तर मग आता पुढे काय....? भाग २

Tar Mag Ata Pudhe Kay
तर मग आता पुढे काय....? ( एक रहस्य कथा) भाग २



सारिकानी सगळी ताकद पणाला लावून दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण दार काही उघडेना.

एक आर्त, प्रेमळ हाक ऐकू आली "सरी कुठं जायचे बाळ.."

सारिकाचे आधी अवसानच गेले. मागे वळून पहायला खूप भिती वाटत होती. त्याच वेळी दुसरे मन आपलीच आई आहे. किती प्रेमाने हाक आली. चल पटकन बघू अशा द्विधा मनस्थितीत मागे वळून पाहिले...

सारिका - " आ.. आ.. आईं." म्हणत पाहते तो काय, लांब सडक केस मोकळे, गोल गोरा गोमटा चेहरा, कपाळावर मोठें गोल कुंकू, कानात झूमके, नाक सरळ उंच पूरी, हिरव्या साडीला जरीचे काठ , हातात हिरव्या काचेच्या बांगड्या, डोळ्याखाली काळी वर्तुळ. डोळ्यात आपल्या मुली कडे पाहताना एक प्रेमळ भाव. शेवटी आईचीच नजर ती.

सारिका पाहतच राहिली काय करावे तिला सुचलंच नाही. भिती, आईचं दुःख, आश्चर्य सगळ्या भावना एकत्र उचंबळून आल्या. आई गेली तेव्हा खूपच लहान होती. नक्की काय झाले तिला काहीही कोणी सांगितले नाही . सारिकाला काहीही माहीत नव्हते.

आई गेल्यानंतर इतक्या वर्षानंतर असे भेटणे शब्दात व्यक्त करता येणार नव्हते. त्या प्रसंग दोघी एकमेकींच्या कडे धावत गेल्या गळ्यात पडून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. दोघींना आवरता आवरेना अश्रू.

सारिकाची आई वत्सलाबाईची ख्याती वात्सल्याने भरलेली अशी बाई.

सारिका रडत आई ला विचारते - "आई लहानपणी मला सोडून का गेली तू ? किती हवी होतीस मला. आपल्या वाड्यात रामाची देवघरात मूर्ती आजी सांगायची त्याला तीन आई होत्या. माझी इन मिन एक आई ती पण हिरावली त्याने मग मी रामालाच आईं मानते."

सारिकाची आई - ""आईं आपल्या बाळाला सोडून जात नाही. तुझ्यासाठीच गेल्यावर सुध्दा माझा आत्मा इथेच तूझ्या काळजीने इथेच घुटमळतो आहे."

सारिका -"काय झालं होतं आई त्यावेळेस?"

सारिकाची आई-"काय सांगू तुला माझी करूण कहाणी."

सारीकाची आई आपल्या भूतकाळ विषयी सांगू लागली "मला एकच मुलगी झाली म्हणून मी नावडती. मला मारहाण करण्यात येत होती. कारण वारसदार हवा होता. मला दुसरे राहिले नाही. यात माझा काय दोष आहे. मारताना वाड्याच्या वरच्या मजल्यावर पायऱ्या वरून मला ढकलून दिले. माझा जीव गेला नंतर माझा पाय सरकला सांगून कांगावा केला वन्स आणि सासूबाईंनी. माझा जीव तुझ्यावर, मी तुझे हाल करू नका म्हणून सांगितले तर मला याच वाड्यात कोंंडल तांत्रिक, मांत्रिक आणले इथुन निघून गेले. तू मोठीं झाली आता मला मुक्त केले इथून"

सारिका -"बाबांना तर काही माहिती नाही त्यांना विचारले आई कशी गेली ? ते म्हणतात ते घरी नव्हते. आजी सांगते वेंधळी होती तुझी आई वरच्या मजल्यावरून खाली आली गडगडत आणि गेली."

सारिकाची आई -"हो हे इथे नसायचे. कधी पण नोकरीच्या कामांने फिरतीवर असायचे. फक्त यांनाच मुलगी झाली याचा आनंद होता."

सारिका -" नेमके जिन्यावरून तुला ढकलले कोणी आणि का?"

सारिकाची आई - "वन्स, सासुबाई, सासरे. मी नावडती सूनच होते. सासूबाईंना त्यांच्या भावाची मुलगीच सून म्हणून हवी होती. यांनी मला पसंत केले. हे मला लग्नानंतर कळलं"

सारीका -"आत्याला वेड लागले. तिचे लग्न झालेच नाही. काका आधी पासून वेगळेच राहतात. आजी आता सहा महिने झाले देवाघरी गेली. आजोबा ही जाऊन खूप वर्ष झाले. बाबा, मी, आत्या राहातो."

सारीकाची आई -"आता मी जाणार तू तुझी काळजी घे. मी मुक्त झाले. तू केले मला मूक्त. तुलाच भेटण्यासाठी थांबले होते इथे. मला तुझीच काळजी होती चिमणे."

सारिका -"आई sss. परत नको जाऊ मला पोरके करून. तू थांब ना थोडे माझ्या सोबत. मला तू हवी आहेस आई माझ्या सोबत रहा. बाबांनी एकट्याने माझे खूप केले आहे. बाबांना भेट. त्यांना सांग नेमके काय झाले तुला कोणी मारले."

सारिकाची आई -"यांना काही सांगू नकोस आता त्यांना काही पटणार नाही. त्याचं अति प्रेम आई, वन्स यांच्या वर. भूत वगैरे गोष्टी वर यांचा विश्वास नाही. "

सारिका -" बाबा का बरं वाडा सोडून गेले."


सारिकाची आई -- "त्यांना सासूबाईनी स्वतः ची शपप्थ दिली. तुझी बायको गेलीं या वाड्यात."

सारिका - "पण बाबांनी दूसरे लग्न केले नाही. आजी खूपच मागे लागली तरीही. माझ्या सरीला सावत्र आई त्रास देईल आणि आई तुझ्यावर पण अति प्रेम त्यांचे""

सारीकाची आई - " तूला आता माझी शपथ आहे. बाबांना काही सांगू नकोस."

सारीका - " का आई असं केलं?"

सारीकाची आई -" सरी... बाळा.... तू एकटी आली कशाला इथे इतक्या रात्री अपरात्री.. बाबांना माहिती आहे का?"

क्रमशः


सौ. भाग्यश्री चाटी सांबरे
©®

🎭 Series Post

View all