सवतीला दिलेले ते वचन
भाग ४
अरूणच्या वडिलांना त्या दोघांना तिथे बघून थोडा संशय येतो.
"आई आणि अरुण ह्या वेळी अनाथ आश्रमात कसे? आईच्या पाया पडत आहे, अरुणाला बाय करत आहे ती मुलगी कोण आहे? आईने तिच्या हातात साडी दिली आहे, शोध घेतला पाहिजे." म्हणत ते तिथून निघून गेले.
त्याच्या वडिलांच्या डोक्यात बरीच प्रश्न उभी झाली होती. मनातील वादळ काही शांत बसू देईना. अरुण तिथेच आश्रमात प्रोजेक्ट वर काम करत आहे. जर ती मुलगी त्या आश्रमातील असेल तर मला वाटते ती शंका खरी असावी. हा अरुण हळवा आहे. त्याला अनाथांबद्दल कळवळा आहे, इथपर्यंत ठीक आहे, मी समजू शकतो. पण एका मुलीने यावे काय, आईच्या पाया पडावे काय ,अरुणाला त्या नजरेने पहावे काय, जणू ती अरुण च्या प्रेमात असावी. ही मुलगी त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवते ते त्याला तर माहीत ही नसेल. साधा सरळ अरुण प्रेमासाठी आसुसलेला, अडकेल ही तिच्या जाळ्यात. पण हे खरेच असेच असेल असे कश्यावरून? त्याने ही प्रेमात पाडले असेल तिला. काहीही असले तरी मी हे होऊ देणार नाही.
अरुण आणि आजी घरी आले. दोघे ही खुश होते. ते पाहून बाबांच्या मनातील शंका दृढ झाली.
बाबा,"आई, कुठे गेला होतात?"
आई,"अरुणचा आंनद जिथे आहे तिथे गेलो होतो. त्याचे काम चालू आहे त्या आश्रमात जाऊनच आले. काय सांगू मला तिथे खूप छान वाटले."
बाबा,"तिथे तुझ्या पाया पडत होती ती मुलगी कोण होती ,तू साडी दिली ती?"
आजी जरा चपापलीच. पण अरुण जरा ही नाही घाबरला. हे पाहून बाबा अजूनच विचारणा करू लागले. आता तर खुद्द अरुणलाच प्रश्न विचारला.
बाबा," त्या मुलीच्या प्रेमात बिमात पडला तर नाहीस ना तू? जर तसे असेल तर ते विसर सगळे. अनाथ मुली सोबत संसाराचे स्वप्न बघत नसतात हे लक्षात घे,त्या संसार करण्याच्या लायकीच्या नसतात."
अरुणाला आता बाबांचा खूप राग आला होता. सुमित्रा बद्दल ते जे बोलले ते त्याला सहन झाले नाही. त्यांना काही उलट उत्तर न देता तो घरा बाहेर पडला. फक्त जाता जाता म्हणाला, "ती आईपेक्षा नक्कीच चांगला संसार करेन बाबा. ती माझ्यावर खूप प्रेम करेन. तुमचा आईवर विश्वास नाही इतका विश्वास माझा तिच्यावर आहे."
त्याने घर सोडले आणि पुन्हा आश्रम गाठले. त्याने सुमित्राला बाहेर बोलावले आणि तिला सरळ हात धरून विचारले, "तू माझ्यावर खरंच प्रेम करतेस ना? तुला मी आवडतो ना ? तू माझी जन्मभर साथ देशील ना? की तुझ्या ध्येयासाठी, तुझ्या नावासाठी तुझ्या प्रसिद्धीसाठी तू अर्ध्यात सोडून जाशील ? जर तुला मी तुझ्यावर करतो इतकेच प्रेम असेल तर
आत्ताच आपण लग्न करू, बोल तुला माझ्यासोबत लग्न करायला आवडेल ना, तुझी तयारी आहे ना?"
आत्ताच आपण लग्न करू, बोल तुला माझ्यासोबत लग्न करायला आवडेल ना, तुझी तयारी आहे ना?"
त्याला इतके अशांत आणि रागात तिने कधीच पाहिले नव्हते. तिने लग्नाला लगेच काही विचार न करता होकार दिला. आणि ते ही आत्ता न करता उद्या करू ह्यावर त्याला राजी केले.
दुसऱ्या दिवशी त्यांनी मंदिरात जाऊन लग्न केल. ,सोबत साक्षीदार म्हणून काही आश्रमातील मुली आणि भटजी होते. एकमेकांच्या गळ्यात माळा घातल्या दोघांनी काही वचन घेतले. अग्नीला साक्षी मानून फेरे घेतले. आणि सातव्या फेऱ्याच्या वेळी त्याने तिला उचलून फेरा घेतला.
त्याच्या घरी त्यांच्या लग्नाची बातमी त्याने स्वतः फोन करून कळवली.
घरात आजी आणि बाबा होते, आई काल कामानिमित्त गेली ती आलीच नव्हती.
बाबांना खूप राग आला होता. हे लग्न इतक्या लवकर पार पडेल, याचा आजीला तर विश्वास बसत नव्हता. तिला आता चिंता वाटत होती. एकीकडे सुभद्राने त्याची पत्रिका महाराजांकडून घेतली असेल आणि ती कोणाला तरी दाखवायची म्हणून गेली असेल. तिने ही अरूणच्या लग्नाची तयारी सुरू केली होती ,हे तेव्हाच कळले होते जेव्हा पत्रिकेचा विषय निघाला होता.
अरुणची आई अजून ही बाहेर होती ,तिचा फोन लागत नव्हता. इकडे बाबा संताप संताप करत होते. त्यांच्या रागावरून ते अरुणला काही ही करतील असेच वाटत होते. त्यात काल अरुण जाता जाता उद्धटपणे आपल्याच आई बद्दल बोलून गेला,त्याचा ही राग होताच.
अरुणचा पुन्हा फोन आला. आजीने उचलणार तोच बाबांनी आजी कडून हिसकावून घेतला आणि म्हणाले, "तू पुन्हा ह्या घरात तोंड दाखवायला यायचे नाही.तुझी सोय तू त्या आश्रमात कर ,तू आमच्या घराला कलंक लावला आहेस ,ह्या घराला तुझी गरज नाही."
अरुणने त्यांच्या आज्ञेचे पालन केलेच आणि तो पुन्हा घरी गेलाच नाही. आपल्यामुळे अरुणला आपल्या आई वडिलांना सोडून यावे लागले ,आणि ह्या आश्रमात रहावे लागले, याचे सुमित्राला खूप वाईट वाटत होते.
त्याने दृढ निश्चय केला, इथेच राहून सर्वांची सेवा करू. मग पहिल्या पगारात घर भाड्याने घेऊ अंक राजा राणीचा प्रेमाचा संसार करू.
अरूणचे म्हणणे खरे झाले, त्याला दुसरा प्रोजेक्ट मिळाला आणि पहिल्या पगार मिळताच ते त्यांच्या भाड्याने घेतलेल्या घरात राहू लागले.
अरूणच्या लग्नाला 6 दिवस होऊन गेले होते. त्याची आई दौऱ्या वरून घरी परत आली होती. ती येताच खूप खुश होती. अरुणसाठी एक मुलगी पसंत केली, ही आनंदाची बातमी तू सर्वांना देणार होती.
आजी वाती वळण्यात मग्न होत्या, बाकी घरात कोणी नव्हते.
सुभद्रा,"आई आज मी खूप खूष आहे. अरुण साठी एक मुलगी बघितली. खुप श्रीमंत घराणे आहे. मुलगी खुप सुंदर आहे. फक्त अरुण पेक्षा थोडी जास्त शिकलेली आहे."
ती बोलतच होती आणि आजी शांत होती.
ती बोलतच होती आणि आजी शांत होती.
आजी,"तू दमून आली आहेस ,जरा शांत बस. पाणी वागिरे घे. सखू जेवणाचे ताट तयार कर. "
आजीचे असे वागणे पाहून सुभद्रा शांतच झाली.
सुभद्रा,"कुठेत सगळे? अरुण दिसत नाही ,हे ही नाहीत."
आजी,"अरुण आता इथे रहात नाही ,तुझे हे दौऱ्यावर गेले आहेत."
आजीने सुभद्राला सत्य काय ते सांगितले ,तेव्हा सुभद्राच्या पाया खालची जमीन निसटली.
तिने डोक्याला हात लावून घेतला. ज्या स्थळामुळे कोटींचा प्रोजेक्ट अरुणला मिळाला, ते तर गेलेच पण श्रीमंत मुलगी ही गेली. त्यात दिलेले वचन मोडले म्हणून नाव खराब झाले ते वेगळे,पार्टीत आता तिला तिकीट मिळणार होते, ते ही मिळणार नाही.
तिने एक उपाय काढला, आजारी पडण्याचे नाटक करून लग्नाची तारीख काढली आणि इकडे अरुणला भानविक छळ करून सतत त्रास होत आहे ,मी जास्त दिवस जगेल की नाही असे वाटत आहे ,तू घरी येऊन मला एकदा भेट अशी रट लावणे सुरू केले.
इकडे अरुण सुमित्राचा संसार घरात जणू सुख पाणी भरत होते. त्यांना कोणी ही कश्या ही भावनिक गळ घालून दूर करण्याचा प्रयत्न करू शकत नव्हते. आईला तर नाहीच दाद दिली. आईला ही त्याने स्पष्ट सांगितले मी तिला सोडून येणार नाही, हवे असेल तर ती ही सोबत येईल नाहीतर माझी अपेक्षा ही कधी करू नकोस.
दोघांचा एकमेकांवर दिवसेंदिवस विश्वास आणि प्रेम घट्ट होत जात होते ,एकमेकांवर खूप जीवापाड प्रेम करत होते. तिला न मिळालेलं सुख तो तिच्या पायाशी आणून ठेवत होता.
आईला मात्र त्यांचे प्रेम, विश्वास आणि घट्ट होत जाणारे नाते खटकत होते, ती आता त्यांना दूर करण्यासाठी कोणत्या ही थराला जाणार होती ,अगदी जीव गेला तरी बेहत्तर ह्या पवित्र्यात होती.
शेवटी अरुण तसा येणार नाही हे पाहून तिने स्वतःच्या जीवाची बाजी लावायची ठरवले.
अरूणच्या वडिलांनी त्यांचे नाते स्वीकारायचे ठरवले ,त्यांना सुखात पाहून ते खूप आंनदी होते ,त्यांना ते घरी ही आणायला तयार झाले होते, पण हे होऊ द्यायचे नाही म्हणून त्याच दिवशी सुभद्राने विष प्राशन केले.
ती अतिदक्षता विभागात दाखल होती ,आणि तिची शेवटची इच्छा अरुणाला भेटण्याची होती..
अरुणला माहीत होते आई का करत आहे हे सगळे. तर फक्त मला दुसऱ्या लग्नाला तयार करण्यासाठीच. आणि सुमित्राला माझ्या आयुष्यातून दूर करण्यासाठी हे विष घेतले आहे,पण तरी मी दूर होणार नाही तिच्या पासून, हे नक्की.
अरुण, "आई तू शेवटी ह्या पातळीवर आलीसच ना, तुला हरणे माहीतच नाही ना, तू आई नाहीस ना कधी तू आई होशील ."
सोबत आलेली सुमित्रा त्याचे रडणे बघू शकते नव्हती ती स्वतःशीच बडबड करत एका कोपऱ्यात उभी होती म्हणत ",त्याला राग अनावर होत नाही आणि त्या भरात तो स्वतःच्या आईला काही ही बोलून जाईल, त्यात त्यांना काही झाले तर त्याचे दूषणे मला लागेल ,त्यापेक्षा त्याने दुसरे लग्न करावे ह्यातच त्याचे भले आहे, मी काय मी अनाथ आहेच ,पुन्हा अनाथ होईल, राहील मी पुन्हा एकटी पण तो तर अनाथ नाही ,त्याला त्याचे घर आहे ,त्याची माणसे आहेत मग का त्याने माझ्यासाठी अनाथ होऊन रहायचे. "
सुमित्राचे हे बोलणे अरुण चे बाबा ऐकत होते ,तेव्हा त्यांना तिचा स्वभाव आणि चांगुलपण कळले ,एक अनाथ असून ही किती प्रेम करते ती आपल्या मुलावर ,आणि आपण समजत होतो की ती काय प्रेम करणार ,तिला काय संसार कळणार ,काय ती प्रामाणिक असणार, पण आपण चुकलो तिला समजून घेतांना, पण हीच अरुण चे आयुष्य आहे ,तिला अरुण पासून दूर करता कामा नये..
आईने अरुणाला श्रुती सोबत दुसऱ्या लग्नासाठी तयार व्हायला सांगितले ,तेव्हा अरुण समोर फक्त सुमित्रा दिसत होती ,रडणारी हतबल ,एकटी ती .
सुमित्रा त्याच्या जवळ आली आणि तिने त्याला आईला वचन द्यायला भाग पाडले.
अरूणच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहत होत्या ,एकीकडे सुमित्रा ही अश्रू रोखू शकत नव्हती,बाबांना आणि आजीला त्यांना विरह बघवत नव्हता.
क्रमशः
****
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा