तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 12
मागील भागात आपण पाहिले सूरजने बिल्लाला पकडले पण त्याला पोलीस स्टेशनवर नेले नाही. मयंक करिअरची चौकशी करत होता. चिकनाला समीरच्या माणसांनी पकडले. तिकडे अशोक आणि त्याच्या मित्रांना टॅटू आर्टिस्ट सापडली होती. अचानक प्रियांकच्या साखरपुड्याची बातमी ऐकून समीर अस्वस्थ झाला होता. आता पाहूया पुढे.
प्रियांकचा साखरपुडा? बातमी ऐकताच समीर अस्वस्थ झाला. तेवढ्यात त्याला प्रियांकचा मॅसेज आला.
"दिलेल्या ठिकाणी भेट आजच."
समीरला नक्की काय झाले ते जाणून घायचे होते.
समीरला नक्की काय झाले ते जाणून घायचे होते.
तो तयार होणार इतक्यात शाल्मली आली.
"अभिनंदन! तुझ्या तरुण मित्राचा साखरपुडा ठरला आहे."
तिने हसत बातमी दिली.
" हो,समजले. छान झाले. त्याच्या आयुष्यात आता एक काळजी घेणारी व्यक्ती येईल."
"अभिनंदन! तुझ्या तरुण मित्राचा साखरपुडा ठरला आहे."
तिने हसत बातमी दिली.
" हो,समजले. छान झाले. त्याच्या आयुष्यात आता एक काळजी घेणारी व्यक्ती येईल."
समीरने मनातील अस्वस्थता लपवत उत्तर दिले.
"श्लोक गेले पंधरा दिवस शाळेत गेला नाही. आज मी त्याला सोडायला जाणार आहे. तिथूनच पुढे काही कामासाठी जाईल."
"श्लोक गेले पंधरा दिवस शाळेत गेला नाही. आज मी त्याला सोडायला जाणार आहे. तिथूनच पुढे काही कामासाठी जाईल."
शाल्मली कॉफीचा कप ठेवत त्याला सांगत होती. श्लोक आणि शाल्मली जाताच समीर तयार होऊन बाहेर पडला.
सत्येन झोपेतून जागा झाला. अंगद रात्री कधीतरी घरी आला असणार. शास्त्रज्ञ असण्याबरोबर तो एक गायक होता. त्यामुळे अधूनमधून कार्यक्रम असत. तेवढ्यात काल पाहिलेले काहीतरी त्याला आठवले आणि त्याने हळूच अंगदच्या रूमचा दरवाजा उघडला. अंगद झोपला होता.
तेवढयात त्याचे लक्ष अंगदच्या डाव्या हाताकडे गेले. डेविल असे इंग्लिशमध्ये लिहिलेला टॅटू होता. सत्येनने हळूच कॅमेरा काढला आणि टॅटूचा फोटो काढला. सत्येन खोलीतून बाहेर आला.
असा विचित्र टॅटू त्याच्या हातावर आहे आणि आपल्याला गेले अनेक दिवस सोबत राहूनही काहीच माहीत नाही. आज संध्याकाळी त्याला विचारू असे ठरवून सत्येन अंघोळीला गेला.
मयंक शाळेला जायला तयार झाला. आज त्याला खाली सोडायला आजीला यावे लागणार होते.
"आजी,तू थांब घरीच. मी जाईल."
मयंकने उत्तर दिले.
मयंकने उत्तर दिले.
आजीला समजावून मयंक खाली निघाला. लिफ्टमधून बाहेर पडला आणि अचानक त्याच्या तोंडावर कोणीतरी रुमाल धरला. त्याबरोबर क्लोरोफार्मच्या वासाने मयंकची शुध्द हरपली.
सत्येन अंघोळ करून बाहेर आला. अंगद फ्लॅटवर नव्हता. तेवढ्यात त्याला रागिणी बाहेर पडताना दिसली. रागिणी आणि प्रियांका कामावर निघाल्या होत्या. त्याने रागिणीला हसून ओळख दिली. परंतु रागिणी कोणताही प्रतिसाद न देता बाहेर पडली.
तेवढ्यात प्रियांकाने तिला आपल्याला डिव्हाईन टॅटू स्टुडिओत जायचे असल्याचे सांगितले.
"प्रियांका,मी येते. कदाचित ती मुलगी अशोकला काही सांगणार नाही. पण मला तिच्याकडून माहिती काढून घेणे सोपे जाईल."
रागिणीने समजावले.
"प्रियांका,मी येते. कदाचित ती मुलगी अशोकला काही सांगणार नाही. पण मला तिच्याकडून माहिती काढून घेणे सोपे जाईल."
रागिणीने समजावले.
"हे बरोबर आहे. तसेही तुझा शॉट दुपारनंतर आहे."
प्रियांकाने तयारी दाखवली. निर्मात्याला कळवून रागिणी आणि प्रियांका टॅटू आर्टिस्टकडे निघाल्या.
इन्स्पेक्टर सूरज प्रचंड चिडला होता. त्याच्याआधीच कोणीतरी ब्लॅक रॅबीट नावाने काम करणाऱ्या पोरींना गायब केले होते. तिथे त्याला काहीही मिळाले नाही. बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन असल्याने इतर काहीच माहिती मिळणार हे ओळखून सूरज परत फिरला.
तेवढ्यात त्याने कदमांना आवाज दिला.
"कदम,थांबा. गाडीच्या टायरची खूण बघा. फोटो घ्या ही गाडी नक्कीच परदेशी बनावटीची आहे. सिग्नलला असलेल्या कॅमेऱ्यात आपल्याला पकडता येईल."
सूरज आनंदाने उडी मारून म्हणाला.
"साहेब, पूर्वा मॅडम आख्खा गुन्हेगार सापडला तरी कपाळावरची रेषा हलवत नसत."
कदम त्याला चिडवू लागले.
कदम त्याला चिडवू लागले.
"क्रुएला खडूस आहे पण क्यूट दिसते."
सूरज हळूच बोलला. तोवर कदमांनी फोटो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला होता.
सूरज हळूच बोलला. तोवर कदमांनी फोटो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला होता.
पूर्वा तिनही मुलींना घेऊन समीरच्या फ्लॅटवर पोहोचली. त्यांना तिघींना समोर बसवून तिने शांतपणे विचारले.
"ब्लॅक रॅबीट कोण आहे? हे फोन नंबर कोणाचे आहेत?"
तशा त्या मुली घाबरल्या.
"मॅडम,आम्ही साध्या घरातील मुली आहोत. संगणक क्षेत्रातील ज्ञान असूनही मनासारखी नोकरी नव्हती."
पहिली मुलगी गप्प झाली.
पहिली मुलगी गप्प झाली.
" त्यामुळे गेले सहा महिने हे काम करतोय आम्ही. देशातूनच केले जाणारे कॉल विशिष्ट तंत्रज्ञान वापरून विदेशातून आल्याचे भासवले जाते. नंबर सुद्धा वेगळा दिसतो."
दुसऱ्या मुलीने उत्तर दिले.
दुसऱ्या मुलीने उत्तर दिले.
"आम्हाला एका एजंटकडून काम मिळाले आहे. बाकी काहीही माहीत नाही."
तिसरी मुलगी बोलली.
तिसरी मुलगी बोलली.
"ठीक आहे. मग ब्लॅक रॅबीट नावाने जे कोणी कॉल करत आहे त्याचे भारतातील नंबर मला द्या."
पूर्वा थंड आवाजात बोलली.
पूर्वा थंड आवाजात बोलली.
"पण मॅडम,असे केले तर आमचा जीव जाईल."
मुली विनंती करू लागल्या.
मुली विनंती करू लागल्या.
"तुम्हाला मी आणले आहे याचा काहीच पुरावा कुठेही नाही. जर मला माहिती दिली तर मी सुरक्षित जाऊ देईल."
पूर्वा परत त्यांना समजावू लागली.
पूर्वा परत त्यांना समजावू लागली.
त्यानंतर मुलींनी ते चारही नंबर पूर्वाला दिले. पूर्वा त्या मुलींना परत डोळे बांधून आणि स्कार्फ बांधून बाहेर सोडून आली. मुलींना आपल्याला कोणत्या इमारतीत नेले व आणले समजलेही नाही.
प्रियांक अस्वस्थ होऊन समीरची वाट पहात होता. त्याला आपला पाठलाग होतोय अशी शंका होती. जवळपास तासाभराने समीर आला.
"प्रियु,काय आहे हे? तू साखरपुडा करणार आहेस?"
समीरने त्याला विचारले.
"प्रियु,काय आहे हे? तू साखरपुडा करणार आहेस?"
समीरने त्याला विचारले.
"काकांनी मला कोणतीच कल्पना न देता घोषणा केली. पण मी काहीही झाले तरी हे करणार नाही."
समीरच्या मिठीत शिरत प्रियांक बोलला.
समीरच्या मिठीत शिरत प्रियांक बोलला.
लवकरच दोघे एकमेकांत विरघळले. त्याचवेळी त्यांचे नाजूक क्षण कॅमेऱ्यात कैद होत होते. समीर आणि प्रियांक एकमेकांना दिलासा देत जवळपास पाच सहा तासांनी घरी निघाले.
त्याचवेळी समीरला त्याच्या माणसांचा फोन आला.
"सर,एका फोटोग्राफरला पकडला आहे."
समीरने पुढचा धोका ओळखला.
" त्याचा कॅमेरा,फोन आणि लॅपटॉप काढून घ्या. मी लगेच पोहोचतो."
समीर घाईने बाहेर पडला.
समीर घाईने बाहेर पडला.
अशोक,प्रियांका आणि रागिणी टॅटू गोंदवून घ्यायला पोहोचले. "कोणाला काढायचा आहे टॅटू?"
त्या मुलीने विचारले.
"मला काढायचा आहे."
अशोक उत्तर देत असताना ती मुलगी रागिणीकडे बघत होती.
अशोक कसा टॅटू हवा याचे वर्णन करू लागला.
"स्ट्रेंज,सेम असे दोन टॅटू मी काढले आहेत."
ती मुलगी रागिणीकडे बघत होती.
ती मुलगी रागिणीकडे बघत होती.
"आपण एक रील करूया?"
रागिणी म्हणाली.
रागिणी म्हणाली.
खुशीत येऊन ती मुलगी मग बोलू लागली.
"एक सायंटिस्ट होता. काय बरं नाव? येस अंगद."
असे म्हणून ती वर्णन करत होती.
तेवढ्यात अशोकने घरून आणलेले एक क्रीम हळूच हातावर लावले.
"ओ नो! तुझ्या हातावर रॅशेस आहेत. आज नाही काढता येणार."
ती मुलगी नाराज झाली.
परंतु रागिणीने तिला मस्त सेल्फी वगैरे देऊन खुश केले. तिथून बाहेर पडायला बराच वेळ लागला.
"अशोक,मी आज सुट्टी घेते. बाहेर जेऊ."
रागिणी हळूच म्हणाली.
रागिणी हळूच म्हणाली.
अशोक मस्त हसला.
सूरज रागाने लालबुंद झाला होता. एवढ्यात एक मॅसेज आला.
एका गटारात मुलगा सापडला आहे.
विशेष म्हणजे गळ्यावर वार होऊन सुद्धा तो जिवंत होता. एका सहृदय माणसाने वेळेत दवाखान्यात नेल्याने मुलगा वाचला होता. सूरजने आनंदाने कदमला मिठी मारली.
विशेष म्हणजे गळ्यावर वार होऊन सुद्धा तो जिवंत होता. एका सहृदय माणसाने वेळेत दवाखान्यात नेल्याने मुलगा वाचला होता. सूरजने आनंदाने कदमला मिठी मारली.
"कदम, पहिल्यांदा कोणीतरी वाचले आहे. चला आपल्याला नक्कीच माहिती मिळेल."
संध्याकाळ होऊन गेली तरी मयंक घरी आला नव्हता.त्याचे आई बाबा आल्यावर सगळीकडे फोन सुरू झाले. मयंक आज शाळेतही आला नव्हता. सत्येन घरी आला. लिफ्टमध्ये चढताना त्याने मयंक गायब असल्याचे ऐकले.
तो घरी आला. सत्येन एक संगणक अभियंता होता. त्याने सोसायटीचे सुरक्षा कॅमेरे हॅक केले. फुटेज पाहायला सुरुवात केली. मयंक लिफ्टमधून बाहेर पडताच त्याच्या तोंडावर ठेवलेला हात दिसत होता. सत्येनने फुटेज स्टॉप करून झूम केले. त्याला घाम फुटला. तो ओरडणार इतक्यात एक जोराचा आघात डोक्यात झाल्याने तो बेशुध्द झाला.
रागिणी आज खूप आनंदात होती. फिरून जवळपास रात्री बारा वाजता तो घरी जायला निघाली. मुन्नी तशी धीट असल्याने ती काळजी नव्हती. रागिणी पटपट चालत येत होती. अचानक तिला कोणीतरी मागे ओढले. मुन्नी तिचा हात धरुन उभी होती. मुन्नीने तिला समोर बघ असे सांगितले.
एक काळा मास्क लावलेली व्यक्ती सत्येनला घेऊन चालली होती. त्या व्यक्तीने गाडी चालू केली. रागिणीने मुन्नीला इशारा केला. दोघी गाडीत बसल्या. अशोकला लाईव्ह लोकेशन आणि मॅसेज करून तिने पाठलाग सुरू केला.
थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. अंगद हाच खरा खुनी असेल? समीरला कोण जाळ्यात अडकवत असेल? पूर्वा स्वतः ला निर्दोष सिध्द करेल? कोण जिंकेल गुन्हा की मैत्री? द्वेष की प्रेम?
वाचत रहा.
तमाच्या तळाशी दिवे पेटलेले.
©®प्रशांत कुंजीर.
तमाच्या तळाशी दिवे पेटलेले.
©®प्रशांत कुंजीर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा