सवतीला दिलेले ते वचन
भाग २
तो एकदा म्हणालाच.."मी म्हणालो नव्हतो का आपले सूत नक्कीच जुळणार, ते देवाच्या मनात आहेच. ते तसेच होत आहे. तुम्ही काहीच करू शकत नाही. देवाच्या मर्जी पुढे तुमचे काही एक चालणार नाही. माझा त्या देवावर अजूनच विश्वास बसत आहे.त्याने पुन्हा मला ह्या आश्रमात आलेच पहा, त्यालाच माझ्या प्रेमाची काळजी आहे."
सुमित्रा रागाने फणफणत,"अहो काय बोलत आहात तुम्ही? कसले प्प्रेम? तुमचे डोके ठिकाणावर आहे ना? तुम्ही इथे काम करायला आला आहात. ही फाजील गम्मत तुम्ही तुमच्या मनात ठेवली तर बरे होईल. आश्रमातील काम संपले की तुम्ही इथे परत येणार नाहीत हे नक्की."
अरुणने तिचे बोलणे कधीच मनाला लावून घेतले नाही. उलट तो जास्त तिच्या प्रेमात पडत जात होता.ती तीच आहे जी त्याने पहिल्यांदा आश्रमाच्या बाहेर पाहिली होती,हसरी सुंदर ,गोरी,मानेवर तीळ जो आजच त्याने पाहिला होता, जो तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत होता. कधी ती हसरी होती आणि त्यामुळेच तो तिच्या तेव्हा प्रेमात पडला होता. बालपणीचे प्रेम पण तेव्हा हसरी होती ,आता सततच रडकी, भांडखोर, रागिष्ट किती तो बदल झाला होता..परिस्थितीने तो बदल तिच्यात घडवला होता. पण का झाले असेल असे हे अजून ही त्याला समजले नव्हते. मग त्यावर समर्पक उत्तर फक्त आजीकडे होते.
अरुणला आजीकडे असे काही प्रश्न पडले की लगेच जाऊन बसत. आज पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आजी देईल. पण आजीला सगळं परत परत सांगावे लागत. तिला पुन्हा तो जुना किस्सा आठवून द्यावा लागेल, ती वास्तू, त्या वास्तूचे आणि माझे नाते..मग त्याला आश्रमातील पाहिलेली ती सुंदर मुलगी..आणि तीच आज पुन्हा किती वर्षांनी भेटली..पण आज भेटल्यावर ती तशी नव्हती..सुंदर होती उलट अजूनच सुंदर दिसू लागली होती पण ते तिचे हसणे तसे नव्हते , ते जणू कुठे हरवले माहीत नाही, असे वाटत होते जणू ती किती दिवस, किती वर्षे हसलीच नसावी..त्यात ती खूप रागिष्ट झाली, माझा फक्त राग रागच करते हे सगळे आजीला सांगायचे होते.
अरुण,"आजी, ती आज पुन्हा दिसली."
आजी वाती वळायचे काम सोडून,अरुणकडे तोंड फिरून बसली. "अरुण मला बाबा काही ऐकू येत नाही आजकाल नीटसे, तू जरा माझ्या जवळ येऊन सांग बरं."
"अग आजी ती मुलगी आज पुन्हा दिसली ग,त्यांच्या आश्रमाच्या बाहेर काही वर्षांपूर्वी दिसली होती ती,तीच मुलगी."
"म्हणजे रे काय म्हणायचं तुला? ती तिथेच अजून ही रहाते."
"हो आजी,पण इतक्या वेळेस,इतके वर्ष फेऱ्या मारायचो तेव्हा ती कधीच दिसली नव्हती आणि आज मला संधी चालून आली त्यांचे आश्रमाचे काम करण्याची आणि मी ती मागून घेतली ."
"ही संधी घेऊन तू काय साद्य करणार रे अरुणा? त्या मुली अनाथ कोण कुठल्या,कश्या? तिच्याशी तुझे सूत का जुळवे मला आवडले नाही. मला पटले तरी तुझ्या आई बापाला नाही पटणार. त्या मुलीचा नाद तू सोड बरं!"
अरुण निराश झाला. आजीचे असे वागणे ,बोलणे ,तिचे असे बुरसटलेले विचार हे त्याला अपेक्षित नव्हते. त्याला आज आजीचा राग आला होता. किती त्याला काय काय सांगायचे होते. कशी आहे ती ,किती बदलली आहे ती मुलगी, कशी नुसती राग राग करते,पण मला तरी ती तितकीच आवडते जितकी ती पहिल्यांदा दिसली होती. पण आजीचे बोलणे ऐकून चुपचाप निघून गेला.
आजी त्याच्या रागात असलेल्या चेहऱ्याकडे बघत होती. तो आपल्यावर गावाला आहे, हे तिला कळले होते. पण वेळीच त्याला त्या स्वप्नातून ,भ्रमातून काढणे गरजेचे होते, पहिला घाव घालून त्याला त्या मुलीच्या भ्रमातून तोडायचे होते. नाहीतर हे वेड त्याला वेडे करून सोडेल, पुरते वेडे.
आजीचा स्वभाव असा नव्हता. तिला अरूणचे भले व्हावे तो आंनदी रहावा ,त्याच्या मनासारखी जोडीदार मिळावी हेच काय ती देवाकडे नेहमी मागत असत. पण स्वप्न वेगळं आणि सत्य वेगळं, प्रेमात काही चुकीचे निर्णय सगळ्यांनाच दुःख देऊन जातात हे अजून त्याला कळलेले नाही. भान हरपून त्या अनाथ मुलीच्या मागे लागला आहे. त्याचे चित्त ठिकण्यावर नाही.लहानपणी तिला पाहिले आणि हुरळून गेला पण आता सत्य वेगळे आहे, ती कुठे हा कुठे? कोणत्या जातीची? कुठली?कोण आई बाप कोण? अशी कशी उठून तिला घरात घेऊन यायची, समाज काय म्हणेल?असे अनेक विचार आजी करत होती.
आजीशिवाय त्याचे पान हालत नव्हते. पण खूप दिवस झाले तो आजीला टाळत होता, हे आजीच्या लक्षात आले.
आजी आज त्याची दारातच वाट बघत
बसली. त्याची गाडी आली, त्याने आजी कडे पाहिले. आजी सोबत आपले हे वागणे, तिला दुखावणे काही बरे नाही, त्याला कळले होते.
बसली. त्याची गाडी आली, त्याने आजी कडे पाहिले. आजी सोबत आपले हे वागणे, तिला दुखावणे काही बरे नाही, त्याला कळले होते.
आजी आस लावून बसलेली पाहताच तो आजीच्या मिठीत शिरला, आणि रडू लागला.
"आजी मी चुकलो ग. तुला दुखावून वागलो, माफ कर आजी. तुझ्या जवळ तर मन मोकळे करू शकतो ग."
आजी डोक्यावरून हात फिरवत, "अरुण काय झालं ,मी तुला सत्य काय ते सांगितलं म्हणून तू रागावलास ना तुझ्या ह्या आजीवर? पण तुला खड्ड्यात पडू द्यायचं का रे मी? शाळेत होतास तेव्हापासून तुला सत्य आणि काय चांगले काय वाईट हे सांगायचे. तुला पटले तेच तू करायचा. आजी तू अशीच चांगल्या आणि खऱ्या गोष्टी सांगत जा म्हणायचा. मग आता तू मोठा झालास म्हणून आजीची ही गोष्ट पटली नाही? नसेल ही, पण प्रेमात आंधळा होऊ नकोस हेच म्हणणे आहे बरं माझे. बाकी तू शहाणा झाला आहेस, तुझे तुला सगळे समजते."
अरुण अजूनच आजीला कवटाळून रडत होता.
"आजी मी तो प्रोजेक्ट नाकारला आहे. आता मी तिच्या आश्रमात जात नाही. तिला भेटलो नाही. ह्या वेळी तू म्हणाली तसेच मी केले. नको ती मुलगी, नको ती आस, तो तिचा ध्यास, नको प्रेमात पडणे, फक्त सत्य स्वीकारले मी. मनाला मुरुड घालत, त्या तिच्याबद्दल असलेली ओढ त्यावर अंकुश ठेवण्याचाच प्रयत्न करत आहे, अगदी तुझी शपथ ग."
आजीला ते ऐकून खूप वाईट वाटले. त्याचे मन दुखावल्याचे वाईट वाटले. समाज आणि प्रेम यात काय निवडावे? पण मुलाचे सुख तिच्यापुढे महत्वाचे होते.
आजीने त्याचे डोळे पुसले. "अरुण मला ती मुलगी दाखवशील का रे? मला ही तिला बघण्याची खूप इच्छा झाली आहे. खरंच तू जसे वर्णन करतोस तशीच आहे का ती पहायची आहे, घेऊन जाशील का मला तिच्याकडे?"
आजीच्या ह्या बोलण्याकडे तो बघतच राहिला. आजी त्याच्याकडे बघत होती, जणू तिचे डोळे म्हणत होते, मला नाही बघवले तुझे दुःख म्हणून आजही मी तुझ्या प्रेमाच्या क्राईम मध्ये तुझी साथ द्यायला तयार झाले आहे, मी तुझ्यासोबत आहे, जशी आजपर्यंत सोबत होते. आजीच्या डोळ्यांत अश्रू होते आणि अरूणच्या डोळ्यात एक वेगळाच आनंद. पुन्हा अरुणने आजीला मिठी मारली.
आजीने त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत ही नेहमीसारखी देवाकडे प्रार्थना करत होती.
सुभद्राबाई अरूणची आई दोघांच्या बोलण्याने बाहेर आली होती. तिला जाणवले होते काही दिवसांपासून अरुण आपल्या आजीसोबत बोलत नव्हता. आजी सुद्धा अस्वस्थ दिसत होत्या. आज पाहिले तर पुन्हा नातवाने आजीला मिठी मारली होती.नक्की काय झाले होते हे काहीच कळले नाही की तिने दोघांना ही विचारले नाही. त्या दोघांचे नाते खूप अजीब आणि आजी नातू कमी मैत्रीचे होते. आजीला नातवाशिवाय काही नको कोणी नको, आणि त्याला आई पेक्षा आजी प्रिय होती, तिच्यात जास्त जीव होता.
सुभद्रा अरुणची आई ,खूप शिकलेल्या घरातून आणि श्रीमंत घरातून, ह्या थोरे कुटुंबात लग्न होऊन आली होती. कमी वयात लग्न करून दिले आणि शिक्षणाबद्दल असलेली ओढ कुठे तरी लग्नामुळे अपूर्ण राहिली ती राहूनच गेली. आपली घुसमट कमी करण्याचा त्यांचा कडून प्रयत्न होईल याची आस मनाला दिली नाही.. .. मुलं लवकरच झाले म्हणून त्याचा बद्दल ही जिव्हाळा नव्हता, प्रेम ओढ ,आस नव्हती.
आईने दुर्लक्षित केले म्हणूनच आजीने त्याला आपल्या पदरा खाली घेतले, माया दिली, त्याचे सर्व लाड हट्ट पुरवले, तो सगळ्या गोष्टी आजीला येऊन सांगत..
तो मनापासून आईला आई समजत नसत आणि वडिलांना तर तो खूपच घाबरत असे, आजीने मग त्याची ओळख करून द्यायची ,हळूहळू आई आहे ही तुझी ,हे बाबा आहेत.
त्याला हळूहळू आई कोण ,बाबा कोण हे पटत जाते, मग आईला आई म्हणू लागतो, मग
बाबांना बाबा म्हणत जातो, तशी वडिलांकडे जायची हिम्मत करू लागतो.
तो मनापासून आईला आई समजत नसत आणि वडिलांना तर तो खूपच घाबरत असे, आजीने मग त्याची ओळख करून द्यायची ,हळूहळू आई आहे ही तुझी ,हे बाबा आहेत.
त्याला हळूहळू आई कोण ,बाबा कोण हे पटत जाते, मग आईला आई म्हणू लागतो, मग
बाबांना बाबा म्हणत जातो, तशी वडिलांकडे जायची हिम्मत करू लागतो.
मोठा झाल्यावर सगळे नाते आणि त्यातील वीण कुठे कशी सैल झाली हे कळले..तरी अरुणची जास्त ओढ आणि लळा हा आजीकडेच होता.
गप्पा मारून झाल्यावरच आजी ने अरुणाला आश्रमात घेऊन चल मला ही विनंतीच केली, कारण तो आता तिकडे जाणार नाही हे ठरवून बसला होता.
अरुण,"परत नको आजी तो मार्ग ती तिची ओढ ,नको तो ध्यास, मी विसरलो तर तू ही विसर. आपले घर तिला स्वीकारणार नाही हे समजले आहे. मग सत्य स्वीकारले त्या अर्थाने मी ."
अरुण,"परत नको आजी तो मार्ग ती तिची ओढ ,नको तो ध्यास, मी विसरलो तर तू ही विसर. आपले घर तिला स्वीकारणार नाही हे समजले आहे. मग सत्य स्वीकारले त्या अर्थाने मी ."
आजी," मला भेटुवू नकोस ,मी भेट घेईल तिची, एक अनोळखी म्हणून, बोलून बघेन मी तिच्याशी एकदाच तू येऊ नकोस आत आश्रमात."
अरुण,"तू पुन्हा मला त्या तिकडे नको ग घेऊन जाऊस, मी नाही राहू शकणार तिला पाहिल्याशिवाय, पाय तिच्या कडे ओढत नेतील ,हे असेच होते माझ्यासोबत म्हणून म्हणतो नको."
आजीचे आणि अरुण चे बोलणे संपताच त्याचे आई बाबा त्यांच्या कडे येतात, दोघे ही अरुण च्या त्या आश्रमातील प्रोजेक्ट ची चौकशी करतात.
आई, "मग अरुण कुठपर्यंत आले तुझे काम, पूर्ण करशील तर एकदम छान झाले पाहिजे, तक्रार नको कसलीच त्यात ,आमच्या नावाचा प्रश्न आहे."
क्रमशः .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा