मागील भागात आपण पाहिलं कि कीर्तीची सासू पाय घसरून पडले. आता पाहूया पुढे,
कुणालने सर्व प्रक्रिया केल्या.. हॉस्पिटलमध्ये सर्व कागदपत्रं, औषधं, नर्सिंग अगदी सगळं तो सांभाळत होता.
तेव्हाच डॉक्टरांनी सांगितलं,
“तुमच्या आईला घरी मदतीची गरज आहे.
कंबर आणि पायाला ताण देऊ नका.”
“तुमच्या आईला घरी मदतीची गरज आहे.
कंबर आणि पायाला ताण देऊ नका.”
कुणाल लगेच विचार करू लागला,
“आईला घरात आणल्यानंतर कोण सांभाळणार?”
त्याच्या मनात ताबडतोब एकच उत्तर आलं...
कीर्ती.
कीर्ती.
कारण त्या घरात ना वेळ सासऱ्यांना होता, ना त्याला
ना बाहेरून मदत घेणं शक्य होत मग
कीर्तीशिवाय कोण सांभाळणार?
ना बाहेरून मदत घेणं शक्य होत मग
कीर्तीशिवाय कोण सांभाळणार?
म्हणून त्याने घरी येऊन हे सगळं कीर्तीला सांगितलं तेव्हा तिने नकार दिला..कीर्ती हे सगळं आठवत बसली.
तिचं एवढंच म्हणणे होते,
तिचं एवढंच म्हणणे होते,
“मला गरज होती तेव्हा…
माझं बाळ गेलं तेव्हा....
मी ऑपरेशनवरून आले तेव्हा...
मी स्कूटीवरून पडले होते…
तेव्हा त्यांनी माझ्यासाठी काही केलं नाही…
आणि आज?
आज मला म्हणतायत,
‘तू नाही तर कोण करणार?’ ”
माझं बाळ गेलं तेव्हा....
मी ऑपरेशनवरून आले तेव्हा...
मी स्कूटीवरून पडले होते…
तेव्हा त्यांनी माझ्यासाठी काही केलं नाही…
आणि आज?
आज मला म्हणतायत,
‘तू नाही तर कोण करणार?’ ”
तिच्या डोळ्यांतून शांत अश्रू वाहत होते.
मी अशी वागते कारण एका हाताने टाळी वाजत नाही…ती आजवर जे काही करत आली… ते कधीच भीतीपोटी नव्हतं.ते तिच्या घरातून मिळालेल्या संस्कारांमुळे होतं.
मी अशी वागते कारण एका हाताने टाळी वाजत नाही…ती आजवर जे काही करत आली… ते कधीच भीतीपोटी नव्हतं.ते तिच्या घरातून मिळालेल्या संस्कारांमुळे होतं.
तिच्या आईने तिला शिकवलं होतं,
“घर म्हणजे कामाचं ओझं नाही,
घर म्हणजे आपली जबाबदारी.”
घर म्हणजे आपली जबाबदारी.”
इकडे कुणालला वाटायचं
"ती काही बोलत नाही म्हणजे तिला त्रास नाही.”
"ती काही बोलत नाही म्हणजे तिला त्रास नाही.”
पण कीर्तीचं शांत राहणं म्हणजे स्वीकृती नव्हती,
ते तिचं मन मारून केलेले कर्तव्य होतं.
ते तिचं मन मारून केलेले कर्तव्य होतं.
पण आज कुणाल शांत होता.भांडणानंतर त्याच्या मनात अनेक विचार चालू होते. तो पहिल्यांदा खऱ्या अर्थाने विचार करत होता…
कीर्ती इतकं का बोलली? वर्षानुवर्षे तिने काय सहन केलं असेल? हळू हळू त्याने शांतपणे विचार केला, तेव्हा त्याला देखील जाणीव झाली. तो हळूच कीर्तीच्या जवळ आला.
त्याचा आवाज हलका, पश्चातापानं भरलेला होता.
कीर्ती इतकं का बोलली? वर्षानुवर्षे तिने काय सहन केलं असेल? हळू हळू त्याने शांतपणे विचार केला, तेव्हा त्याला देखील जाणीव झाली. तो हळूच कीर्तीच्या जवळ आला.
त्याचा आवाज हलका, पश्चातापानं भरलेला होता.
“कीर्ती… काल तू म्हणालीस ‘एका हाताने टाळी वाजत नाही. मी तेच विचार करत होतो.
तू खूप एकटी पडलीस.
तू जे सांगितलं… ते कदाचित मी कधी समजून घेतलंच नाही.”
तू खूप एकटी पडलीस.
तू जे सांगितलं… ते कदाचित मी कधी समजून घेतलंच नाही.”
कीर्ती शांतपणे ऐकत होती.
कुणाल पुढं म्हणाला,
“तुला गरज असताना मी सोबत केली नाही...
तू स्कूटीवरून पडलीस तेव्हा…
आपल पाहिलं बाळ गेलं तेव्हा.....
हो, मी नवरा म्हणून कमी पडलो. माफ कर मला... आईपुढे मला तू दिसलीसच नाही..."
तू स्कूटीवरून पडलीस तेव्हा…
आपल पाहिलं बाळ गेलं तेव्हा.....
हो, मी नवरा म्हणून कमी पडलो. माफ कर मला... आईपुढे मला तू दिसलीसच नाही..."
असं म्हणून तो रडू लागला...
त्यावर कीर्तीने शांतपणे त्याला जवळ घेतल... आणि स्वतः देखील त्याच्यासमोर मोकळी झाली.... मनाने.... दोघेही शांत झाल्यावर पुढे काय करायचं हा प्रश्नच होता... कारण आता कुणालला स्वतःला आईने घरी यावं असं वाटत नव्हतं.... पण कीर्तीच शांतपणे म्हणाली,
" कुणाल, मी सकाळी रागात म्हणाली.... पण तू घेऊन ये त्यांना... कारण त्यांना माझी गरज आहे..... आणि गरज असताना साथ न दिल्यामुळे होणारा त्रास मी अनुभवला आहे तो दुसऱ्या कुणाला होऊ नये असं वाटतंय मला.....
"अग पण पुन्हा तुला त्रास झालेला मला आवडणार नाही...आपण दुसरा मार्ग काढू....ती परत तसंच वागली तर???. "
कुणाल तिचा हात हातात धरून म्हणाला,
"मी बघेन त्यांना … कारण माझे संस्कार तसे आहेत.त्यांना जस वागायचं तस वागू दे... ते त्यांचं संस्कार आहेत.."
कीर्तीचं म्हणणे ऐकून तिचा अभिमान वाटुन कुणाल आपल्या आईला आणायला निघून गेला, कारण त्याला विश्वास होता. कीर्ती त्याच्या आईला चांगल बघेल.... पण आता तो नवरा म्हणून कमी पडणार नाही हे त्याने मनातच ठरवलं.......
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा