तमाच्या तळाशी दिवे पेटलेले भाग 9
मागील भागात आपण पाहिले पूर्वा आणि तिचे मित्र नाईलाजाने पोलिसांपासून दूर लपले. समीर देशमुख आणि पूर्वा यांच्यात काही गोष्टी ठरल्या. मयूर आणि स्नेहा बाहेर काही आहे का शोध घेत होते. आता पाहूया पुढे.
"समीर,मला सोडून जाऊ नकोस. मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय." प्रियांक म्हणाला.
समीरला आजही तो दिवस आठवत होता. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्या पुतण्याच्या आगमनाची ग्रँड पार्टी आयोजित केली होती. ऐन पंचविशीत अमेरिकेत मास्टर्स करून आलेला देखणा प्रियांक. आजूबाजूला अनेक सुंदर मुलींचे लक्ष त्याच्यावर होते.
तेवढ्यात पार्टीत एन्ट्री झाली समीर देशमुखची. पस्तिशी ओलांडूनही फिट अँड फाईन. त्या दिवशी हात मिळवताना मनेही जुळली.
अचानक प्रियांकच्या उष्ण श्वासाने समीर भानावर आला.
"आपल्याबद्दल तुझ्या काकांना बहुतेक माहिती झाले आहे." समीरने त्याला सांगितले.
"हो,त्यामुळेच इथून पुढे खूप जपून येत जा." दोघांनीही एकमेकांना निरोप दिला आणि समीरने फोन हातात घेतला.
"गायतोंडे,नित्याचा फोन पोलिसांनी ॲक्सेस करायच्या आत मला त्यातील माहिती हवी आहे."
समीरने फोन ठेवला आणि विसकटलेले केस व्यवस्थित करून गाडी सुरू केली.
रागिणी गाडीतून उतरली आणि बंगल्यात जाणार इतक्यात बिल्लाने तिला पकडले.
"मला मारून तू पळून जाते काय आता दाखवतो तुला."
बिल्ला तिला खेचू लागला तितक्यात त्याच्या डोक्यात फटका बसला आणि बिल्ला अलगद मनोजच्या हातात कोसळला.
त्याने रागिणीला आत ज्याचा इशारा केला. बिल्लाला सचिन आणि मनोज आत घेऊन आले. त्याला पाहताच मुन्नी घाबरली.
"हा बिल्ला हाय. माझ्या आईला लई तरास द्यायचा. मयूर आन स्नेहाला यानीच पळवल."
मुन्नी दिव्याला बिलगून रडू लागली.
"याच्या मागावर त्याचे पंटर असतील. इथे याला ठेवणे धोक्याचे आहे."
रागिणी चिंतेत म्हणाली.
"आपण ह्याला दुसरीकडे घेऊन जाऊ. त्याच्याकडून भरपूर माहिती मिळेल."
असे प्रियांका सुचवत असताना तीन ते चार वेळा एक कार बंगल्यासमोरून गेली.
मनोज आणि अशोक दोघांनी बिल्लाला नाईलाजाने समोरच्या गल्लीत फेकून दिले.
मयंक रात्री जेवून पटकन आपल्या खोलीत गेला. त्याने पार्सलचा फोटो काढून आणला होता. त्यातील सामान आणि करिअरचा शिक्का ह्यावरून शोध लागतोय का याची खात्री करायची होती.
मयंकने गुगलवर पार्सलवर लिहिलेल्या साहित्यातील यादीतील वस्तूंची नावे टाकली. माहिती समोर येताच मयंक घाबरला. धारधार सुरे आणि कात्र्या शिवाय इतर काही उपकरणे होती.
मयंकला आता खात्रीच झाली होती सत्येनच सिरीयल किलर आहे. उद्या कुरिअर ऑफिसमधून काही माहिती मिळते का पहायची योजना त्याने आखली.
मयूरने बाहेरील आवाज बंद झाल्याचा कानोसा घेतला आणि मग तो हळूच खिडकीची झडप खोलून बाहेर आला. बाहेर इतकी जागा होती की दुसऱ्या खिडकीजवळ जाता येईल.
"स्नेहा,शेजारच्या रुमच्या खिडकीत जाऊन बघू का?"
मयुरने विचारले.
मयुरने विचारले.
"बट,मयूर इट्स रिस्की." स्नेहा घाबरली.
तरीही मयूर तिचे काहीच न ऐकता हळूवार पाऊल टाकत शेजारच्या खिडकीत गेला. आतून रडण्याचे हुंदके येत होते.
मयूर खिडकी उघडणार इतक्यात त्याला दरवाजा उघडल्याचा आवाज आला. मयूर परत खोलीत आला. खिडकी पहिल्यासारखी लावली.
"स्नेहा, समवन इज देअर. आपण पहाटे जाऊन बघू. बाहेर कोणीतरी आहे."
मयूर आणि स्नेहा घाबरून गप्प बसले.
इकडे गायतोंडेने नित्याच्या फोनचा डाटा चोरला आणि तो समीरला सेंड केला. समीरने लगेच ठरल्याप्रमाणे पुर्वाला सगळी माहिती पाठवली. पूर्वा आता थोडी निवांत झाली होती. तिने थोडेसे खाऊन घेतले आणि तिचा पर्सनल नंबर ऑन केला.
