तांदळाचे पापड
साहित्य- एक वाटी तांदूळ पिठ, एक चमचा हिरवी मिरची वाटलेली, चवीनुसार मीठ, एक चमचा जीरेपुड, ओवा, हिंग, एक चमचा पापडखार, खायचा सोडा चिमूटभर, तीळ आणि तेल.
कृती-
१) एक पेला तांदळाच पिठ घेणे.
१) एक पेला तांदळाच पिठ घेणे.
२) तेव्हढाच एक पेला पाणी घेणे ते जाड बुडाच्या पातेल्यात घालणे आधी त्याला तेल लावून घेणे.
३) नंतर पाण्याला उकळी आल्यावर त्यात हिंग, मीठ, पापडखार, खायचा सोडा, जीरेपुड, हिरवी मिरची वाटलेली, तीळ, ओवा हे सगळे साहित्य घालून एकत्र करून घेणे.
४) आता त्यात तांदळाच पिठ घालून दोन मिनिटे झाकण लावून घेणे.
५) गॅस बंद करून घेणे आणि आता झाकण काढून चांगले मिक्स करून घेणे लाटण्याच्या साहाय्याने.
६) आता हे पिठ हाताने चांगले रगडुन मळून घेणे.
७) याचे छोटे छोटे गोळे करून पुन्हा एकदा इडली पात्रात दहा मिनिटे वाफवून घेणे.
८) आता हे गोळे एक एक करून काढून चांगले रगडून मळून घेणे एका ग्लासच्या किंवा वाटीच्या साहाय्याने.
९) आता या पिठाचे छोटे छोटे गोळे करून प्लास्टिकच्या कागदावर घेऊन पापड मशिनमध्ये दाबून पातळ पापड करणे.
१०) साडीवर वाळत घालणे. चांगले दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवावे आणि त्यानंतर डब्यात भरून ठवणे.