Login

अंतिम भाग : पहिला..

प्रेमकथा जी..सत्यात उतरावी...
नेहेमीप्रमाणे रोज ते दोघे बोलत होते...आणि अचानक काहीतरी गोष्टीवरून त्यांचा वाद झाला..तन्वी ला वाईट वाटल त्याच..अंकुर ला ते समजलं आणि म्हणून त्याने एक प्लॅन बनवला..तो म्हणाला की उद्या मी बाहेर चाललोय मित्रांसोबत..तर सकाळी तुला व्हिडिओ कॉल करेन तू उचल हा तो..त्यावर तन्वी म्हणाली हो चालेल..अंकुर म्हणाला की घरात उचलता नाही येणार ना तुला..तर तू घराबाहेर येऊन उचल..मित्रांशी भेट घडवून देईन..तन्वी म्हणाली हो चालेल ठीक आहे..अंकुर म्हणाला की 11 वाजता ये बाहेर बरोबर..दुसऱ्या दिवशी अंकुर सकाळी 7 वाजता ट्रेन मधे होता..इगतपुरी ला निघाला...त्याचा प्लॅन होता की तन्वी ला जाऊन सरप्राइज देऊया..तन्वी खूप आनंदी होईल...

थोड्या वेळातच अंकुर इगतपुरीला उतरला..आणि त्याने तन्वी ला मेसेज करून सांगितलं की 5 मिनिटात तुला व्हिडिओ कॉल करेन..तर तू बाहेर ये हा..त्यावर तन्वी म्हणाली हो चालेल..इथे अंकुर इगतपुरी स्टेशन ला जसा उतरला..त्याला खूप धाकधूक होत होती..पहिल्यांदा तो तन्वी ला सरप्राइज देणार होता..ते नीट होईल ना..काही प्रोब्लेम तर येणार नाही ना..असे खूप विचार त्याच्या मनात सुरू होते... पुढच्या 5 मिनिटात अंकुर तन्वी च्या घराजवळ पोहोचला..आणि मेसेज करून सांगितलं की मी व्हिडिओ कॉल करतोय तू बाहेर ये...

आणि तन्वी जशी बाहेर आली..अंकुर ने तिला सरप्राइज दिलं..तन्वी अचानक इतकी आनंदी झाली..की तीच सगळ दुःख दूर गेलं होत..आणि हे पाहून अंकुर पण खूप आनंदी झाला होता..त्याला खूप वाटत होत की तन्वी ला आता घट्ट मिठी मारावी...पण आजुबाजूला लोक पाहून तो थांबला...पण एकमेकांचा हात हातात घेऊन ते व्यक्त करत होते की कितीही दूर असलो तरी त्याचं प्रेम किती जास्त आहे ते..
त्या सुट्टीमध्ये अंकुर तन्वी ला जाऊन खूप वेळा भेटला..त्याचं प्रेम इतक खरं होतं की ह्या जनरेशन ला लाजवेल.. सगळेजण सिच्युएशनशिप मध्ये अडकून बसलेत पण इकडे गोड प्रेम तयार होत होतं..

अंकुरची जाण्याची वेळ आली..तो पुन्हा मुंबई ला जाणार होता..दोघांची एकमेकांपासून दूर राहण्याची इच्छा आजिबात नव्हती..फक्त परिस्थितीमुळे ते करावं लागत होत..प्रत्येकवेळी जाण्याआधी मारलेली मिठी..दोघांच्या लक्षात रहायची..दोघ त्या मिठीचा वापर आधारासाठी करायचे..पुढच्या भेटीपर्यंत जपून ठेवायचे..ह्यावेळेस सुद्धा एक घट्ट मिठी मारून अंकुर निघाला..ह्या अंकुरचे तर वेगळेच नखरे असायचे..रात्री झोपताना..उशी जवळ घ्यायचा..आणि विचार करायचा जणु तन्वीच आहे जवळ...नंतर उठून स्वतःच लाजायचा...

सकाळचे 7 वाजले होते...अंकुर ट्रेन मधून मुंबईसाठी निघाला होता..
नेहेमीप्रमाणे निघाल्या नंतर तन्वी ला मेसेज करून ठेवला होता की निघालोय मी... पोहोचलो की पुन्हा मेसेज करेन..
तन्वी तो पाहताच.."हम्म..चालेल... सांभाळून जा "..असा मेसेज केला..
अंकुर ट्रेन मधे फक्त हाच विचार करत होता की पुन्हा तनु ला कधी बघता येईल..भेटणं तर गरजेचं होतंच..पण त्यापेक्षाही गरजेचं तन्वी ला पाहण होत...माहित नव्हतं त्याला की ही त्याची शेवटची चांगली भेट असेल....दुपार होत आलेली..आणि अंकुर काहीच वेळात घरी पोहोचला..आणि तन्वी ला पोहोचलो असा मेसेज करून झोपून गेला..
काही दिवसांनी..त्यांच्यात काही कारणाने भांडण झालं..खूप भांडले..पण काही वेळाने पुन्हा जवळ आले..पण एकाच विषयावरून सतत भांडणं व्हायला लागली..दोघे एकमेकांचे मत मांडायला लागले..पण भांडणं होतच राहिली..तन्वी ला वाटत होत की अंकुर स्वतःचे मुद्दे कसे बरोबर आहेत किंवा तो ते लादण्याचा प्रयत्न करतोय..
आणि अंकुर ला कळत नव्हत की तो काय चूक करतोय ते..

अंकुर त्याच्या आत्याकडे राहत होता..सकाळी लवकर 7 वाजता उठून अंघोळ करून...स्वतःच डबा भरून , सगळ आवरून..पटकन निघायचा..कारण 8.15 ला बस असायची..कधी कधी नव्हे तर आठवड्यातून 4 दिवस तर तो नाश्ता न करताच जायचा.. बस मध्ये गर्दी असल्यामुळे उभ राहून जाव लागायचं..बर स्टेशन ला पोहोचलं की तिथून लोकल पकडून जावं लागायचं..त्यात पण खूप गर्दी असायची..कॉलेज मधून जवळ जवळ रोज संध्याकाळी 5.30 ते 6 वाजता सुटून पुन्हा तितकीच गर्दी असलेल्या लोकल मधून उभ्या उभ्या याव लागायचं..घरी 8 किंवा 9 वाजता पोहचून लगेच अभ्यासाला बसायचं..त्याच्यामुळे होत राहणारे वाद..तेही आत्याचा घरी..ह्या सगळ्याचा इतका ताण त्याच्यावर आला होता..की त्याला कळतच नव्हतं की तो काय चुकतोय....त्याला सतत अस वाटत होत की ह्यात काय चुकतंय...त्याच्या मेंदूवर इतका ताण होता की तन्वी ला त्याच्यामुळे त्रास होतोय हे त्याला खरंच कळत नव्हत...त्याला गरज होती ते कोणीतरी हक्काने धमकावून सांगण्याची..पण तन्वी ते सहन करत होती..ती त्याला बोलायची की नको वागू असा..मला नाही आवडत..पण अंकुर त्या स्थितीतच नव्हता की त्याला ते कळेल..तो मनाने इतका थकला होता की खरच त्याला समजत नव्हत की तो चूक करतोय..

पण अखेर तो दिवस आला..त्याच विषयावरून भांडण झालं..आणि नात्याला तडा गेला..तन्वी ला ते सहन नाही झालं..आणि तन्वी त्याला सोडून निघून गेली..20 सप्टेंबर ची रात्र आणि अंकुर ला ती सोडून गेली...अंकुर ने लगेच मेसेज केला तिला.. शेवटचं बोलायचं...आणि ही नेहेमी व्हायचं..कारण अंकुर ला ती गोष्ट सहन नाही व्हायची की तन्वी त्याला सोडून जातेय...त्याने तिला मेसेज केला.. बोलायचं आहे मला..
"ऐक ना तन्वी..माफ कर मला..चूक झाली..नव्हत कळतं मला.. प्लिज माफ कर " त्यावर तन्वी म्हणाली की अंकुर बरेचदा तुला सांगितलं मी पण तुला किंमत नाहीये माझी..आपण थांबूया इथेच..
अंकुर ला हे सगळ सहन होत नव्हतं...त्याला श्वास घ्यायला खूप त्रास होत होता.. खूप जास्त...

त्याची पित्ताची ट्रीटमेंट सुरू होती..आणि भरपूर पित्त त्याचा त्वचेवर आल होत...तो वेड्यासारखा पूर्ण रात्र तिला मेसेज, कॉल करत होता..पण त्याला हे नव्हत माहित की तिने त्याला ब्लॉक केलंय.. रडता रडता त्याला कधी झोप लागली त्यालाच कळलं नाही...
सकाळी तन्वी ने त्याला अन्ब्लॉक करून त्याला मेसेज केला की अंकुर संपलय सगळ आता..तू तुझ्या अभ्यासावर लक्ष दे...आणि एवढ बोलून ती निघून गेली त्याला पुन्हा ब्लॉक करून...

अंकुर बोलण्याच्या अवस्थेत नव्हता..फक्त हाच विचार करत होता..की का केली ही चूक त्याने..का त्याला कळलं नाही की तो काय चुकतोय..हाच विचार करून रोज रात्री खूप रडत बसायला लागला तो..तन्वी ला खरच खूप जास्त त्रास झालाय..हे त्याला लक्षात आलं होत..तो नकळत खरच चूक करून बसला होता...
पण जस त्याला लक्षात आलं..त्याने त्यावर काम करायला सुरुवात केली..तो खरच खूप प्रयत्न करायला लागला होता...
त्याला माहीत असताना की त्याचा मेसेज पोहोचणार नाहीये तिच्यापर्यंत तरीही रोज तिच्याशी बोलायचा..मग सकाळच्या गुड मॉर्निंग पासून ते रात्री गुड नाईट पर्यंत...एकटाच तिला मेसेज करून रोज विचारायचा की कॉल करू का तनु...माहित असताना की समोरून कोणीच बोलणार नाहीये.. त्याला माहीत होत की तो चुकला आहे..पण खरंच त्याने ते मुद्दामून केलेलं नव्हतं...ते त्याच्याकडून घडलं होत...आणि त्यामुळे तो खूप त्रास करून घेत होता स्वतःला...

इतका रडत होता..की त्याचे डोळे सुजले होते..त्याला एकदा माफी हवी होती तन्वी ची..कारण तो खरच तिच्यावर जिवापाड प्रेम करत होता...
चार चार वेळा पत्रात व्यक्त व्हायचा..आणि पुन्हा फाडायचा तो कागद..का तर हे तन्वी ला आवडणार नाही..रोज रात्री बसून पत्र लिहित बसायचा फक्त ह्या संधीसाठी की तन्वी कधीतरी अनब्लॉक करेल त्याला..आणि तो तिला ते पाठवेल..त्याने तरी तिला त्याच म्हणणं कळेल..तिने अनब्लॉक केलं पण त्याला..पण फक्त हे सांगायला की अंकुर तुझ्या फोनवरच माझा फिंगरप्रिंट काढून टाक... हे बघून बघून अंकुर स्वतःला खूप त्रास करून घेत होता...त्याने पाठवलेलं पत्र तिने डिलिट करून सांगितलं की मला असलं काही वाचायचं नाहीये...अंकुर 1 महिना फक्त ब्लॉक केलेल्या तन्वीशी बोलत होता..जिथून रिप्लाय येणार नव्हताच कधी.....अंकुर फक्त सुट्टीची वाट बघत होता.. जेणेकरून त्याला लवकरात लवकर घरी जाता येईल..आणि तन्वी ची माफी मागता येईल..तिला समजता येईल...