तर मग आता पुढे काय....? भाग ३ अंतिम

Tar Mag Ata Pudhe Kay
तर मग आता पुढे काय ....? (भाग ३ अंतीम)



सारिकाची आई - "तू नाही असं एकटीने रात्रीं अपरात्री फिरायचे. बाबांना माहिती नसेलच. असे वागायचे नाही. तू शहाणं बाळ आहे ना."

सारिका - "अगं माझे ऐक तरी."

सारिकाची आई. "बोल पटकन."

सारीका "बाबांना बरं नाही. खूप ताप भरला आहे. तापेत सारखं तुझाच चेहरा दिसतो म्हणतात. तुझेच नाव घेत आहेत. तुलाच भेटून बरं वाटलं तर.... डाॅक्टर गोळ्या देऊन गेले पण काही फरकच नाही पडेना दोन -तीन दिवस झाले. न राहून शेवटी म्हणलं वाड्यात येऊन. तुझा फोटो, आपल्या रामाचा अंगारा लावला नेले तर बरं वाटलं तर चांगले होईल."

सारीकाची आई - "अश्रू गाळत सगळे ऐकत होती. यांच्यासाठी काय करावे आता असे तिला झाले. सारीका वडीलांच्या साठी कांहीही करते.हे पाहून खूप बरं वाटलं."

सारीका -"आईला गळ घालत होती. तू चल माझ्या सोबत घरी. बाबांना आनंद होईल बरे वाटेल. तुला पाहून."

सरिकाची आई. " ते आता शक्य नाही ग."

सारिका - "तुला माझी शपथ आहे. अगं चल बाबांना बरं वाटेल."

सारीकाची आई. "अगं काय हे. मला कोणत्या मायेच्या बंधनात अडकवू नको. मी मुक्त झाले मला आता गेले पाहिजे."

सारीका."एकदा ये ग आई रडत विनवणी करते."

सारीकाच्या आई कडे पर्याय रहात नाही. हो म्हणते दोघीही घरी जातात.

बाबांना बरं वाटावं सारीका बाबा हाक मारते, बाबा डोळे उघडून पहातात. सारीका म्हणते "कोण आले पहा."

बाबांना सुखद धक्का बसतो दोघं खूप रडतात. "तू कशी काय?"

सारीकाची आई -" तुम्ही काळजी घ्या स्वतःची. पोरींचे शिक्षण, लग्न जबाबदारी संपूर्णपणे पार पाडा. तुमची बहीण आहे अजून तुमच्या पदरात असं आजारी पडून नाही चालणार तुम्हाला. तुम्ही कर्ते . पुरूषां सारखे पुरूष कर्तव्य पार पाडा. मी नाही म्हणल्यावर तुमच्या वर दुहेरी जबाबदारी आहे. हातपाय गाळून बसल्यावर सारीका , वन्स यांनी कुणाच्या तोंडा कडे पाहायचे. गोळ्या घ्या बरे व्हा लवकर. सारीका मला घेऊन आली तुमच्यासाठी एवढी पोरं. काळजी घ्या अहो, बरे व्हा. "

सारीकाचे बाबा - " आली मोठी शहाणी. मला शहाणपणा शिकवायला लागली का तू? का गेलीस सोडून ? आता कशाला आली? संसार दोघांचा असतो तू का गेलीस मध्येच?" ते रडू लागले.


सारीकाची आई - "जाणे येणे आपल्या हातात नाही. नवऱ्याचे अश्रू पुसते. तुम्ही स्वतः ला सावरा आपल्या पोरीसाठी तरी सावरा, तिच्या कडे पहा. माझी शपथ आहे तुम्हाला. बरे व्हा ऊठा आपली जबाबदारी पार पाडा."


सारीकाची आई. " सारीका लाव तो रामाचा अंगारा यांच्या कपाळावर रामरक्षा म्हण बरं वाटेल. जेवणं, गोळ्या दे त्यांनां वेळेवर. काळजी घे सारीका तुझी आणि बाबांची आणि वन्सांची."


सारीका - " आत्याची? "

सारीकाची आई -" हो. कोणी कसंही वागो आपण चांगलेच वागायचे. आपण चांगुलपणा सोडायचा नाही. चांगूलपणावर विश्वास ठेव."

सारीकाचे बाबा -"तू आलीस बरं झालं."

सारीकाची आई -"नाही मला आता थांबता येणार नाही.जावे लागेल. फक्त तुम्हाला भेटायला आले मी."

सारीका -"आईला बिलगुन रडु लागली. माझी आई नको मला परत पोरक करू ग सांग तुझ्या शिवाय कोण आहे जवळच. तूच गेली तर काय?"


सारीकाची आई -"असं नाही करायचं तू माझे शहाणं बाळं आहेस. एकदा गेलेले माणूस दिसतं नाही डोळ्याला परत.आपण‌ तरी भेटलो, बोललो हेच खूप समजायचे. रामाचे आभार मानले पाहिजे. आपल्या रामाची कृपा म्हणावी लागेल."

सारीकाची आई- " काही गोष्टी अशा संपतच असतात. कुणाचे आई, वडील जन्माला पुरले. आपलेच आपणच उभे रहावेच लागतेच. कोण अमरत्वाचा पट्टा घेऊन आला आहे. आलेला कधी ना कधी जाणारच. हेच सत्य आहे आणि मरण आपल्या हातात नाही. परमेश्वराच्या हाती आहे."


साारीकाची आई -"तू मोठी हो..शहाणी हो. खूप शिक. बाबांना जप. आपल्या पायावर उभी रहा. बाबांच्या आणि तूझ्या पसंतीने योग्य वयात लग्न कर. माझे आशिर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे."


सारीकाचे बाबा -" उठतात. उठून बसतात. "


सारीकाची आई -"नमस्कार करते. येते आता. काही चुकले माकले माफ करा."


सारीकाचे बाबा, सारीका रडू लागले.


सारीकाची आई -"रडू नका. जरा सावरा स्वतः ला. तुम्ही रडले की माझ्या आत्म्याला त्रास होतो. माझ्या पुढच्या प्रवासाला मला जाऊ द्या. तुम्ही एकमेकांना सांभाळा."


सारीकाची आई मुक्तीच्या वाटेवर कायमची निघून जाते.


सारीका वडिलांना गोळ्या देते. अंगारा लावते. रामरक्षा म्हणायला सुरूवात करते.

"आयुष्य पुढे जाणारच बाबा आपणच ठरवायचं कसे घालवायचे ते. आपण आयुष्यात येऊन काही चांगलच करूयात."

समाप्त.

सौ.भाग्यश्री चाटी सांबरे.
©®

🎭 Series Post

View all