नाशिकमधील इगतपुरी तालुक्यात एक प्रसिद्ध शाळा होती तिचे नाव महात्मा गांधी हायस्कूल बरेच मुले त्या शाळेत शिकण्यासाठी यायचे , अगदी बाहेरच्या गावातील देखील मुले ह्या शाळेत चांगलं शिक्षण घ्यायला यायचे. पण त्याच शाळेच्या बाजूला होती त्याच संस्थेची शाळा नूतन मराठी शाळा ज्यात पहिली ते चौथी वर्ग होते..
ओळख देणं गरजेचं होत कारण ह्याच शाळेपासून सुरू होते आपल्या प्रेमकथेची सुरुवात..
दरवर्षी सारखे ह्यावर्षी देखील पहिली मधे बऱ्याच मुलांनी प्रवेश घेतला
आणि त्यातच होते आपले हिरो आणि हिरोईन म्हणजेच अंकुर आणि तन्वी.. 2 वर्षांनंतर ते दोघे तिसरी ह्या वर्गात पोहोचले..अंकुर हा अभ्यासात मध्यम असणारा , लाजाळू आणि कोणावरही ओरडून न बोलणारा असा मुलगा होता...ह्याच विरुद्ध तन्वी ही खूप आत्मविश्वास असणारी..नाटकात आवड असणारी आणि अतिशय हुशार अशी मुलगी होती..
आणि त्यातच होते आपले हिरो आणि हिरोईन म्हणजेच अंकुर आणि तन्वी.. 2 वर्षांनंतर ते दोघे तिसरी ह्या वर्गात पोहोचले..अंकुर हा अभ्यासात मध्यम असणारा , लाजाळू आणि कोणावरही ओरडून न बोलणारा असा मुलगा होता...ह्याच विरुद्ध तन्वी ही खूप आत्मविश्वास असणारी..नाटकात आवड असणारी आणि अतिशय हुशार अशी मुलगी होती..
शाळेचे सर हुशार मुलांना मॉनिटर बनवायचे आणि त्यांना बाकीच्या मुलांवर लक्ष द्यायला लावायचे..एक दिवस नेहमीसारखा अंकुर शाळेत गेला आणि तन्वी मॉनिटर होती..तन्वी एक कविता गात असताना अंकुर ने तिला पाहिले आणि त्यांनी पहिल्यांदा एकमेकांकडे लक्ष देऊन पाहिले..त्यानंतर अंकुर एका फंक्शनल इंग्लिश कोर्स मधे होता त्याच कोर्स मध्ये तन्वी सुद्धा होती..त्या कोर्स चे वेगळे क्लास व्हायचे. त्या क्लास मध्ये फक्त तेच मुल असायचे ज्यांनी तो कोर्स घेतला आहे म्हणून मग मुलांची संख्या थोडी कमी व्हायची..
त्या कोर्समुळे तन्वी आणि अंकुर मधे ओळख वाढत गेली..ओळख म्हणजे तशी नव्हे...एकदिवशी तन्वी ला एक प्रश्न पडला त्याच उत्तर तिने अंकुर ला विचारलं पण अंकुर ने सांगितलं नाही तर तन्वी ने जोरात फटका मारला...अंकुर ला तो इतका जोरात लागला की काय सांगू..अस बरेचदा घडत गेल..
अंकुर ची आई त्याला घ्यायला यायची..तो तर नाही सांगायचं काही पण शाळेतील बाकी मुले त्याच्या आई ला सांगायचे की तुमच्या मुलाला तन्वी मारते..त्याची आई विचारायची त्याला पण तो मात्र जास्त काही बोलायचा नाही..
हळू हळू चौथी आली...चौथी मधे जवळीक खूप वाढली..पण तन्वी काही अंकुर ला मारण सोडायची नाही..तिचा स्वभावच असा होता जणू काही टॉम बॉय..पण इकडे अंकुर ला वेगळ्याच गोष्टीवरून मुलं चिडवू लागले होते..शाळेत एक अजून हुशार मुलगी होती तन्वी पेक्षा थोडी जास्त तेव्हा..तीच नाव होत विधीता..सगळे मुल अंकुर ला त्या मुलीवरून चिडवायचे..खूप जास्त कारण विधीता नेहेमी त्याच्या जवळ बसायची , त्याच्याशी बोलायची म्हणून मूल अंकुर ला चिडवायला लागले.
अंकुर ला काहीच वाटत नव्हत तिच्याबद्दल तेव्हा शेवटी लहान होता तो खूप..पण सुरुवात इथूनच झाली.
हळू हळू चौथी झाली सगळे पुढच्या वर्गात गेले..म्हणजेच महात्मा गांधी हायस्कूल मध्ये..
पाचवी मध्ये प्रवेश घेताच अंकुर ने खूप अभ्यास करायला सुरुवात केली.
खूप जास्त वेगाने तो अभ्यास करायला लागला आणि पाचवी मध्ये पहिला आला..इथून त्याला एक ओळख मिळाली..सगळे शिक्षक त्याला ओळखू लागले आणि तन्वी पण त्याला पुन्हा ओळखू लागली..पुढे सहावी मधे तन्वी पहिली आली आणि तिला पण लोक ओळखू लागले..अंकुर पण तिला नोटीस करू लागला.. फंक्शनल इंग्लिश कोर्स तर होताच पण स्कॉलरशिप नावाने पण एक परीक्षा होती त्यात पण अंकुर ने भाग घेतला होता..आणि त्यात तन्वी सुद्धा होती..मुलांची शाळा सकाळी सात ते बारा असायची आणि मुलींची दुपारी बारा ते पाच म्हणून स्कॉलरशिप चे क्लासेस सकाळी अकरा ते बारा ह्या वेळेते व्हायचे..
अंकुर आणि त्याचे मित्र 11 ला 5 मिनिटे असली की वर्गातून बाहेर यायचे आणि जिथे क्लास होणार असेल तिथे जायचे..आणि मुली कोचिंग क्लासेस मधून यायच्या आणि मग स्कॉलरशिप चा क्लास सुरू व्हायचा..तन्वी आणि अंकुर एकमेकांशी बोलायला लागले..जास्त नाही पण अभ्यासाच्या निगडीत थोडफार बोलायला लागले..
अंकुरही त्याच कोचिंग क्लासेस ला जायचा..एक दिवस असाच तो क्लास ला जात असताना तेव्हाच मुलींची क्लास सुटली होती..आणि तन्वी लाइट ग्रीन कलर चा टॉप घालून आली होती त्याने तिला बघितलं आणि बघताच बघतच राहिला..पहिल्यांदा त्याने कुठल्यातरी मुलीकडे इतक टक लाऊन बघितलं होतं..तो तिच्याकडे अस बघत होता जणू काही स्वर्गातून परी आली असेल खाली..त्याच हृदय इतक जोरात धावत होत जशी ट्रेन रुळावरून..आणि तन्वी त्याच्याकडे बघून खूप गोड हसली..आणि गेली..पण अंकुर च्या मनात पूर्ण क्लास मध्ये तोच विचार सुरू होता फक्त तन्वीचाच..नेहेमी सर्वात पहिले गणितं सोडणारा आज सर्वात उशीरा दाखवत होता..
भाग 2 : प्रेमाची खळी खुलणं...(लवकरच)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा