त्यांचं नातं असं खुलत चाललं होत जसा चैत्र महिन्यात आंब्याच्या झाडाला येणारा मोहर..एकमेकांबद्दाची काळजी इतकी वाढत चालली होती तन्वी च्या हाताला लागणाऱ्या टाचणी चा पण अंकुर ला त्रास व्हायचा..तन्वी पण अंकुरच्या प्रॉब्लेम्स ला स्वतःचे प्रॉब्लेम्स म्हणून घेऊ लागली होती..रोज सकाळी गुड मॉर्निंग ने सुरुवात आणि रात्र गुड नाईट ने संपायची..त्याचं नातं जणू लाजवून टाकेल आपल्याला इतक गोड झालं होतं..दोघेही आता 10 वी मधे आले होते..अभ्यासावर पूर्णपणे लक्ष देऊया अस त्यांनी ठरवलं होत..
त्याच वर्षी प्राविण्य वर्गाला ते दोघांचीच निवड झाली होती..त्यांचे मार्क्स खूप चांगले होते म्हणून..हे जेव्हा त्या दोघांना कळलं तेव्हा दोघेही खूप आनंदी होते..कारण आता त्या दोघांना एकत्र वेळ घालवायला मिळणार होता ना ! जाण्याच्या आदल्या दिवशी ते रात्री इतके उत्सुक होते..की फक्त त्याच गोष्टीवर बोलत होते..आणि तो दिवस आला..जाताना त्यांच्या शाळेचे सर त्यांना घेऊन गेले...तेव्हा इतका वेळ घालवता आला नाही त्यांना एकत्र..त्यापुढे दोन दिवस ते प्राविण्य वर्गासाठी राहणार होते...
पहिली रात्र..मुलींची आणि मुलांची झोपण्याची सोय वेगवेगळी केली होती..सगळे झोपायला निघून गेले..पण अंकुर गुपचुप बाहेर आला..त्याने त्याचा फोन काढला आणि तन्वी ला कॉल लावला..तिनेही लगेच उचलला..आणि दोघेही खूप वेळ बोलत होते..अंकुर नेहेमीप्रमाणे काहीतरी फाजील जोक मारत होता..आणि तन्वी त्यावर हसत होती..
जवळ जवळ रात्रीचे 2 वाजले होते..आणि ते दोघे अजूनही बोलत होते..नवीन नवीन खुललेलं प्रेम इतक सुंदर असत हे पहिल्यांदा समजलं त्यांना..प्रेम ही संकल्पना इतकी सुंदर असू शकते , त्यात इतकी शांतता असू शकते हे माहितच नव्हत दोघांना..
बघता बघता दोन दिवस संपले आणि तिथून निघायची वेळ झाली..ते दोघे एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी खूप उत्साही होते..खूप जास्त.
दुपारी त्यांना घ्यायला एक शिक्षक आले आणि तेव्हा त्या दोघांना कळलं की त्यांना बाईक ने प्रवास करायचाय...सर पुढे बसले आणि त्यांच्या मागे अंकुर आणि तन्वी एकटी मुलगी असल्या कारणाने ती सर्वात शेवटी बसली..प्रवास सुरू झाला..आणि अचानक स्पीड ब्रेकर आल्या कारणाने सरांनी जोरात ब्रेक मारला आणि त्याच वेळी तन्वी ने अंकुर ला घट्ट पकडले.. तस नव्हे हा..तिने त्याचा शर्ट घट्ट पकडला..आणि तेव्हा अंकुर ला खूप छान वाटल..त्याच्या मनात फुटणाऱ्या लाडूंचा आवाज इतका होता की तो मला शब्दात मांडता येणार नाही...

थोड्या वेळात नाशिक स्टेशन आलं आणि सरांनी बाईक थांबवली..आणि म्हणाले की इथून पुढे आपल्याला ट्रेन ने प्रवास करायचा आहे..हे ऐकून तर दोघांना अजून आनंद झाला..सर म्हणाले " मुलांनो मी जरा तिकीट काढून येतो तोपर्यंत तुम्ही प्लॅटफॉर्म वर जाऊन बसा.." हे ऐकून दोघेही प्लॅटफॉर्म वर गेले आणि तिथे असणाऱ्या बाकावर बसले...बस दोघे एकमेकांकडे बघून गोड हसत होते.. अचानक अंकुर बोलला की चल फोटो काढुया. त्यावर तन्वी म्हणाली "हो चालेल ना.." एक छानसा सेल्फी त्यांनी काढला आणि ह्या नवीन नात्याच्या गोड आठवणींच्या पुस्तकात जोडला..नात्यातली प्रत्येक गोष्ट , प्रत्येक आठवण जपणं खूप गरजेचं असत कारण त्याच आठवणी , त्याच गोष्टी तर नातं टिकवून ठेवत असतात..आणि हे त्यांना पुरेपूर माहित होत..
थोड्या वेळात सर तिकीट काढून आले..आणि ट्रेन पण तितक्यात आली..दोघांनी ट्रेन बघताच एकमेकांकडे पाहिले..आणि डोळ्यांच्या इशाऱ्याने एकमेकांना सांगत होते.."आपण तर एकत्र बसूया अस ठरवलं होत ना..ट्रेन तर पूर्ण भरली आहे..आता लस बसणार आपण एकत्र.." तितक्यात सर म्हणाले "चला मुलांनो आतमध्ये..बरीच गर्दी दिसतेय आज.."
आत जाताच गर्दी इतकी होती की सूर्यप्रकाश आत येतच नव्हता..थोड पुढे जाताच एक जागा खाली भेटली तिथे तन्वी ला सर म्हणाले बसून घे.. तन्वी बसली आणि अंकुर कडे बघत म्हणाली "आता कस बसणार एकत्र ?" तेवढ्यात एक वरची जागा खाली झाली तर सरांनी अंकुर ला वरती बसायला सांगितलं..आता तर काय काहीच पर्याय नव्हता..म्हणून अंकुर वरती जाऊन बसला.. गर्दी असल्यामुळे काहीच बोलता येत नव्हतं.म्हणून अंकुरने तन्वी ला मेसेज केला.."काय मग बसलीस का ? येऊ का बाजूला बसायला ?" त्यावर तन्वी म्हणाली "हो येना ! बघ असेल हिंमत तर" दोघे एकमेकांकडे बघून हसायला लागले..दोघांनी बोलणं असंच सुरू ठेवलं..जशी खूप गर्दी व्हायची तशी तन्वी दिसणं बंद व्हायचं..तेव्हा अंकुर जे प्रयत्न करत होता तिला बघण्यासाठी.. वाह! वाह! क्या ही बोले !
एकमेकांना बघण्याची ओढ..एकमेकांशी बोलण्याची ओढ हे सिद्ध करत होती की त्याचं प्रेम किती खरं आणि निर्मळ आहे..
थोड्याच वेळात ट्रेन इगतपुरी स्थानकावर येऊन थांबली..आणि दोघे उतरले.. आणि घरी पोहोचले..दोघे खूप थकले होते त्यामुळे लवकर झोपायला गेले..पण त्या रात्री दोघे पण हाच विचार करत होते की ही आठवण कशी जपून ठेवता येईल..अशी की ती कायम लक्षात राहील..
हा छोटासा प्रवास त्यांच्या नात्याला अजून घट्ट बनवून गेला होता हे त्यांनाच माहीत नव्हतं....

हळू हळू 10 वी ची परीक्षा जवळ आली..आणि एकमेकांना ऑल द बेस्ट करून ते पहिल्या पेपर ला गेले..आणि हळू हळू परीक्षा पण संपली.. लावलेली ट्युशन क्लास सुद्धा 2 ते 3 दिवसात बंद होणार होती...म्हणून ट्युशन क्लासेस ने शेवटची पिकनिक ठेवली..आणि तीच ती पिकनिक जिथे अंकुर पुन्हा एकदा तन्वी च्या प्रेमात पडला..
सकाळी 8 वाजता सगळेजण ट्युशन क्लासेस जवळ मस्त नवीन कपडे घालून आले होते..अँड अवर हिरो अंकुर हा पण नवीन कपडे घालून आला होता..मुद्दामून तोच शर्ट घालून आला होता ज्यात तन्वी ला तो खूप आवडतो..पिकनिक साठी दोन बसेस केल्या होत्या..एक मुलींसाठी आणि एक मुलांसाठी..बस सुरू होईपर्यंत अंकुरने खूप वाट बघितली पण तन्वी काही त्याला दिसली नाही..तो तिला बघायला इतका उत्सुक होता..जितका तो पिकनिक साठी पण नाही..तो येण्याचं कारणच तन्वी होती..पण तन्वी काही त्याला दिसलीच नाही...
बस सुरू झाली..सगळेजण मस्तपैकी गाण्यांच्या भेंड्या खेळत होते , मजा मस्ती करत होते..पण अंकुर मात्र एकाच विचारात हरवला होता की तन्वी कुठे असेल..? ती आली असेल ना ? आली असेल तर कोणते कपडे घालून आली असेल ? किती सुंदर दिसत असेल ? असे हजार प्रश्न पडत होते त्याला.. आणि अखेर त्या प्रश्नांचं उत्तर त्याला आता मिळणार होत..थोड्याच वेळात बस पिकनिक ठिकाणी पोहोचली..मुलांची बस पुढे असल्यामुळे ते पहिले पोहोचले..सगळे मुल उरले आणि अंकुर सुद्धा...काहीच क्षणात मुलींची बस आली..हळू हळू सगळ्या मुली उतरल्या..पण तन्वी दिसत नव्हती..अंकुर ला खूप टेन्शन यायला लागलं..

आणि तितक्यात झाली आपल्या हिरोईन ची एन्ट्री....... मिस तन्वी
बस मधून उतरताच क्षणी अंकुर चे डोळे दिपले..तो गुलाबी रंगाचा वन पीस...जास्त नाही पण थोडासा केलेला मेकअप , छोट्याश्या ओठांवर लावलेली गडद लाल रंगाची लिपस्टिक , हवेच्या झुळुकामुळे उडणारे मोकळे केस.. बापरे बाप...अंकुर तिला इतक टक लाऊन बघत होता जणू काही त्याच्या मागे एखाद रोमँटिक गाण सुरू आहे आणि तो तन्वीला आणि स्वतःला त्यात इमॅजिन करतोय...आणि तीच ती वेळ जेव्हा अंकुर पुन्हा तिच्या प्रेमात इतका पडला..की त्याला त्या क्षणी फक्त गुलाबी रंग दिसत होता आजुबाजूला..

सगळेजण खूप मजा करत होते..आणि आपले हे दोन लव बर्ड्स एकत्र वेळ कसा घालवता येईल ते शोधत होते..मग सोबत व्हॉलीबॉल खेळण असो किंवा मग अजून काही.. बरंच खेळून झाल्यानंतर सगळे जेवण करायला गेले..दोघे जेवताना सुद्धा एकमेकांकडे गुपचुप बघून हसत होते..इथे अंकुर मात्र सकाळ सकाळ स्वप्न बघत होता..की तन्वी त्याला बाजूला बसुन भरवतेय..तेवढ्यात ट्युशन सर आले आणि अंकुर ला विचारलं "काय रे काय हसतोय गालातल्या गालात.." तेव्हा अंकुर दचकून म्हणाला "काही नाही सर"...
बघता बघता दिवस कसा संपला कळलच नाही...सगळे पुन्हा बसमध्ये बसले आणि घरी निघाले..बस थेट ट्युशन क्लासेस जवळ थांबली..सगळे मुलं उतरले आणि शेवटची भेट म्हणून फोटो काढायला लागले..तो मात्र तिथून निघाला..त्याला खरंच तन्वी सोबत घरी जायचं होत..पण तन्वी तिच्या मैत्रिणीसोबत होती..म्हणून तो तसाच पुढे गेला..
हा विचार करत की शेवटची भेट होती..तन्वी ला भेटता नाही येणार आता..तेवढ्यात दुरून एक हाक आली.."अरे थोडा हळू चाल !" तन्वी म्हणाली..अंकुर लगेच थांबला..आणि दोघे एकत्र चालू लागले..बोलत बोलत..."बघता बघता शाळा आणि ट्युशन कधी संपली कळलच नाही ना" अंकुर म्हणाला. "हो ना" तन्वी म्हणाली. दोघेही एकमेकांकडे बघून इतके गोड लाजत होते ना..की काय सांगू..पण आता तन्वी च घर आलं..रस्ता क्रॉस केला की तीच घर होत..अंकुर ला आतून खूप वाटत होत हे बोलावं की नको जाऊ ना तन्वी...पण बोलू नाही शकला..पण तन्वी रस्ता क्रॉस करणारच तेव्हढ्यात त्याने तिचा हात पकडला आणि मग रस्ता क्रॉस केला दोघांनी..तो पहिल्यांदा पकडलेला हात..पुन्हा कितीही संकट आली तरी सोडणार नाही..हा विश्वास होता त्या हातात..ह्या मुलीला प्रेम काय असत ? एखाद्या मुलीसोबत लॉयल असण काय असत..? आणि ती माझी जबाबदारी आहे हा हक्क त्यातून दिसत होता..नाही तर अंकुर ला तो दाखवायचा होता..त्याला सांगायचं होत की तन्वी तू हे आहेस माझ्यासाठी..
रस्ता क्रॉस केला..आणि एक गोड बाय करत तन्वी घरी गेली..

आता इथून पुढे सुरू होणार आहे लाँग डिस्टन्स रिलेशनशिप...
भाग 4 - लाँग डिस्टन्स रिलेशनशिप
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा