Login

टाळी एका हाताने वाजत नाही भाग तीन

सासूबाई पाय घसरून पडतात
मागील भागात आपण पाहिलं कि, कीर्ती खोलीत बसून रडत होती.वादानंतर तिच्या डोक्यात एक-एक प्रसंग नाचू लागला.गरोदरपण, सीझरच दुखणं, एकटेपणा, सासूचे टोमणे…त्यातच तिला आठवलं ते सहा महिन्यांपूर्वीचं अपघाताचं दिवस...ज्या दिवशी सगळं बदललं.


कीर्ती स्कूटीवरून मार्केटला गेली होती.
परत येताना एका कारने अचानक ब्रेक मारल्यामुळे ती घसरली आणि जोरात रस्त्यावर आपटली.
हात, गुडघे आणि पाठ सगळीकडे खरचटलं.
दोन आठवडे तिला नीट चालतासुद्धा येत नव्हतं.

त्या दिवसांत तिला सर्वात जास्त आधार हवा होता…
काही क्षणाची काळजी, कोणीतरी कोमल हाताने डोक्यावर हात ठेवणं…

पण तिच्या सासूने एकदाही विचारलं नाही,

“काय झालं? कसं वाटतंय?”

उलट म्हणाल्या,

“कशाला पाहिजे स्कूटी चालवायची शौकं!
आता नाटकं करेल दोन आठवडे!”

कीर्तीचे डोळे त्या आठवणीने पुन्हा ओले झाले.

त्याच दिवशी तिची सासूबाई मोठ्या मुलाकडे गेली.  मोठ्या तोऱ्यात. कारण स्कूटीवरून पडलेली कीर्ती घरकाम करू शकत नव्हती. त्यामुळे तिला मदतीची गरज होती. पण तिच्या सासूला मात्र हे मान्य नव्हतं की ती सुनेची सेवा करेल. त्यांनी बॅग भरली आणि निघून गेल्या
कीर्ती दारातून बघत राहिली…त्या क्षणीच तिचं मन कायमचं दुखलं होतं.

इकडे त्या मोठ्या मुलाकडे पोहोचल्या…
तेथे कीर्तीची जाऊबाई मीरा सकाळी नोकरीवर जायची.
त्यामुळे तिथे तिच्या सासूला मात्र तिथे आळस करता येणार नव्हता.

मग सकाळच्या भाजीपासून भांडी, कपडे, धुणं
सगळं सासूबाईच करत होत्या.

पण तिथे त्या शब्दही बोलू शकत नव्हत्या
कारण विराज त्यांचा मोठा मुलगा व मीरा स्पष्ट बोलत असत.

“आई, इथे आली आहेस तर काम करावंच लागेल...तक्रारी करू नकोस आम्ही थकून येतो.. "


सासू मनात कुरकुर करत होत्या, पण तिथे त्यांना
‘मी काहीच करणार नाही’ असं म्हणता येत नव्हतं.


एक दिवस बाथरूम मध्ये कपडे धुताना त्यांचा पाय साबणावरून घसरला आणि त्या जोरात कोसळल्या.
घाबरून मीरा आणि विराज धावत आले. कमरेच हाड सरकलं होतं. दुखणं एवढं की चालताच येत नव्हतं.

विराज तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला.अॅडमिट करून त्याने डॉक्टरांना दाखवलं.

पण दुसऱ्या दिवशी ऑफिसमधील महत्वाच्या कामामुळे
विराजला निघावं लागलं.

तो कुणालला फोन करून म्हणाला,

“आई अॅडमिट आहे. पुढचं तू बघ… मी राहू शकत नाही.”


कुणालने शांतपणे कॉल कट केला आणि तो हॉस्पिटलला निघाला.


कीर्ती तिचा निर्णय बदलेल का???