रागिणीला आत घेऊन आल्यावर तिने सगळी कहाणी अशोक आणि त्याच्या मित्रांना सांगितली.
"बिल्लाकडे माझे व्हिडिओ आहेत. त्यामुळे मी नाईलाजाने."
रागिणी गप्प झाली.
"रागिणी,आता आम्ही तुझ्या सोबत आहोत." दिव्या म्हणाली.
"तुम्हाला काय मदत हवी आहे माझी?" रागिणीने विचारले.
" पूर्वा कुठे आहे याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही. पण पोलीस विश्वास ठेवणार नाहीत."
अशोक म्हणाला.
अशोक म्हणाला.
"एवढेच ना? प्रियांका माझ्यासाठी काम करते. तुम्ही सगळे दोन दिवस माझ्या कर्जतच्या बंगल्यावर होता. तिथे रेंज नसते."
रागिणीने सहज हा प्रश्न सोडवला.
रागिणी सगळे समजावून घरी जायला बाहेर पडली. तिच्यासोबत प्रियांका आणि मुन्नी दोघी गेल्या.
"हॅलो,अशोक मी पूर्वा बोलतेय."
पूर्वा नाही म्हंटले तरी थोडी घाबरली होती.
पूर्वा नाही म्हंटले तरी थोडी घाबरली होती.
"पूर्वा तू कुठे आहेस? तुझ्यावर हा खुनाचा आळ कसा?"
मनोज आणि सचिन बोलू लागले.
"गोळी माझ्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून झाडली गेली आहे. पण मी नित्याला मारले नाहीय. तिथे आमच्या तिघांच्या व्यतिरिक्त चौथी व्यक्ती होती. तुम्ही मला भेटा. कुठे ते योग्य वेळ आल्यावर सांगते."
पुर्वाने फोन बंद केला.
इतक्यात सचिन ओरडला,"बिंगो! आठवले."
"हळू,केवढ्याने ओरडला? जीव जाईल अशाने आमचा. काय झाले ओरडायला?" अशोक चिडला.
"ऐक,सकाळी ज्याने आपल्या कॉलनीत पोते टाकले त्याने माझ्या हातावर वार केला. मला चेहरा दिसला नाही. पण त्याच्या गळ्यावर आणि हातावर असे दोन टॅटू होते."
सचिन थांबला.
सचिन थांबला.
"सच्या,असे टॅटू असणारी लाखो लोक असतील मुंबईत."
मनोज खो खो हसत बोलला.
मनोज खो खो हसत बोलला.
"पण कितीजण डेविल म्हणजे सैतान हे नाव हातावर आणि लुसिफरचा टॅटू मानेवर काढतील?"
सचिन ठाम रहात म्हणाला.
सचिन ठाम रहात म्हणाला.
"त्यासाठी आपल्याला प्रियांकाची मदत लागेल. उद्या सकाळी शोधू. आता जरा झोपा. उद्या मीडियाच्या प्रश्नांनादेखील सामोरे जायचे आहे." अशोकने दोघांना थांबवले.
पूर्वा फरार घोषित झाल्याने मुंबई पोलिसांवर प्रचंड टिका होत होती. पोलिस आयुक्त शर्मा प्रचंड चिडले होते.
"आय वॉन्ट बेस्ट ऑफिसर फॉर इट." त्यांनी अधिकाऱ्यांना विचारले.
"देन,आफ्टर पूर्वा वुई हॅव इन्स्पेक्टर सूरज देशमुख." रजनी पाटीलने छद्मी हसून उत्तर दिले.
अकॅडमी ट्रेनिंग पासून सूरज आणि पुर्वाचे कॉल्ड वॉर सगळ्यांना माहीत होते.
"देन अपॉइंट हिम नाऊ." शर्मा आदेश देऊन निघुन गेले.
पूर्वा नित्याच्या फोन मधील माहिती तपासात असताना तिला तीन ते चार आतंरराष्ट्रीय नंबर वरून गेले वर्षभर नियमित फोन येत असल्याचे दिसले. आता यासाठी पुर्वाला टेक्नॉलॉजी एक्स्पर्ट लागणार होता. तिने हसून मनात नाव आठवले आणि झोपेच्या स्वाधीन झाली.
समीर आणि प्रियांक यांच्यातील नाते त्यांना संपवेल का?
मयूर आणि स्नेहा वाचतील का?
शेजारच्या खोलीत कोण असेल?
टॅटू काढलेली व्यक्ती सापडेल?
पुर्वाचे मित्र तिला वाचवू शकतील?
इन्स्पेक्टर सूरज सत्य शोधेल?
मयूर आणि स्नेहा वाचतील का?
शेजारच्या खोलीत कोण असेल?
टॅटू काढलेली व्यक्ती सापडेल?
पुर्वाचे मित्र तिला वाचवू शकतील?
इन्स्पेक्टर सूरज सत्य शोधेल?
वाचत रहा.
तमाच्या तळाशी दिवे पेटलेले.
©®प्रशांत कुंजीर.
तमाच्या तळाशी दिवे पेटलेले.
©®प्रशांत कुंजीर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा