Tarkapalikadle* vivek chandrakant
"माझे 200 रुपये बाकी आहेत तुझ्याकडे. लक्षात आहे ना?" कोणीतरी कानात बोललें त्याच्या आणी त्याला जाग आली.अस्वस्थ होऊन उठला तो. घड्याळ्याकडे नजर टाकली. पहाटेचे तीन वाजलेले. हा आवाज ओळखीचा होता. खूप वर्षांपूर्वी अगदी त्याच्या जवळचा.पण नेमका कोणाचा त्याच्या लक्षात येत नव्हते. त्याने पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप आता दूर पळाली होती.
कोणाचा आवाज असावा आणी दोनशे रुपये कोणाकडून घेतले जाम आठवेना त्याला . व्यवहाराला अगदी चोख होता तो.कोणाचा एक पैसा कधी ठेवला नव्हता. पण हे 200 रुपये? डोक्यात प्रकाश पडत नाहीये आपल्या.
अचानक लकलकले डोक्यात त्याच्या. प्रकाश.. हो प्रकाशच तो. त्याचा कॉलेजमधला लास्ट इयरचा रूम पार्टनर. exam फी भरायला नेमके 200 रुपये कमी पडत होते.मुदतीचा शेवटचा दिवस. घरून मनी ऑर्डर केलेली पण मिळाली नव्हती. वरखाली झाला त्याचा जीव. पण देवासारखा धावून आला प्रकाश. खरेतर 30 वर्षांपूर्वी बरीच मोठी रक्कम होती ती. नंतर मनी ऑर्डर आली पण प्रकाश काही कामासाठी गावी गेला होता. याची परीक्षा संपली तरी तो परतलाच नव्हता. तेव्हा हॉस्टेल वर तसा निरोप देऊन निघून आला होता तो. प्रकाश ला त्याने पत्रही लिहिले की result च्या दिवशी भेटू. तुझे पैसे देतो तेव्हाच. पण त्या दिवशीही प्रकाश आलाच नव्हता. त्याच्या गावाकडच्या मित्राने सांगितले की तो गावीही नाही आता.
नाईलाजाने तो पैसे घेऊन परत आला.
नाईलाजाने तो पैसे घेऊन परत आला.
एकदम भरून आले त्याला. ऐन वेळेस पैसे मिळाले नसते तर वर्ष वाया गेले असते त्याचे.आणी तो चक्क विसरूनच गेला त्याला. मग आठवले त्याला नुकत्याच फॉर्म केलेल्या त्याच्या कॉलेजच्या wa ग्रुपवर विषय झाला होता त्याचा. तो दिल्लीत कुठेतरी जॉब करतो एवढेच सांगितलं कोणीतरी. नंतरही काहीच माहिती मिळाली नाही त्याच्याबद्दल.
सकाळ होताच त्याने एकापाठोपाठ फोन करणे चालू केले मित्रांना. पण कोणालाच माहित नव्हते त्याच्याबद्दल. मग एक क्लू मिळाला. सध्या तो गावाला असल्याचा. गाव त्याचे चांगलेच लक्षात होते. पत्रव्यवहारामुळे.. कॉलेजमध्ये असताना केलेला. पत्ता आता आठवत नव्हता. पण कोणालातरी विचारता येईल खेडेगाव होते त्यावेळी, आता वाढले असेल तरी किती वाढणार.?
सहा तासावर गाव होते. त्याने कार काढली तेव्हा पत्नीलाही आश्चर्य वाटले.. असे अचानक?
तो गावी पोहचला तेव्हा संध्याकाळ होत आलेली. गाव तसें बऱ्यापैकी असावे तरीही त्याने प्रकाशचे नाव घेताच लोकांनी लगेच घर कुठे ते सांगितले.एक जण तर मोटरसायकलवर थेट घरापर्यंत आला सोबत. म्हणजे? त्याच्याकडे येणारे अनेक असावेत?
तो गावी पोहचला तेव्हा संध्याकाळ होत आलेली. गाव तसें बऱ्यापैकी असावे तरीही त्याने प्रकाशचे नाव घेताच लोकांनी लगेच घर कुठे ते सांगितले.एक जण तर मोटरसायकलवर थेट घरापर्यंत आला सोबत. म्हणजे? त्याच्याकडे येणारे अनेक असावेत?
घर जुन्याकाळी बांधलेले असावे. आता थोडा आधुनिकतेचा touch दिलेला होता टाईल्स वगैरे बसवून. तो गाडी लावून आत जाताच त्याला बाहेर पाच मिनिटे थांबवण्यात आले आणी पाणी देऊन आत नेण्यात आले. तिथे एका पलंगावर प्रकाश झोपलेला होता. त्याला कळलेच नाही आधी.. तसेही त्याला बघून कितीतरी वर्षे झाली होती. पण आता त्याला बघून तर धक्काचं बसला. अगदी बारीक झालेली शरीर यष्टी. बरगड्या मोजता येतील इतक्या वर आलेल्या.गालफड आत गेलेली. त्याने हाक मारली.. "प्रकाश.. प्रकाश..."
प्रकाशाने मोठया मुश्किलने डोळे उघडले.. सुरुवातीला त्याने ओळखले नाही. नंतर त्याच्या डोळ्यात आनंद दाटून आला.
"सचिन......"
"सचिन......"
"तू कसा आलास? " त्याने थरथरत्या स्वरात मोठ्या मुश्किली ने विचारले.
" तुझे 200 रुपये द्यायचे होते ना? ते द्यायला आलो. "
"कुठले 200?"
मग याने त्याला आठवण करून दिली कितीतरी वर्षांपूर्वीची.आणी शंभरच्या दोन नोटा त्याच्या हातात ठेवल्या.त्याला आठवले.. पण त्यासाठी एवढ्या दूर..?
त्याने खूप वेळ ह्याचा हात हातात धरून ठेवला. जूनी मैत्री आठवत. असावे गाळत.
त्याने खूप वेळ ह्याचा हात हातात धरून ठेवला. जूनी मैत्री आठवत. असावे गाळत.
रात्र झाल्यामुळे प्रकाशच्या मुलाने त्याला निघूच दिले नाही.आणी प्रकाशनेही.... जेवण झाल्यावर बाहेर खाटेवर झोपतांना त्याच्या मुलाने सांगितले सारे. प्रकाशच्या परीक्षेच्या नेमके काही दिवस आधी वडील तडकाफडकी वारले हार्ट अटॅक ने. वडिलांचे क्रियाक्रम होत नाही तोच इस्टेटीचे बखेडे उभे झाले. बरेच दिवस कोर्टकचेऱ्या चालल्यानंतर कंटाळून त्याच्या ओळखीच्या माणसाबरोबर तो थेट दिल्लीला निघून गेला. तिथे मात्र एका कंपनीत चिटकून राहण्याचा फायदा झाला. पर्मनंट झाला. तिथेच सेटल झाला. सगळे काही सुरळीत चालू असतांना पोटाचा कॅन्सर डिटेक्ट झाला. कंपनीकडून औषधं उपचारासाठी भरपूर मदत दिली पण रोगाने दाद दिली नाही. अखेर मरायचेच आहे तर गावी जाऊनच मारू हा nischay करून तो पुन्हा गावी आला.... आणी आता मृत्यू ची वाट पाहत आहे.
दिवसभराच्या शारीरिक आणी मानसिक थकव्याने त्याला झोप लागली तरी स्वप्नात त्याच्याबरोबर घालवलेले कॉलेजचे दिवसच दिसत होते त्याला. पहाटे कसल्याश्या गलक्याने जाग आली त्याला. अशुभाच्या शंकेने तो धावत आत गेला. शंका खरी ठरली होती. प्रकाश रात्रीच केव्हातरी जग सोडून निघून गेला होता.त्याच्या हातात मात्र अजूनही काल त्याने दिलेले 200 रुपये होते...
प्रकाशचा अंत्यविधी करून खिशातल्या जितक्या नोटा होत्या त्या प्रकाशच्या मुलाच्या हातात जबरदस्तीने देऊन तो घरी परतला. किमान आपण त्याला अंतकाळी भेटू शकलो आणी त्याच्या ऋणातून मुक्त होऊ शकलो ह्याचे समाधान घेऊन.
..........
खूप दिवस झाले आणी अगदी अचानक एका सकाळी प्रकाशचा मुलगा त्याच्या घरी आला. काहीश्या आश्चर्याने आणी आनंदाने त्याने त्याचे स्वागत केले. नास्तापाणी होताच मुलाने विषय काढला.
" वडिलांचे वर्षश्राद्ध आहे 15 दिवसांनी. तुम्हांला तेच सांगायला आलो".
"आणखी एक..." मुलाने रबर लावलेल्या काही नोटा त्याच्यापुढे ठेवल्या.
"आणखी एक..." मुलाने रबर लावलेल्या काही नोटा त्याच्यापुढे ठेवल्या.
"हे काय?"
"तुम्ही निघतांना मला दिलेले पैसे. आठ हजार सातशे."
"अरे पण ते तुला खर्च करायला दिले होते. परत घेण्यासाठी नाही. आणी तुला एकदम मोजून बिजून ठेवायला कोणी सांगितले?"
"पप्पानीं "
"म्हणजे?"
" गेले काही दिवस रोज पप्पा माझ्या स्वप्नात येतात आणी तुम्हाला पैसे परत करायला सांगतात. ही रक्कम ही त्यांनीच सांगितली. मी तर मोजलेही नव्हते.ते म्हणाले वर्षाच्या आत परत कर. "
थरथरत्या हाताने त्याने पैसे घेतले. तेवढ्यात य्या मुलाने एक भरपैकी शर्टपीस त्याच्या हातात ठेवला. काहींश्या आश्चर्याने त्याने विचारले.
" हे कशासाठी? का हेही प्रकाशनेच द्यायला सांगितले? "
" हे कशासाठी? का हेही प्रकाशनेच द्यायला सांगितले? "
" हो. पप्पा म्हणाले पहिल्यांदा आपल्या घरी आला माझा मित्र आणी रिकाम्या हाताने गेला. तेव्हा..... "
प्रकाशचा मुलगा आग्रह करूनही न थांबता निघून गेला. आणी हा त्या शर्टपीस वर हात फिरवत निशब्द. हे खरेच असते काही. त्याने स्वप्नात येऊन आठवण देणे. मरण्याआधीची भेट...
आणी आता त्याच्याच मुलाच्या स्वप्नात येणे..
आणी आता त्याच्याच मुलाच्या स्वप्नात येणे..
मृत्यूनंतर स्वप्नात येणे त्याने ऐकले होते. पण जिवंतपणी स्वप्नात येणे याला काय म्हणता येईल....? आणी त्याचे आपले ऋणानुबंध काय? काही गोष्टी तर्क वैगरेच्या पलीकडील असतात.
त्याने calander वर प्रकाशच्या वर्षश्राद्ध असलेल्या दिवसाला गोल केले. हो... जावेच लागणार होते त्याला.
©® विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.
©® विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.