तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 7
मागील भागात आपण पाहिले मुन्नीला सचिन घरी घेऊन आला. बिल्ला पळून जाण्यात यशस्वी झाला होता. समीर आणि शाल्मली दोघांत भांडणं झाले. हे सगळे वेगवेगळे तुकडे लवकरच एका रहस्याने जोडले जातील. पाहूया कसे.
प्रियांकचा आलेला मॅसेज पाहून समीरच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. त्याने स्वतः ला शॉवरखाली झोकून दिले. काल रात्री झालेले ते किळस आणणारे स्पर्श धुवून काढायचा समीरचा अट्टाहास होता. शरीर पाण्याने स्वच्छ होत गेले परंतु मनाचे काय? समीर अंघोळ करून आला आणि शांत झोपी गेला.
मयूर आणि स्नेहा झोपेतून उठले. आता तिथे कोणीच नव्हते. त्यांचे हातपाय बांधले नव्हते.
"मयूर,बाहेर जाऊन बघायचं का?" स्नेहाने विचारले.
मयूर दरवाजाजवळ गेला.
"स्नेहा,दरवाजा बंद आहे. जर मम्मी,पप्पांनी सांगितले असेल तर मग दरवाजा बंद का आहे?"
मयूर आणि स्नेहाला आता भिती वाटू लागली.
मयूर आणि स्नेहाला आता भिती वाटू लागली.
आजूबाजूला निरव शांतता होती. तेवढ्यात मयुरला हुंदक्यांचा आवाज आला.
"स्नेहा लिसन. इज समवन क्राईंग?"
"स्नेहा लिसन. इज समवन क्राईंग?"
मयूर आणखी लक्ष देऊन ऐकू लागला.
"येस,मयूर खरच कोणीतरी रडत आहे. कोण असेल?" स्नेहा आणि मयूर जरा घाबरले.
बिल्ला सुसाट वेगाने गाडी पळवत होता. थोड्या वेळाने पोलिसांचा पाठलाग थांबल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने गाडी बाजूला घेऊन थांबवली.
"हॅलो,आपून पोहोच गया. लोकेशन भेजो." बिल्लाने फोन ठेवला आणि लोकेशन आले.
बिल्ला शांतपणे गाडीत बसला. गाडी कर्जतच्या दिशेने धावू लागली.
"ह्याचा बंदोबस्त करायला हवा. जर हा पोलिसांना सापडला तर? नो,असे झाले तर आजवर आखलेला सगळा प्लॅन वाया जाईल."
बिल्लाच्या फोनवर लोकेशन पाठवताना समोरील व्यक्ती सावध झाली होती.
"मी सांगितले होते ह्या मुलीला पोलिसात द्या. काय नाव आहे हीचे? आई वडील आहेत का तुला?"
पूर्वा चिडली होती. तिचा पोलिसी ड्रेस आणि आवाज पाहून मुन्नी घाबरून गप्प बसली.
"पूर्वा,लहान मुलगी आहे ती. तिला थोडा वेळ देऊ. सांगेल ती सगळे." मनोज पूर्वाला समजावू लागला.
"बघ,तो सत्येन कुठेतरी गेला होता. येताना काहीतरी पार्सल आणले. काय असेल त्यात?" मयंकमधील गुप्तहेर जागा झाला.
पाचच महिन्यात सगळ्यांचा लाडका झालेल्या सत्येनबाबत मयंक साशंक होता.
"मयंक,तुझ काहीही असतं. किती छान आहेत ते अंकल." एक मित्र म्हणाला.
"मयंक,तुझ काहीही असतं. किती छान आहेत ते अंकल." एक मित्र म्हणाला.
"हेच,किती छान आहेत. पण काम काय करतात? त्यांचे आई बाबा आहेत का? त्याचे एफबी अकाऊंट पण नाहीय."
मयंक समजावत होता.
मयंक समजावत होता.
"व्हॉट? यू स्टॉक हिम?" सगळेजण ओरडले.
सगळ्यांनी मयंकचा विचार उडवून लावला. मयंक मात्र स्वतःच्या विचारावर ठाम होता. त्याने पुरावे शोधायचे ठरवले.
पूर्वा जेवण करत असताना तिला फोन आला. मड आयलंड भागात एक आणखी मृतदेह सापडला होता. पूर्वाने फॉरेन्सिक टीम आणि पोलीस पाठवले आणि स्वतः निघाली बिल्लाच्या मागावर. गाडीला लावलेला ट्रॅकर त्याचे काम अचूक करत होता.
"अजून प्रियांका आणि सचिन आले नाहीत. एकदा फोन करू का?" दिव्या विचारत असताना बेल वाजली.
दारात सचिन उभा होता आणि त्याच्या हातातून रक्त वाहत होते.
" सचिन काय झाले? रक्त कसे आले."
दिव्या दारातच ओरडली.
"मला आत तर घे आधी." सचिन कसेबसे बोलला.
दिव्या दारातच ओरडली.
"मला आत तर घे आधी." सचिन कसेबसे बोलला.
जवळपास तीन ते चार इंच जखम होती. संपूर्ण शर्ट आणि ब्लेझर रक्ताने भरले होते.
"सचिन! काय लागले हाताला?" अशोक आत येतानाच रक्त पाहून गडबडला.
सचिन थोडा वेळ शांत बसला.
"गाइज् मी स्टेशनवरून येत होतो. मधल्या रस्त्याने मी नेहमीच येत असतो. आज जरा जास्तच उशीर झाला होता. रस्त्यावर भयाण शांतता होती. तेवढ्यात एकजण रस्त्याच्या कडेला पोते टाकताना दिसला.
तो पोते फेकून आठ दहा पावले पुढे गेला. तेवढ्यात मला पोत्यातून मानवी पाय बाहेर आलेला दिसला. मी त्याला पकडायला पळू लागलो.
तसे त्याला समजले आणि तो पळू लागला. मी धावत त्याला गाठले आणि त्याचा उजवा हात पकडला. त्याचवेळी त्याने डाव्या हाताने चाकूने वार केला."
सचिन सगळी घटना सांगताना प्रचंड घाबरला होता.
"सचिन,चल आपण त्या पोत्यात नक्की काय आहे ते पाहू." अशोक आणि मनोज म्हणाले.
सचिन मात्र जाण्यास नकार देऊन म्हणाला,"आधीच आपण सहाजण असे एकत्र राहतो. त्यामुळे लोक काहीबाही बोलतात. त्यात ह्याची भर नको."
"सचिन म्हणतो ते बरोबर आहे. फारतर पुर्वाला येऊ द्या. मग आपण पाहू." दिव्याने सुचवले.
तेवढ्यात अशोकने जखम पाहिली. सुदैवाने फार खोल जखम नव्हती. त्यामुळे ड्रेसिंग घरीच करून सगळे पहाटे तीनच्या सुमारास झोपी गेले. पूर्वा रात्री घरी आली नव्हती. रात्री उशिरा झोपल्याने सगळे सकाळी उशिरा उठले.
"सचिन,हे बघ पुर्वाचा मिसकॉल पहाटे साडेतीन वाजता आला आहे." प्रियांका ओरडली.
प्रत्येकाने आपापले फोन चेक केले त्याच सुमारास प्रत्येकाला फोन केलेला होता. दिव्याने परत फोन लावला फोन आऊट ऑफ रेंज येत होता. तेवढ्यात अशोकला नलिनी म्हात्रेचा फोन आला.
ती फोनवर बोलत असतानाच अशोक ओरडला,"दिव्या टी.व्ही. लाव."
अशोकने फोन ठेवला आणि सगळेजण समोर झळकत असलेली बातमी पाहून स्तब्ध झाले. प्रसिद्ध मॉडेल नित्या मेहराच्या खुनाच्या आरोपात लेडी इन्स्पेक्टर पूर्वा पाटील अटकेत.
अशोकने परत नलिनीला फोन लावला."नलिनी हे काय आहे? पूर्वा आता कुठे अटकेत आहे?" अशोक विचारत होता.
"अशोक,पुढे न्यूज बघा. पूर्वा फरार आहे. पोलीस कधीही तुमच्यापर्यंत पोहोचतील. काही मदत लागली तर सांग. नक्कीच कोणीतरी पुर्वाला फसवले आहे."
नलिनीने फोन ठेवला.
नलिनीने फोन ठेवला.
समीर छान आनंदात होता. नित्याचे मारले जाणे त्याला सुटका वाटत होते. त्याने त्या आनंदात आज रात्री एका खास व्यक्तीला भेटायचे ठरवले होते.
तेवढ्यात त्याच्या मनात विचार आला. नित्याच्या फार्म हाऊसवरून किंवा लॉकरमधून व्हिडिओ किंवा फोटो पोलिसांना सापडले तर? आधी ते हस्तगत करायला हवे.
पूर्वा निर्दोष सिध्द होईल का? तिचे मित्र कशी मदत करतील? सचिनवर हल्ला सिरीयल किलरने केला असेल का? मयंकचा संशय खरा असेल का?
वाचत रहा .
तमाच्या तळाशी दिवे पेटलेले.
©®प्रशांत कुंजीर.
तमाच्या तळाशी दिवे पेटलेले.
©®प्रशांत कुंजीर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा