क्लास सुटल्यानंतर अंकुर खूप विचार करत होता..का कोणास ठाऊक पण अंकुरच्या शांत मनात अचानक फुलपाखरू उडायला लागले होते..सतत तन्वी चा चेहरा आठवत होता त्याला..इतका की चालता चालता ठेच लागून पडला तो...
जेवताना , झोपताना सतत तिचाच विचार , तिचाच चेहरा..
एक दिवशी अभ्यासासाठी त्यांनी एकमेकांना नंबर दिला त्यांचा..आणि पहिल्यांदा सुरुवात झाली प्रेमाची कळी खुलायला..हळू हळू ते रोज एकमेकांशी बोलायला लागले , दोघे हुशार असल्यामुळे उशिरापर्यंत अभ्यास करायचे आणि तेही रोज एकमेकांशी बोलत बोलत..
अंकुर ला कळतच नव्हतं की तो हळू हळू तिच्या प्रेमात पडत चालला आहे..त्याला कळतच नव्हतं की तो तन्वी च्या स्वप्नात हरवत चाललाय ते.. एकदा अंकुर नेहेमीप्रमाणे निघाला शाळेत जायला..आणि नेहेमी प्रमाणे स्कॉलरशिप ला जाऊन बसला...क्लास सुरू झाला आणि टीचर ने शिकवायला सुरुवात केली...अचानक तन्वी शुभम शी बोलायला आणि तिला काही प्रश्न होते..शुभम आमच्याच वर्गात होता..आणि ते दोघे बोलत असताना अंकुर ने मधेच एक जोक मारला..आणि तन्वी त्याला बालिश बोलली सगळ्यांसमोर..तो शुभम त्याला चिडवायला लागला..अंकुर ला खूप वाईट वाटल आणि तो निघून गेला तिथून..
खूप दुःख झालं होतं त्याला , खूप जास्त वाईट वाटत होत त्याला..कारण ज्या मुलीबद्दल तो सतत विचार करत होता तीच अस बोलली त्याला...नंतर त्याचा क्लास असल्यामुळे तिथून तो निघून गेला.. ट्युशन क्लास मधे पण त्याला खूप वाईट वाटत होत....
रात्री तन्वी चा मेसेज आला त्याला ती त्याला मनापासून सॉरी बोलली..थोडा चिडला होता अंकुर पण त्याचा राग निवळला काही वेळाने..हळू हळू संवाद वाढत गेला मग..आणि त्यांच्यातल अंतर कमी होत गेल..अंकुर रोज स्कॉलरशिप च्या क्लास ला पहिल्या बेंचवर बसायचा कारण त्याला तन्वी या बाजूला जे बसायचं होत..तन्वी बाजूच्या पहिल्या बेंचवर बसायची ना..म्हणून..
पण त्याला हे माहित नव्हतं की तन्वी पण त्याच्या बाजूला बसता येईल म्हणून पहिल्या बेंचवर बसायची..
रविवार हा असा एकच दिवस असायचा ज्या दिवशी शाळेला सुट्टी असायची तर ट्युशन ला सगळे नवीन कपड्यात जायचे...आणि अंकुर ह्याच दिवसाची वाट खुप बघायचा कारण त्यादिवशी तन्वी ला नवीन कपड्यात बघता यायचा ना..मुलींची क्लास लवकर असायची आणि मुलांची नंतर आणि अंकुर ला हे बरोबर माहित होत की तन्वी कुठून जाते..कारण त्यांच्या क्लास ला दोन रस्ते होते जायला..एक पुलावरून आणि एक मंदिराजवळून..पण अंकुर ला माहित होत की तन्वी मंदिराजवळून जाते..म्हणून तो मुद्दामून तिथून यायचा...नेहेमीप्रमाणे आज पण तो तिथून च आला पण तन्वी काही त्याला दिसलीच नाही..उदास होऊन तो तसाच पुढे क्लास ला गेला..आणि जसा तो आत घुसला..तन्वी आतमध्ये उभी होती..त्यांच्या क्लास थोडा उशीरा सुटला होता...पण जस अंकुर ने तिला बघितलं बस... बघतच राहिला तो तिला..तन्वी एका सुंदर टॉप मधे उभी होती आणि तिचे केस मोकळे होते....जोरात हवेच येणार झुळुक तिच्या केसांना लागून जात होत..तिचे केस जणू समुद्राच्या लाटा वाटत होते..अंकुर तिला बघून वेडाच झाला होता..अंकुर पूर्ण वेळ आज क्लास मधे पुन्हा तिचा विचार करत होता..त्या रात्री अंकुर ने स्वतःमध्ये हिंमत तयार केली आणि तन्वी ला सांगितलं की तन्वी तू मोकळ्या केसात खूप सुंदर दिसत होतीस..
आणि आज तो दिवस नेहेमी सारख ते दोघे बोलत होते..आणि अचानक अंकुर ने विचारलं तुला कोणी आवडत का ? ती हो बोलली..अंकुर ला तिने विचारलं की तुला ? अंकुर बोलला हो आणि मग एकसोबत सांगू अस बोलत असतानाच त्यांनी एकमेकांच नाव घेतलं...आणि इथून सुरुवात झाली एका सुंदर प्रेमकथेची.....

भाग 3 : जर्नी बिगिन्स
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा