तडजोड (भाग 28)
(माघील भागात आपण पाहिले अजय व वेदिका ने पेपर वर साह्य केल्या होत्या व त्यांनी कायमचे वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता
आता पुढे ..............
खरच माणसाच्या आयुष्यात गर्व , अहंकार मी पणा या गोष्टीना किती जागा असते ना 
बघा ना कुणाचीच ईच्छा नव्हती वेगळं होण्याची पण प्रत्येकामध्ये थोड्याफार का प्रमाणात होत नाही पण उपलब्ध असलेल्या मी पणा मुळे एक सुंदर नाते आज तुटले होते , 
फक्त मीच का कमी पणा घेऊ या गोष्टीमुळे आज एक संसार मोडला होता,
खुप वेळा समोरच्याला गृहीत धरले जाते त्याच्या मनाचा विचार न करता व शेवटी हातात काहीच राहत नाही,
अजय व वेदिका चे देखील असेच झाले होते, 
एकमेकात जीव होता 
प्रेमही होते 
दुरही जायचे नव्हते 
पण तरीही माघार कोण घेईल म्हणून ते दूर गेले 
दिवसमाघून दिवस जात होते 
प्रत्येकजण आपल्याला आयुष्यात
जसे जमेल तसे जगत होता, 
त्यातच 
आत्या नि सर्वजण जेवत असताना विषय काढला
मग दादा वेदिका चे पुढे काय करायचे,
काय करायचे म्हणजे, दादा
अरे तिचे दुसरे लग्न करावे असे मला वाटते,
काही पण काय बोलतेस आत्या वेदिका
काही पण काय 
हे बग तू एकटी नाहीस तुझ्यावर बाळाची जबाबदारी आहे 
त्याला बापाचे प्रेम नको का 
तुला आता वाटते तू सक्षम आहेस दोन्ही भूमिका पार पाडायला 
पण काळासोबत त्याला बापाची उणीव भासेलच   व तेव्हा तुझ्या हातात काहीच नसेल त्यामुळे तू बग विचार करून व तसेही या जगात एकटी राहणे सोपे नाही 
बग तुला काय वाटते आत्या 
वेदिका विचार करू लागते 
अजय सोडून दुसऱ्या कुणाचा विचारही ती करू शकत नव्हती 
पण तिने पुन्हा विचार केला आत्या बरोबरच बोलताय 
व तसेही घटस्फोट घेण्याचा निर्णय अजय चा होता 
मग मी लग्नाचा निर्णय का घेऊ नये 
त्याला पण कळू दे मी पण कमी नाही मी पण माझे निर्णय घेऊ शकते, 
त्याला काय वाटते 
मी आयुष्यभर त्याच्यासाठी रडत बसेल तर मुळीच नाही मी आजची मॉर्डन मुलगी आहे 
मला माझे आयुष्य माझ्या मर्जीने जगायचे आहे, 
आता त्याच्या कुठल्याही गोष्टी चा मी माझ्या मुलावर परिणाम होऊ देणार नाही, 
आणि जर मला अजय ला विसरायचे असेल तर नवीन कुणाची तर सोबत घ्यावी च लागेल मग ईच्छा असो की नको 
विचार करून वेदिका म्हणते 
आत्या शोध मुलगा 
मी तयार आहे लग्नाला 
असे सांगून ती रूम मध्ये निघून जाते, 
आता वेदिका चे आई बाबा पूर्णपणे कोलमडून पडतात 
आपण काही चूक ते नाही केली ना ग 
मला वाटलं च नव्हते वेदिका इतक्या लवकर तयार होईल पण तिने तर एका क्षणात होकार कळवळा, 
असे काय झाले असेल ग यांच्यात इतके भयंकर की हे दोघे एकमेकांची तोंड पण बघत नाहीत, 
असे म्हणून वेदिका ची आई रडू लागली
वहिनी मी म्हणाले ना माझ्यावर विश्वास ठेव
मुलगा मला बघायला सांगितलं आहे मग बग ना मी मुलगा कसा आणते, 
असे म्हणून त्यांनी विवाहसुचक मंडळातील  एक दोन मुलांना कॉल केले 
व एका मुलांसोबत 
उद्या ची बैठक देखील ठरवून टाकली, 
वेदिका च्या सासरी त्यांनी कॉल केला की उद्या वेदिका ला मुलगा बघायला येणार आहे तुम्ही देखील या, 
अजय ची आई हो म्हणाली व मुद्दाम अजय समोर मोठ्याने म्हणाली उद्या वेदिका ला मुलगा बघायला येणार आहे तर जाऊ आपण
अजय चा पारा बातमी ऐकून जास्त चढला किती मूर्ख मुलगी आहे व घरचे त्याहून जास्त 
जाऊ दे मला काय करायचं 
पण ती लग्न करतेय मग मी का नको ??? 
त्याने लगेच विवाह मंडळात स्वतः चे नाव नोंदवले, व मुद्दाम त्याच्या बाबा चा नंबर तिथे टाकला, 
त्यांनी नोंदणी करताच त्याचा बाबा ना कॉल येऊ लागले, 
बाबा देखील हुशार होते ते त्यांना जे स्थळ आवडायचे तेच अजय ला सांगायचे बाकीचे कॉल आले की अगोदरच नाही म्हणून मोकळे होयचे 
त्यांचे हे सत्र चालू च होते व इकडे वेदिका ला मुलगा बघायला आला
काही तयारी नाही काही नाही फक्त एक औपचारिकता म्हणून वेदिका बाळाला घेऊन येऊन बसली,
बोलणे चालू झाले, 
मुलाची बहीण म्हणाली 
मुलगी पसंत आहे पण बाळ माहेरी ठेवावे लागेल 
आत्या व वेदिका एकमेकीकडे बघू लागल्या 
नंतर उत्तर कळवतो
म्हणून वेदिका च्या बाबा नि त्यांना कटवले, 
मुलगा गेल्यावर वेदिका म्हणाली आत्या काही झालं तरी मी बाळ दूर करणार नाही त्याच्यासाहित 
मला स्वीकारणार असेल तर 
त्यापुढे मूल बोलावा नाहीतर नको, 
वेदिका चे बोलणे ऐकून आई बाबा खुश झाले त्यांना आता आत्या चे राजकारण थोडे थोडे कळू लागले होते,
आत्या नि वेदिका ला एकामागून एक स्थळा ची रांग लावली पण सगळे असेच कुणी अपंग, कुणी घटस्फोटित , कुणाची अगोदर ची पत्नी पळून गेलेली नाहीतर कुणाची मृत्यू पावलेली , सगळी स्थळ ही पुनर्विवाहा ची च
पण वेदिका ला असे स्थळ नको होते, 
तिला वाटायचे दुसरे लग्न का असेना पण निदान थोडे फार बरे तरी असावे, 
तिकडे अजय ची देखील हीच अवस्था होती, 
त्याला एकतर मुलगी च आवडत नव्हती एखादी आवडली तर तिला एखादे मूल तरी असायचे 
असे करत करत तो प्रत्येक मुलगी नाकारत होता, 
इकडे आत्या व तिकडे अजय चे बाबा दोन्ही बाजू मस्त सांभाळत होते, 
एक दिवस वेदिका रूम मध्ये एकटी रडत असताना आत्या तिथे येते
का रडतेस 
आत्या 
बग ना 
सगळे स्थळ असे येताय 
मला वाटलं होतं मी अजय च्या जिद्दीवर लग्न करून दाखवेन 
पण मग अश्या मुलासोबत कसे लग्न करू, 
वेदिका 
हे बग वेदिका 
हे तुझे दुसरे लग्न आहे 
त्यात तुला एक मूल देखील आहे, 
मग तुला येणारे स्थळ देखील त्याचा लेव्हल चे असेल ना, 
व हे बग आयुष्यात तडजोड ही करावीच लागते, 
आणि तुला ही तडजोड करावीच लागेल 
आत्या 
पण माझं मन नाही मानत अग अशा मुलांसोबत लग्न करायला, 
आणि मी मन मारून केले जरी तरी ते माझ्या बाळाला पूर्ण मनाने स्वीकारतील का??? 
त्यात पुन्हा त्यांच्या माझ्याकडून दुसऱ्या मुलाच्या अपेक्षा त्या मी पूर्ण करू शकेन का?? 
माझं बाळ माझा स्वास आहे ग 
तो कसा दूर करू सांग ना, 
असे म्हणून वेदिका रडू लागली 
हे बग वैदू तू रडू नकोस 
मला पण कळते बाळ तुझी अवस्था 
पण यावर एक उपाय आहे माझ्याकडे पण तुला नाही पटणार तो, 
त्यामुळे तुझे माहीत नाही पण तुझे बाळ नक्की सुखात राहील, आत्या 
सांग ना, 
माझ्या बाळासाठी मी काहीही करू शकते, वेदिका 
हे बग तुला आयुष्यात तडजोड ही करायची च आहे मग समोर कुणी का असेना, 
पण त्या तडजोडीतून  फायदा ही झाला पाहिजे 
नाहीतर असे नको आगीतून उठून फुफाट्यात पडायचे, 
म्हणजे बग जर तुला तडजोड करायची च आहे तर ती अजय सोबतच कर ना 
तुला त्रास होईल पण तुझे मुलं सुखात राहील आत्या 
पण तो माझ्या बाळाला बघायला देखील आता नाही व तो काय प्रेम करेल माझ्या बाळावर 
वेदिका 
नका का करेना 
तुझे बाळ तर करेल ना त्याच्या बाबा वर प्रेम, 
बग विचार करून 
व जर तुला योग्य वाटले तर तू माघार घे 
तुझ्या बाळासाठी 
आत्या असे सांगून निघून जातात 
घेईल का वेदिका माघार बाळासाठी ?????
तुम्हांला काय वाटते 
जर कुठेही तडजोड करायची च आहे तर ती वेदिका ने अजय सोबत करावी का ??? 
जाणून घेण्यासाठी सोबत राहा,
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा