Login

ते तीस सेकंद

ट्रॅफिक सिग्नल
ते..तीस सेकंद.

भर दुपारी रपरपत्या , कड्क,चटका बसवनाऱ्या उन्हात....

एकीकडे p.m.t. ची गरम गरम धूर सोडणारी बस...

दुसरीकडे टू व्हीलर आणि फोर व्हीलर ची धगधगती गर्दी...

दोन मिनिटांचा तो असहाय ट्रॅफिक सिग्नल....

गॉगल ,मास्क आणि कॅप मधून ओघळणाऱ्या घामाच्या धारांना वैतागलेला ,'तो.'..

पूर्ण चेहरा व्यवस्थित स्कार्फ ने बांधून घेतलेली. डोळ्यावर गॉगल आणि फुल ग्लोवज,त्याच्या मागे रणरणत्या उन्हाला हताश झालेली,'' ती"...

चौकातल्या पिवळ्या सिग्नल कडे आसुयेने बघणारी ट्रॅफिक...

त्याने हळू -हळू गाडी पुढे- पुढे काढत ,झेब्रा क्रॉसिंग जवळ आणली ...

आता फक्त एक मिनिटांचा अवधी होता,
तो ही अगदी जिवावर आल्यासारखा नकोसा वाटत होता...

तेव्हड्यात एक सात आठ वर्षांचा मुलगा,
हातात काही चाफ्याच्या फुलांचे गजरे घेऊन ,
प्रत्येक गाडीजवळ जाऊन थांबत होता...

अंगात अतिशय मळकट,कळकट,बटण तुटलेले शर्ट,
उघड्या डोक्यावर प्रखर उन्हाचा निखारा,
आणि डोळ्यात आशेच्या ज्वाला...

बोलत काहीच नव्हता ...
फक्त आशाळभूत नजरेने बघत होता...

तिची नजर,त्या सात आठ वर्षाच्या मुलावर गेली...

तिच्या मनात अनेक विचारांनी काहूर माजवले...

त्या मुलाकडे बघून स्वतःवर लाजल्यासरखे झाले..

खरचं पोटातल्या भूके पुढे काहीच जाणवत नसावे
..ना उन..ना पाऊस..सर्व दिवस सारखेच...


तिचे अंतरंग गलबलून आले...

पटकन त्याला म्हणाली...,"' दहा रुपये द्याना जरा. त्या मुलाला द्यायचेत."

तो आधीच रापत्या उन्हात तापटलेल्या मूड मध्ये ...

त्याची नजर सिग्नल वरून हलत नव्हती...

...आता तीस सेकंद येतंच होते...

"नाहीयेत ग सुट्टे "...

'तो ',तिच्या मनात चाललेल्या घालमेलिशी पूर्णपने अज्ञान....

'ती 'अजूनच कासावीस....' ",द्याना असेल तर पटकन .बघा तरी "...

"अग खरचं नाहीयेत "...

सिग्नलचा नंबर पुढे पुढे सरकत होता...

ट्रॅफिक आता भरधाव सुटणार होती....

या भयंकर ट्रॅफिकच्या भट्टीतून सुटण्याची वेळ झाली होती...

मुलगा अजूनही ,तिथेच ...

आशाळभूत नजरेने....

केविलवाणे ..अगतिक...बघत होता...

'त्याने' ,तिच्या हट्टासाठी खिशात हात घातला.
मिळेल ती नोट काढू या विचाराने,

आणि तेव्हड्यात सिग्नल सुटला...

त्याने पटकन खिशातून हात बाहेर काढला,
गाडीला गेअर टाकला,
आणि भरधाव निघालाही....

कारण तो ही काहीच करू शकत नव्हता...

मागची ट्रॅफिक ऐकणारी नव्हती..

थांबणारी नव्हती...

वेळ देणारी नव्हती..

माणुसकी विसरलेली होती...

त्याला ही गाडी पळवणे भाग होते..

आता ,तो आणि ती ..

दोघेही केविलवाणे होते...

त्या फुले विकणाऱ्या सात आठ वर्षांच्या मुला सारखे...!!!!
©® Sush