोट हा शब्द उच्चारताच
अजय च्या पायाखालची जमीन सरकली
आई आलोच म्हणून तो रूम मध्ये निघून
गेला,
रूम मध्ये जाताच
आतून दरवाजा लावून तो रडू लागला,
मी खुप सोपं समजत होतो सगळं पण इतक बिघडेल असे वाटले नव्हते,
तुला एकदा पण माझा विचार नाही आला का ग घटस्फोट माघाताना,
मी खरच नकोय का ग तुला तुझ्या आयुष्यात
इतका वाईट आहे का ग मी ??
तुला नसेल येत माझी आठवण पण निदान त्या बाळासाठी तरी तू मला एकदा विचारायचं होतंस कसा आहेस,
तुझ्याशिवाय खुप एकटा पडलो ग मी
तू नाहीस तर आयुष्य थांबलय माझं
पण असो त्याचे तुला काय तू मस्त आहेस
माहेरी सुखात त्यात तुझ्यासोबत बाळ पण म्हणजे तुला माझी आठवण येण्याचा प्रश्न च येत नाही,
पण जाऊ दे मी प्रॉमिस केलं होतं
तुझी प्रत्येक गोस्ट मी ऐकेल
चल ईच्छा नसताना
मी तुझी ही ईच्छा देखील पूर्ण करेन
मनाशीच बोलून त्याने डोळे पुसले,
आता अजय ला हे कोण सांगणार होत की एका स्त्री साठी तिचे मुलं जरी काळजाचा तुकडा असले तरी पती तिचे काळीज असतो,
ती जीव सोडेल पण पती ची साथ नाही हे अजय ला अजूनही समजत नव्हते,
मुळात स्त्री च्या त्यागाची अजूनही त्याला अनुभूती आलेली नव्हती,
अजय चेहऱ्यावर पाणी मारून खाली आला व म्हणाला
आई उद्या पेपर देतो
वेदिका च्या सह्या घे त्यावर, व बाहेर निघून जातो
अजय चे बोलणे आई व बाबा ना खुप लागते,
त्यांना वाटलं होते तो नाही म्हणेल पण तो घटस्फोट देण्यास तयार झाला,
त्यांनी हे आत्या ना कॉल करून सांगितले
वेदिका च्या घरी देखील अजय चा होकार ऐकून धक्का च बसला,
वाऱ्यासारखी ही बातमी घरभर पसरली
मग ती वेदिका ला कळली तर त्यात नव्वल काय ????
अजय स्वतःहून घटस्फोट देतोय हे ऐकताच ती रडू लागली
असे माझं जाऊ दे पण निदान बाळा चा तरी विचार करायचा होतास,
इतकी का जड झाले रे मी तुला
ती मनाशीच म्हणाली
दुसऱ्या दिवशी अजय ने पेपर आणून दिले,
आई पेपर घेऊन आल्यावर
वेदिका ने देखील रागात त्यावर साईन केल्या,
अखेर संपलं होत एक नात
तुटले होते अनेक मन
वर्षानुवर्षे जोडले गेलेले दोन कुटुंब एक क्षणात वेगळे झाले,
प्रत्येकाच्या डोळ्यात फक्त पाणी होते
प्रत्येकजण दुसऱ्याला दोषी मानत होता,
पण चूक नेमकी कुणाची होती???
आयुष्यात खुप वेळा असे होते
नाते हे गैरसमज व विश्वासा अभावी तुटते,
पण प्रत्येक नात्याचा शेवट हा असाच असेल का ????
की होत असेल जाणीव आपल्या चुकांची
जाणून घेण्यासाठी सोबत राहा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा