मी दरवाज्या आतून लावून घेतला आणि समोरची खिडकी उघडली. आत मधे थोडा थोडा येणारा पावसाचा आवाज एकदम वाढला.पाऊस बराच पडत असावा.सहज म्हणून मी खिडकीबाहेर पाहिलं. काळोखामधे दाटीवाटीने उभे असलेले मोठाले व्रुक्ष माझ्यावर नजर ठेवून असावेत असं वाटलं. खोलीतला थंडगार ओलसरपणा अंगावर काटा आणीत होता.समोरच असलेलं वॉर्डरोब मी उघडण्याचा प्रयत्न करुन पाहिला. पण त्याची दारं जरा देखिल हालली नाहीत. त्याला कुलुप नव्हतं. असलं तरी अंगचं असावं. ताईंकडे किल्ल्या कोण मागणार. मी दारं ओढून पाहायचा पुन्हा प्रयत्न करुन पाहिला. दारं मालकाशी भलतीच इमानदार आहेत असं वाटलं. पप्पानीही कधी उघडायचा प्रयत्न केला नसावा. पुरुषाचा स्वभाव शिकाऱ्या सारखा असतो. एखाद्या गोष्टीच्या तो मागे पडला तर ती तडीस नेईपर्यंत सोडत नाही. आजूबाजूला दारं उचकटण्यासाठी काही मिळतंय का ते पाहू लागलो. आता तुम्ही म्हणाल मला हे नसते उपद्व्याप कोणी सांगितले होते. मुकाट्यानी जेवायचं आणी झोपायचं सोडून. पण पुरषी स्वभाव दुसरं काय ? मी सगळीकडे शोधलं पण काहीही सपडलं नाही. शेवटी टेबलाचे खण कसेतरी उघडले. आत एक हातभर लांबीचा लोखंडी तुकडा , चामड्याचे हातमोजे ,एक लहान घमेलं, काही खिळे इ. सापडलं. का कोणजाणे चामड्याच्या हात मोज्यांचा संबंध कोणत्या तरी गुन्ह्याशी असावा असं वाटलं. एकूण माझं वाड्यासंबंधी मत चांगलं नसल्यामुळे असं झालं असावं. मी लोखंडाचा तुकडा घेऊन वॉर्डरोबकडे निघालो. कदाचित जेवणाचं बोलावण़ येईल असं वाटलं म्हणून मी तो तुकडा परत टेबलाच्या खणात ठेवला. तेवढ्यात दरवाज्या वाजला. दारात राधाबाई, " खाली चला सायब जेवण तयार आहे. " त्या नम्रपणे म्हणाल्या. त्या गेल्यावर कपडे बदलून जेवायला निघणार एवढ्यात दीपा आली. " चल जेवायला...ताईला नको ना पाठवू बोलवायला. " मी काहीतरीच काय अशा अर्थी हात उडवले. जेणेकरुन खेळीमेळीचं वातावरण राहील. याचा अर्थ तिनी मगाशी पाहिलं होतं तर . मी तिच्या मागोमाग निमूटपणे खालच्या हॉलमधे आलो. टेबलावरच्या उदबत्त्यांच्यावासाने मन प्रसन्न झाले. आम्ही दोघानी अशा रातीने खुर्च्या पकडल्या की माझा आणि ताईंचा संबंधच येणार नाही. टेबल आठ माणसांचं आणि आम्ही चौघेच..ताईंचा चेहरा थोडा आक्रसल्यासारखा दिसला. जेवण अतिशय सुंदर आणि चविष्ट होतं. मी शाकाहारी असल्याने जेवणात एकही मांसाहारी पदार्थ नव्हता. जेवणं शांततेत चालू होती. अचानक घुं घुं घुं .....घूंघूं.... घूं असा घुबडाचा आवाज आला. मी जरा दचकलो. हा अपशकूनच होता. मी बाकीच्यांकडे पाहिलं. पण ते जसं काही घडलंच नाही असे जेवत होते..हा आवाज अशुभ आहे हे मला बाकीच्याना सांगावसं वाटत होतं. आस्ते आस्ते जेवणं झाली. राधाबाईंनी प्रत्येकाच्या हातावर बडीशेप ठेवली. मग सगळेच रेळल्यासारखे सोफ्यांवर बसले. अचानक ताई म्हणाल्या ," इथे असे घुबडाचे आवाज कॉमन आहेत. दिवसासुद्धा येतात. " काही वेळान मी उठलो. दीपाकडे पाहून म्हणालो," ,चला, मला झोप येत्ये. " .... " ,नक्की झोपायलाच जाताय ना ? की काही शोध घ्यायचाय. ? " ताई खंवचटपणे म्हणाल्या. मी काही शोधतोय हे याना कसं माहीत. ताईंचा आगाऊपणा मला आवडेनासा झाला..काही न बोलता मी जिन्याकडे वळलो. खोलीत जाऊन मी दरवाज्या लावून घेतला. टेबलाच्या खणातला लोखंडी तुकडा काढून मी तो वॉर्डरोबच्या बंद दरवाज्यात घालून जोर लावू लागलो. दोनचार वेळा प्रयत्न केला पण उघडलं नाही. मी विचार केला आपल्याला तरी काय करायचंय हे सगळं करुन ,गुमान झोपलो तर...... माझी नजर वॉर्डरोबच्या खालच्या भागात बरोबर मधे एक लाकडाची खिटी दिसली. मी ती आधी पाहिली असती तर ते केव्हाच उघडले असते. मी जोर लावून ती उघडली तर ती तुटून खाली पडली. मी कपाळावर हात मारुन घेतला. आता तर आशाच नाहीशी झाली. मी पुन्हा लोखंडी तुकड्याने प्रयत्न केला. दोन अडीच इंच जाडीचा दरवाज्या थोडा हालला.. मग पुन्हा जोर लावून पाहिलि आता ते हळूहळू उघडू लागला. पुन्हा पाच सात मिनिटांच्या झटापटीने तो उघडला. आत काही जरीकाठाच्या लुगड्याच्या घड्या , एक घमेलं,काही काठ्या ,चारदोन मुखवटे, काळ्या रंगाचे डगले, ते बाजूला केल्यावर माझा हात एका गोलसर वस्तूवरुन फिरला मी ती बाहेर ओढली, ती एक मानवी कवटी होती. मी घाबरुन ती खाली टाकली. त्यावर ती भंगली, दोन तुकडे आणि भुसा झालेली कवटी पुन्हा उचलणं मला किळसवाणं वाटू लागलं. ,,,,,,, हळूहळू मी भानावर आलो, पण कोणीतरी दरवाज्या वाजवीत होतं. माझ्या अंगाला थरथर सुटली आणि मानेवरुन घामाचा ओघळ वाहत माझ्या निकर पर्यंत आला. ,,,,,,
घाबरून मी अर्धवट फुटलेली कवटी उचलून प्रथम वार्ड रोबच्या खणात टाकली. तिचा भुसा कसातरी गोळा करून वार्डरोबच्या बाजूच्या खणात फेकला. दरवाज्या उघडला दारात ताई उभ्या . मी पटकन टाईम पाहिला साडेदहा होत होते. आत येत ताई म्हणाल्या , " टाईम बघू नका. दीपा आत्ताच झोपायला गेल्ये." ताई आता मॅक्सीमधे होत्या तरी वर त्यांनी पारदर्शक चुन्नी घेतली होती. त्या आत शिरल्या. एकूणच सर्व वातावरण पाहून म्हणाल्या, " काय शोधाशोध चालल्ये . तुम्हा पीएचडी वाल्यांची नजर सारखी काही ना काही तरी शोधत असते. " असं म्हणून त्यांनी दरवाज्या लावला. माझी छाती धडकली. आता ही बाई काय करते असा भाव माझ्या तोंडावर असावा . हे ओळखून त्या म्हणाल्या, " अहो मी काही तुम्हाला खात नाही " त्यावर मी बेड्वर बैठक मारली. त्या माझ्यासमोर उभ्या राहिल्या. अचानक त्या टेबलाकडे वळल्या. मग माझ्याकडे पाठ वळवून म्हणाल्या, " तुम्हाला एक गोष्ट विचारू का ......? " प्रश्न अर्धवट सोडून माझ्याकडे पाहू लागल्या. " हुं !बोला "असे म्हणून त्या काय विचारतात या भीतीने त्यांच्याकडे पाहात राहिलो. पण त्या बोलेनात. मग मी त्यांच्याकडे आलो आणि म्हणालो, ..... " काय विचायचंय विचार ना गायत्री , " मी मुद्दामच एकेरी उल्लेख केला. तिने खालच्या मानेनेच विचारले, " तुम्ही आता लग्न करणार असालच नाही का ? घाबरू नका मी दीपाला सिनेमा बद्दल काहीच सागितलं नाही...... मग काय ठरलंय तुमचं. " असं म्हणत त्या जवळ आल्या. स्वतःच्या सेंटचा वास मला जाणवेल असं पाहात त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवीत त्यांचा चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ आणला. चुन्नी हळूहळू सरकत होती. त्या किस करण्याच्या अंतरावर होत्या. पण मी स्वतःला सावरलं. आणि बाजूला झालो. त्यांच्या डोळ्यात निराशा आणि रागही डोकावला. त्या ज्या ज्या वेळेल खूण करतील तेव्हा तेव्हा मी बळी पडलं पाहिजे असं त्याना वाटत असावं. मग त्या थोड्या लांब गेल्या आणि पाठमोऱ्या वळत दरवाज्या कडे वळल्या. मला वाटलं माझी सुटका झाली. आत्ता मला दीपा पाहिजे होती. आम्ही दोघेही आठवडाभर दूर होतो.. पण माझा अंदाज चुकला. त्या पाठमोऱ्या अवस्थेत मॅक्सीशी काही तरी करीत होत्या. मला समजेना, त्या पुढे काय करण्याच्या विचारात आहेत या आश्चर्यात असताना माझ्या अंदाजाप्रमाणे त्यांनी मॅक्सीची वरची बटणं काढली असावीत . मी उत्तेजित झालो होतो.. त्या काय करण्याच्या बेतात आहेत हे कळण्यासाठी मी उठलो. बरोबर त्याचवेळी त्या माझ्याकडे वळल्या. डाव्या हातातल्या मोबाइलचा टॉर्च त्यांनी चुन्नी सरकवून स्वतःच्या छाती कडे वळवला. .. आता त्यांनी हळू हळू चुन्नी अर्धवट खाली आणली . खोलीतला उजेड तसा मंदच होता. त्यांचा वरचा भाग आता अर्धवट उघडा झाला. मी मॅडसारखा पाहत असताना त्यांनी मधला भाग उघडला आणि म्हणाल्या, " तुम्ही , यू रिअली लव्ह मी असं म्हणाला होतात ना ? " आणि त्यात असलेल्या चार पाच कोडाच्या पांढऱ्या लालसर डागांवर प्रकाश टाकला. तेजाने चमकणाऱ्या डागांकडे पाहात म्हणाल्या, " माझ्याशी लग्न कराल ? ...... " मला ते पाहून चांगलाच धक्का बसला होता.
माझा स्तंभित झालेला चेहरा पाहून त्यांना आणि मला एकाच वेळी कळून चुकलं की माझी विकेट गेलेली आहे. ......तो भाग तसाच उघडा ठेवीत एकेक पाऊल माझ्याकडे टाकीत त्या म्हणाल्या, " बघा , आत्ता जर तुम्ही दीपाला सोडलीत तर निदान तीन चार वर्ष तरी तिच लग्न होणं शक्य नाही. म्हणजे ती फ्रस्टेट होणार. विचार करा . मी तर लग्नाची बायको असेनच पण ती पण तुमच्या सोबत असेल. म्हणजे समजतंय ना ..... एकाच दगडात दोन पक्षी . ........ " आता त्या सावकाश माझ्याकडे येत होत्या. त्या माझ्यापासून हाताच्या अंतरावर होत्या. त्या काय म्हणत होत्या ते माझ्या आस्ते आस्ते लक्षात आलं. मला प्रथम चीड आली. मग राग आणि एखाद दोन कानफटात मारण्याची इच्छा झाली.. माझा हात उठणार एवढ्यात त्या म्हणाल्या , " म्हणजे आजकालच्या भाषेत , बाय वन गेट वन फ्री. " ... आणि त्या हासत सुटलया . माझा हात तत्क्षणीच उठला आणि त्यांच्या गालावर जाऊन फाटकन पडला. मला वाटलं अपमान आणि राग यांनी त्या मागे सरकतील. पण तसं न होता त्या मला घट्ट मिठी मारण्याचा प्रयत्न करू लागल्या. मला मागे सरकवीत त्यांनी मला बेडवर उताणे पाडले आणि माझ्या अंगावर चढण्याचा प्रयत्न करु लागल्या आणि हसूही लागल्या. मला त्यांची किळस येऊ लागली. आपल्या बहिणीबद्दल असं खालच्या पातळीचं विधान करणारी ती स्त्री मला आवडेनाशी झाली. मग त्या हिडिसपण हासू लागल्या. त्या बरोबर त्यांचे थोडे लांबट आणि चमकणारे सुळे मला दिसले. मी घाबरून मागे सरकलो. अचानक त्यांच्या अंगात पाशवी बळ संचारलं.त्यांच्या ओठांच्या कोपऱ्यात लाळ जमा झालेली दिसली. मला अत्यंत घ्रुणा आली. मी जिवानिशी जोर लावून त्याना मागे ढकलल्या. चपळाईने उठलो आणि दरवाज्या उघडला. बाहेर येऊन मी दीपाच्या दरवाज्यावर थापा मारू लागलो. ताई आत नक्की काय करीत होत्या ते समजत नव्हते.. आता दीपाने दरवाज्या उघडण्याची गरज होती पण ती झोपेत असावी. मी आता वेड्यासारखा दरवाज्या ठोकीत होतो. दीपाला कसली एवढी झोप लागली होती , कोण जाणे. फाटकन दरवाज्या उघडला. आणि ताई बाहेर पडल्या. मी येताना दरवाज्या बाहेरून लावून घेताला असता तर बरं झालं असतं असं वाटू लागलं. ताईंनी आता कपडे नीट घातले होते. पण त्यांच्या एका हातात सुरा होता. आणि त्या विकट हास्य करीत माझ्याकडे येऊ लागल्या. अजून दीपानी दरवाज्या उघडला नव्हता. ताईंच्या ओठाच्या कोपऱ्यातून लाळ गळत असलेली दिसली. जणू एखादा पिसाळलेला कुत्राच . त्या जवळ आल्या आणि सुरा असलेला हात वर करून माझ्यावर उगारला. मी चपळाईने त्यांचा हात घट्ट पकडून सुरा काढून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. अजूनही दीपाने दरवाज्या उघडला नव्हता. तेवड्यात मला ढकलीत ताई भिंतीच्या दुसऱ्या टोकाला आल्या . आणि तिथे वरच्या कोनाड्यात हात घालून त्यांनी तेथील कळ दाबली असावी " खडर्र र्र ....." असा आवाज करीत भिंतीतला एक दरवाज्या उघडला आणि मी कोणत्यातरी मार्गामध्ये पडलो. ताईंनी त्या बोळकंडीतला लाईट लावला. आणी मला ढकलून आत सरकवण्याचा पयत्न करू लागल्या. मागून अचानक पप्पांचा आवाज आला , " गायत्री सोड त्याना. .... " पण गायत्री ऐकण्याच्या मूड मध्ये नव्हती. पप्पांच्या मऊ बोलण्याचा ताईंवर काहीही परिणाम झाला नाही. पप्पांनी ताईंची सत्ता फार वर्षांपूर्वीच मानलेली होती. आता विरोधाचा काही उपयोग होणार नव्हता. अचानक दीपाने दरवाज्या उघडला. ती ओरडली, " ताई सोड त्याला..... " आणि तिच्या हातातला सुरा काढण्याचा पयत्न करू लागली. ताईंचं लक्ष विचलित झालेलं पाहून मी त्यांना जोरात धक्का दिला आणि त्या बोळकंडी बाहेर पडल्या. मी चपळाईने उठून त्या बोळकंडी बाहेर आलो.. आता त्या पुन्हा मागे लागल्या. मी पटकन दीपाच्या खोलीत शिरून दार लावून घेतले.......
मी खिडकी लावून झोपायचा प्रयत्न करु लागलो. झोपेनी न येण्याचं ठरवलं असावं. मधेच मला डॉक्टर तिडबिडेंची आठवण झाली. कोण हा तिडबिडे ....? माझं डोकं चालेना. हे नाव कधीच ऐकलं नव्हतं. मला परत परत वाटू लागलं. आपण आत्ताच निघावं . कुठून तरी ताई खोलीतून बाहेर आली तर ? .........माझी आज रजाच होती. पण घरी वेळेवर गेलो तर विश्रांती तरी होईल. मी दीपाच्या खोलीत होतो. दीपा कुठे होती आणि पप्पा ? ताईला माझ्या खोलीत डांबलेलं होतं. माणसाला अतिशांतता आणि कशाचीही जाग नसलेली जागा आवडत नाही. मी अंथरुणावर पडलो होतो. किती वेळ गेला होता कुणास ठाऊक. मला लहानशी डुलकी लागली असावी त्यात स्वप्न पडलं . कोणीतरी एका मोठ्या हॉलचं कुलुप तोडीत होतं. लवकरच मला असं दिसलं की तो एक रानटी लोकांचा जमाव होता. त्यात माझी भूमिका मात्र समजत नव्हती. लांबून कुठूनतरी ढोल बडवण्याचा आवाज येत होता. हळूहळू कुलपावरचे घाव ऐकू येण्याऐवजी काहीतरी खरडल्याचा, घासल्याचा आवाज आता येत होता. अचानक स्वप्न नाहीसं झालं. दीर्घ मोठे श्वास कमी होत होते. मी कूस बदलली. अजूनही खरडण्याचा आवाज येत होता. तो माझ्या अगदी जवळून म्हणजे माझ्या जवळच्या भिंतीतून येत असावा. माझी झोप आता चाळवली आणि नाहीशी झाली . मी डोळे उघडले. अंधारात खोलीतल्या सामानाच्य कडा अर्धवट दिसत होत्या. आता भिंतीतला आवाज मोठा झाला. मी घाबरुन ताडकन् उठून बसलो. अंधारात मी " कोण आहे तिकडे ,,,,? असा प्रश्न फेकला. उत्तरादाखल फक्त खरडणं थांबलं. मी लाईट लावला. पिवळ्या उजेडात मला काहीच दिसेना. आता परत हळू आवाजात खरडणं चालू झालं. मी सावकाश त्या भिंतीला कान लावून उभा राहिलो. आवाज अचानक बंद झाला. .....भिंतीवर लहान आवाजात धक्के बसू लागले. मी काठीसारखं हत्यार शोधत होतो. आता माझी पाठ आवाजाकडे वळली होती.
पप्पांचा बिनधास्तपणा पाहून आणि लक्ष विचलित झालेले पाहून त्यांच्या हातावर हल्ला करीत हातातलं पिस्तूल खेचून घेण्याचा प्रयत्न केला. ते सावध झाले आणि मला दरवाज्याकडे ढकलून त्यांनी तोल सांभाळीत हातातलं पिस्तूल माझ्यावर रोखीत म्हंटलं, " आता तुम्ही ताईला खेचून जिन्याजवळ आणून खाली न्यायला मला मदत करा. अंगणात खड्डे खोदा. ". घालून दरवाज्या मैडून आत येईन. मग तर तू मेलासच समज. आता त्यानी घाणेरड्या शिव्या घालायला सुरुवात केली. ते आत आले तर त्याना दिसू नये म्हणून मी मेन फ्यूज काढून घेतले..आता आत पूर्ण अंधार झाला होता. जवळ मोबाईलही नव्हता की मी दीपाला किंवा पोलिसाना करु शकलो असतो.पप्पांच्या शिव्या चालूच होत्या त्यात त्यांनी एक गोळी तिचा दणदणीत आवाज वाडाभर घुमला. गोळीचा आवाज मी कधीच ऐकला नव्हता. आता मी त्यांच्याकडे लक्ष न देता . ओट्यावरची काडेपेटी शोधू लागलो. कीचनची रचना मला माहीत नव्हती. एक दोन वेळा भिंतीवर आपटलो ही. पप्पाचा नेम चुकला असावा. कारण दरवाज्या अजूनही शाबूत होता. काडेपेटी असायलाच हवी. कारण खेडेगावात गँस कसा असेल. कदाचित असेलही. मी कीचन पाहिलंच नव्हतं. असो . ओट्याखालच्या खणात अंदाजाने हात फिरवला. दोन चार डबे मोठ्ठा आवाज करीत खाली पडले. ते ऐकून पप्पांची शिव्यांची सरबत्ती पुन्हा चालू झाली. बाजूच्या दुसऱ्या खणात हात फिरवला पुन्हा डबे पडले . पण यावेळेस मात्र काडेपेटी पडल्यासारखा आवाज आला. कीचनच्या लादीवर पडून हात फिरवायला सुरुवात केली. अचानक एक बंडल हाताला लागलं. तर ते काडेपेट्यांचा बॉक्स निघाला. मी थरथरत्याहातानी काडी ओढली मला हॉलकडे जाण्याचा मार्ग दिसला . पुन्हा काढी ओढून जिना शोधला . कडी विझली. परत अंधार झाला. मी अंदाजानीच जिन्याकडे चाललो होतो. अचानक पायाखाली काय आलं कळलं नाही. अडखळून मी आडवा झालो. हातातला काडेपेटीचा बॉक्स फेला गेला. कसातरी उभं राहून मी तो बॉक्स शोधला. आणि काडी ओढून पाहिली. तर,,,,,जे पाहिलं त्यानी मी शहारलो. काडीच्या अंधुक प्रकाशात मला ताईंचा फुगलेला चेहरा आणि त्यांची माझ्याकडे पाहणारी कधी न बंद नहोणारी तटस्थ सताड नजर दिसली. पप्पांचा आवाज येत नव्हता. ते नक्कीच पुढच्या दरवाज्याने प्रयत्न करतील. मी हळूहळू तिकडे चालू लागलो. आता मलाच लाईटाची गरज भासू लागली . पण काडेपेटीतल्या काड्यांवर मी मुख्य दरवाज्या गाठला. बाप रे, केवढा दम लागला.ताईंच्या खांद्याखाली हात घालून ओढायला सुरुवात केली. त्यांचं वजन मुळातच जास्त असावं. एवढं वजन ओढण्याची मला संवय नव्हती. असल्या गोष्टी चित्रपटातच पाहिल्या होत्या. ताई तसूभरही हलल्या नाहीत. ते पाहून पप्पा पिस्तूल खिशात ठेवीत म्हणाले" अजिबात चलाखी करायची नाही समजलं ना . चला लावा जोर ." त्यांनी ताईंना पायांकडून उचलंल. जिन्यापर्यंत नेताना आम्हाला चांगलाच दम लागला. पप्पाना कसं अडकवायचं माझा प्लान चालूच राहिला. काहीतरी विचारायचंं म्हणून विचारलं, " पपा, राधाबाईना चुकवून कसं करणार ....?" त्यानी यावर आधीच विचार केला असावा. " अहो राधाबाईचीही मी सोय लावलीच असेल ना ....? , तुम्हाला काय वाटतं . " , सहजपणे मी विचारलं, " त्याना तुम्ही घरी पाठवलंच असेल. " ..... " हो पाठवलं की फक्त देवाच्या घरी. कारण त्याना स्वत:चं घर नाही. आधीच्या मालकानीच त्याना ठेवल्या होत्या. त्या विनापाश , विनापत्य,अनाथ विधवा. या जगात त्यांचा एकही नातेवाईक नाही.. विकत घेतल्यावर त्याना आणि सखारामला(म्हणजे सामान नेणारा ) आम्ही इथेच राहायला सांगितलं. राधाबाईंनी तर पाय धरले. कारण त्याना कुठेही आसरा नव्हता नवरा गेल्यापासून त्या वाड्याच्या सेवेतच होत्या. म्हणून तर दोन खड्डे खोदावे लागतील. उगाच का तुमची मदत हव्ये मला ? " , मी शहारलो. " म्हणजे त्यानाही तुम्ही मारलंत तर. " ..... " बिच्चारी, मला तिला मारणं भाग होतं हो. तसे तिचे माझ्याशी बायकोसारखे संबंध होतेच. पण काय आहे ना , माणूस खुनाच्या मामल्यात वफादार कसा राहणार , नाही का? तिला उगाच त्रास नको म्हणून तिची सुटका केली. " अचानक मला वॉशरुम जायची जाणीव झाली. पप्पाना सांगितल्यावर ते म्हणाले, " ओके बट नो चीटिंग हं. ते वॉशरुमच्या बाहेर उभे राहिले . तिथेच त्यानी चूक केली. मी आत जाऊन फ्लश सोडला आणि खिशातला मोबाईल काढून पोलिसाना फोन केला. " बोला, कोण ? ... "..... मी पुन्हा एकदा फ्लश चालू केला. " मी अविनाश सातपुते बोलतोय. इथे खून झालाय, बदामी वाडा. " आणि मी फोन कट केला . पँटची झिप लावतो न लावतो तोच पपा आत शिरले.
आणि पिसतूल माझ्या असं म्हणून त्यानी माझा मोबाईल खेचून घेतला. वॉशरुमच्या बाहेर आलो. आता ताईंना त्या नागमोडी अरुंद जिन्यावरुन वाड्याच्या पुढच्या भा गात घेऊन जायचं असावं. की मागच्या भागात ?. आता मी जिन्याच्या पायरीवर उभा होतो. ताईंच्या काखेत हात घालून उचलण्याचा प्रयत्न मी करीत होतो. आणि पप्पा ताईंचे पाय उचलीत म्हणाले, " पायरी सांभाळा, नाहीतर मागच्या पडलात तर तुम्हाला खोक पडायची. इथे तिडबिडेंशिवाय डॉक्टर नाही..डॉक्टरसाठी तालुक्याला जावं लागतं. अजून राधाबाईंना उचलायच्येत. तरुण असून तुमच्यात जोर फार कमी आहे. " मी त्यांचं बोलणं मनावर घतलं नाही. किती वाजत होते याचा अंदाज मला येत नव्हता. आम्ही ताईंना घेऊन उतरायला सुरुवात केली. ताई हळूहळू जड होत चालल्या होत्या.. आता टाइम त्यानाच विचारावा लागेल.. तेवढ्यात हॉलमधल्या घड्याळानी तीन ठोके दिले..माझं अंग आता चांगलंच दुखू लागलं. तेवढ्यात पप्पा ओरडले , " पोलिसाना बोलवताय ? "
कसेतरी आम्ही हॉलमधे आलो..ताईंना खाली ठेवल्या. दीपा जागी व्हावी असं मला सारखं वाटत होतं.मी इकडे तिकडे पाहत होतो. ते पाहून पप्पा म्हणाले, " चहा घेणार का ,थोडा ,,,? एवढे कष्ट केल्यावर थोडं उत्तेजक पेय्य हवंच , नाही का ? तुम्ही दारु पीत नाही मला माहिती आहे. " मी काहीच बोलत नाही असं पाहून ते पुढे म्हणाले, " ,चहा मीच बनवणार आहे. आणि काय आहे जाणारा जातोच हो. त्यामुळे जिवंत माणसाचं रुटीन थोडंच बदलंतय ? ". न राहवून मी म्हंटलं ," तुमच्या हातून दोन खून झालेले आहेत. दोन दोन प्रेतं समोर असताना, हे कसं सुचतं हो तुम्हाला. ? " मला आता उजाडेपर्यंत टाईमपास करायचा होता. दिवसाउजेडी पोलिस येण्याची जास्त शक्यता होती.माझं बोलणं त्याना फारसं आवडलं नाही. पण काही न बोलता ते कीचनकडे वळले. मी त्यांच्यामागे जाऊ लागलो. त्यानी कीचनमधला लाईट लावला. तिथे असलेली राधाबाईंची बॉडी गायब झालेली दिसली. ते न आवडून म्हणाले ," या राधाबाई गेल्या कुठे ? इथेच तर पडल्या होत्या. रक्ताचे डाग सगळीकडे दिसत होते. त्यांचा माग काढीत पप्पा त्याना शोधत होते. हातातलं पिस्तूल माझ्याकडे वळवून म्हणाले " चला मला राधाबाईना शोधायला मदत करा. हिला गोळीच घालायला हवी होती. " आम्ही शोधू लागलो. रक्ताचे मागच्या दरवाज्याशी येऊन दिसेनासे झाले. दरवाज्या अर्धवट उघडा होता. त्या नक्कीच मागच्या दरवाज्याने पळाल्या असणार. पण गेल्या कुठे . मागच्या दरवाज्यातून बाहेर जाणार एवढ्यात, मला त्यामागे मेन फ्यूज दिसले. पप्पा बाहेर पडले..मला त्यांनी बाहेर यायला सांगितलं. माझ्या वाड्यातले लाईट घालवले आणि पटकन् दरवाज्या लावून घेतला तर ते बाहेर अडकतील. मी विजेच्यावेगाने दरवाज्या लावून घेतला आणि आतून एकदाची कडी घातली. अंगच्या कुलुपावर अवलंबून राहण्यात अर्थ नव्हता. पप्पांकडे चावी असण्याची शक्यता होती . बाहेरुन त्यांचा करडा आवाज आला. " अविनाश दरवाज्या उघड. नाहीतर, बिजागिरींवर घालून दरवाज्या मैडून आत येईन. मग तर तू मेलासच समज. आता त्यानी घाणेरड्या शिव्या घालायला सुरुवात केली. ते आत आले तर त्याना दिसू नये म्हणून मी मेन फ्यूज काढून घेतले..आता आत पूर्ण अंधार झाला होता.
(क्रमशः)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा