भाग ३
सवतीला दिलेले ते वचन
सवतीला दिलेले ते वचन
आई, "मग अरुण तुझे काम कुठपर्यंत आले? काम एकदम छान झाले पाहिजे, त्यात कसलीच तक्रार नको. आमच्या नावाचा प्रश्न आहे."
बाबा,"तू हे सांगायची गरज नाही. अरुणाला त्याची जबाबदारी चोख माहीत आहे. तो काम अगदी परफेक्ट करणारा मुलगा आहे. त्याने त्याच्या मेहनतीवर हा प्रोजेक्ट मिळवला आहे, आपल्या ओळखीवर नाही. त्यात आपले नाव खराब होण्याचा प्रश्नच येत नाही."
आज पहिल्यांदा बाबाने त्याची बाजू तर घेतलीच पण त्याची प्रसंशा ही केली. ते ऐकून त्याला भरून आल्या सारखे झाले होते. आपल्याला बाबा नावापुरते नाहीत, ही जाणीव त्यांच्या ह्या बोलण्याने झाली होती.
अरुण,"हो बाबा ,तुम्ही म्हणतात तेच होईल आता मला बळ आले आह. मीच ते काम पूर्ण करेल. तुमचे नाव होईल असे काही करेल हे नक्कीच."
अरुणच्या बोलण्याने, तो मोठा झाला आहे, त्याला जबाबदारीची जाणिव आहे, हे आईला कळले होते.
सुभद्रा,"सासूबाई, मी अरुणची पत्रिका महाराजांना दाखवून येते. ते काही सांगतात काय बघू."
आजी," पत्रिका दाखवण्याची इतकी काय घाई? एवढ काय महत्वाचे काम आहे?"
सुभद्रा,"एक महत्वाचे काम आहे, सांगते मी आल्यावर. आता फक्त तुम्ही एक करा, मी तुमच्यासाठी येवल्याहून एक सुंदर पैठणी आणि एक मंगळसूत्र करून आणले आहे."
आजी,"सुभद्रा काय गरज होती ग,मी ह्या वयात आता काय पैठणी नेसणार? मंगळसूत्र घालून कुठे जाउ? "
सुभद्रा,"आई कित्येक दिवसात आपलं छान बोलणं सुद्धा झाले नाही. अरुण आणि तुमच्या सोबत वेळ घालवू म्हणतेय. पण त्या आधी त्याच्यासाठी एक मुलगी बघून त्याचे लग्न करून मोकळी होऊ म्हणते."
आजीने तिचे बोलणे ऐकले आणि मनोमन बोलू लागल्या,ती वेळ निघून गेली आहे. आता फक्त स्वतःसाठी वेळ हवा आहे. त्यात अरुणचे लग्न त्याच्या आवडीच्या मुलीसोबत झाले म्हणजे मिळवले. असे आजीला वाटत होते. त्याने जे प्रेम आई वडिलांकडून अनुभवले नाही ते प्रेम त्या मुली कडून मिळो. त्याचे लग्न तिच्याशीच होऊ दे. तू व्यस्त राहिली नाहीस, तू स्वतःला व्यस्त केलंस. तू गुणाची होतीस, तुला शिकायचे होते पण तुला ते ह्या लोकांनी करू दिले नाही ह्या गोष्टीचा राग म्हणून तू घरा बाहेर पडलीस आणि अरूणच्या मनातून आईचे स्थान गमावलेस.
****
अरूणच्या पत्रिकेतील एक नाही तर दोन लग्नाचा योग आहे, या दोषा बाबत आजीने सुभद्राला मागे ही सांगितले होते. पण सगळ्यांनी त्याकडे हसून दुर्लक्षच केलं. आम्ही असले काही मानत नाही असेच ते म्हणत होते. अरुणला सुद्धा या बाबतीत काही माहिती नव्हते.
अरुण,"आजी चल आज आश्रमात जाऊ. तू तिला भेट. कशी आहे बघ. पण मी तुझा नातू आहे सांगू नकोस. ती माझा राग करते. पण तुला आवडते काय, बघ."
आजी,"बरं. आत ठेवलेली ती पैठणी आणि ते मंगळसूत्र घेऊन ये. "
आजी,"बरं. आत ठेवलेली ती पैठणी आणि ते मंगळसूत्र घेऊन ये. "
अरुण बुचकळ्यात पडला..
अरुण,"ते कश्याला आता ह्या घाईत."
आजी, "तू आता पुन्हा काम सुरू करणार आहेस ना तर येतांना देवीला देऊन येऊ म्हणते. म्हणजे सगळं कसं पक्क करून येऊ, देवीच्या मर्जीने."
अरुण,"ही गम्मत होती? पण मला अजिबात हसू आले नाही.
मी या बाबतीत खूप सिरीयस आहे."
मी या बाबतीत खूप सिरीयस आहे."
आजीला बाईक जमत नसल्याने तो मोठी गाडी काढतो. आजीला समोर बसवतो आणि आश्रमाच्या दिशेने निघतात.
इकडे खूप दिवसांपासून काम बंद झाले होते.अर्धवट काम राहिले होते.त्यात इतर कोणी इंजिनिअर हे फुकट काम करायला तयार नव्हते. मग हे काम किती दिवसांनी पूर्ण होईल किंवा होईल की नाही याची चिंता सुमित्राला सतावत होती. ती खूप त्रासाली होती. पाऊस सुरू होणार होता. त्यात अर्धवट काम, कसे कोण पूर्ण करणार. तो एक मूर्ख माणूस अरुण टिकेकर आला होता ,छान काम करत होता. पण मी त्याला उगाच नाही नाही ते बोलून गेले. तसा साधाच होता पण सारखी माझ्या मैत्रीणी सोबत मिळून माझी गंमत करत होता. ते अति होत होत, म्हणून थोडी रागावून काय बोलले तर हा सरळ काम सोडूनच गेला. देवा काम पूर्ण होऊ दे, त्याचा सगळा मूर्खपणा सहन करेल, ती देवाजवळ प्रार्थना करत होती.
आरती," सुमित्रा तू त्याला खूप मिस करतेस का ग ? तो अरुण दादा ,आता आठवतो का तुला ह्या अर्धवट कामाकडे बघून."
सुमित्रा,"हे काय आता नवीन, त्या अर्धवट कामयसारखा तो ही अर्धवट होता. पण आपलं काम अडलंय म्हणून तोच आठवतोय सारखा, मग दुसरा काही पर्याय ही नाही."
आरती,"सुमित्रा पण तो खूप चांगला मुलगा होता ग, त्याने कधी वाईट वाटेल असे बोलला ही नाही ना वावग वागला. त्याला तू आवडली होतीस ग असे वाटत होते ."
सुमित्रा, "तू जा बाई ,आता ह्या गोष्टी आपल्या साठी नाहीत, आपण अनाथ आहोत ,ही स्वप्न नाही बघायची मला, मी समाज सेवेत आयुष्य काढणार त्यासाठीच मी MSW केलंय, हे मनात ही नाही माझ्या, तो किती ही चांगला असो पण परिस्थिती बदलणार आहे का, त्याला त्याचा परिवार असेल, त्यांच्या अपेक्षा असतील ह्याचा कडून. आज हुरळून जाईल पण पुढे काय."
आरती, " तू अशीच राहू नकोस ,तुला कोणी मागणी घातली तर नकार देऊ नकोस ,तुला ही इतके दिवस कळले असेलच की तो तुझ्यावर खरंच प्रेम करत आहे, बघ तुझ्या मनात तो आहे म्हणूनच तुला तो आला नाही म्हणून रुखरुख लागली आहे, काम तर तसे ही कोणी ही करेन, तसा फोन ही आला आहे पण तो जे मन लावून करत आहे तसे नाही करणार कोणी."
सुमित्रा चिडली आणि तिने आरतीच्या बोलण्याला मध्येच तोडून ,हातातील पुस्तक आपटून रागात निघून गेली.
त्यात आजी ने बाहेरून आवाज दिला.
आजी,"कोणी आहे का, मला जरा
बोलायचे आहे "
बोलायचे आहे "
सुमित्रा, "हो आहोत आम्ही ,थांबा मी येते "
म्हणत सुमित्रा गेट उघडायला गेली
म्हणत सुमित्रा गेट उघडायला गेली
हात धरून आजीला आश्रमात आणले, आरतीला पाणी आणायला संगीतले ,आजीला ओट्यावर बसवले..
आरती, "आजी पाणी घ्या आणि बसा जरा वेळ, इतक्यात उन्हातून आलात जरा श्वास घ्या मग बोला."
आजी लगेच बोलणार इतक्यात, सुमित्रा बोलायला पुढे आली..
सुमित्रा, "बोला आजी इकडे कश्या काय आलात,कोण हवंय तुम्हाला.? "
आजी, "आश्रमात आले पण मला जबाबदार व्यक्तीला भेटायचे आहे,इथल्या."
सुमित्रा, "हो बोला मीच सांभाळते हे आश्रम ,मीच जबाबदारी घेते इथली."
आजी," माझी एक इच्छा आहे, मला नात सून म्हणून इथलीच एक मुलगी आवडली आहे, माझा नातू खूप शिकलेला आहे, मी त्याच्यासाठी एक इथल्या आश्रमातील मुलगी शोधते"
सुमित्रा,"आजी इथे मुली अनाथ आहेत, घर ना कोणी आई वडील ,इथे कोणी का असे स्थळ घेऊन येईल, तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आला आहात, तुम्ही परत जा.."
आजी,"मी तिला सांगेन तिला माझी नात सून व्हायचं असेल तर ती सांगेन, तिची इच्छा जाणून घ्यायची आहे हो मुली मला."
तितक्यात आरतीची नजर गेट कडे जाते ,लपून छपून बघणाऱ्या अरुण कडे, तिला समजते आजी अरुण चे स्थळ घेऊन आली असावी ,ते ही सुमित्रासाठी.
आरती, "आजी तुम्ही तुमच्या नातवासाठी कोणती मुलगी पसंत केली आहे ,जरा त्या मुलीला सांगा, तिला तशी खात्री नाही पटणार.आणि हो त्या नातवाची ओळख ही सांगा म्हणजे त्या मुलीला नकार देताच येणार नाही"
आजी कडे सुमित्रा बघतच होती ,किती ह्या निग्रह करून आल्या आहेत,पण नको तिथे वेळ वाया घालवत आहेत, कोण कसला नातू, कोण ही आजी आणि का उगाच मी त्यांना समजावत आहे.
सुमित्रा,"चला आजी आता मी तुम्हाला तुमच्या घरी सोडते, सून शोधावी आणि ती मिळावी ती ही जागाच नाही,मला आता कठोर होण्यास भाग पाडू नका,तुमच्या घरचे तुमची वाट बघत असतील, फार वेळ इथे थांबू नका, इथून घरी जायला कोणतीच गाडी नाही म्हणून मी तुम्हाला सोडून येते."
सुमित्रा आजीच्या हाताला धरून बाहेर गेट पर्यंत सोडायला जाणार इतक्यात समोरून अरुण येतो, आणि त्याला पाहून सुमित्रा जागच्या जागी तशीच थांबते, त्याला सुखरूप पाहून मनाला तिच्या छान वाटते, तो नव्हता तेव्हा कोणी वेडे होऊन तिच्याशी कधी गप्पा मारल्या नव्हत्या ,की कोणी तशी विचारणा ही केली नव्हती.
ती मनातल्या मनात जणू आंनदी झाली त्याच्यावर रागवणारी सुमित्रा गेले दोन दिवस त्याच्या आठवणीत बाहेर फेऱ्या मारत होती ,त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली होती, देवाकडे हे मागणे मागत होती की तो येऊ दे आणि त्याच्या बद्दल माझ्या ही मनात प्रेम आहे हे माझेच मला कळू दे.
आज त्याला खऱ्या अर्थाने सुमित्राच्या वागण्याचा राग आला होता. आजी इतक्या प्रेमाने तिला सांगत होती पण तिने आजीला ही कठोर आणि तुसडी वागणूक दिली असे त्याला जाणवले.
अरुण, "चल आजी इथे तू जरा ही वेळ थांबू नकोस, तुला समजून जायला हवे होते, त्यांना नाते जोडायला आवडत नाही, पण तू तिथेच थांबलीस, तुझा अपमान करून घेत तिच्याशी बोलत होतीस.."
आरती, "बघत काय बसली आहेस जा जाऊन माफी मागून बघ आजीची, म्हणजे अरुणचा राग कमी होईल, त्याला तुझा राग आला आहे."
सुमित्रा," आजी मला खरंच माफ करा, बोलण्याचा भरात मी चुकून काही बोलले असेल त्याची मी माफी मागते."
अरुण तिच्या कडे बघतच होता, खरे तर ती चुकली नव्हतीच पण आपण ही तिच्यावर रागवू शकतो हे तिला कळायला पाहिजे, आणि रागवल्यावर समोरच्या व्यक्तीला कसे वाईट वाटते हे तिला कळायला हवे..
आजी,"मला माझ्या नातवासाठी जी मुलगी हवी आहे तिला आई वडील असो नसो, त्याला काही ही फरक पडणार नाही, तो फक्त तिच्यावर जीवापाड प्रेम करेल आणि तसेच प्रेम सदैव करत राहील ,तोपर्यंत मी ही तिला मागणी घालणार नाही.."
सुमित्राला आजीच्या बोलण्याचा ओघ कळला, आजीच्या म्हणण्यानुसार तिला ही हेच हवे होते, काही वेळ हवा होता, त्याला जाणून घ्यायला आणि त्याला आपलेसे करायला ही.
आज सुमित्राला तिच्या मनाने कौल दिला होता, तिला ही प्रेम होऊ शकते, तिला ही कोणाची तरी हुरहूर लागू शकते...त्याला बघताच अचानक हेच धडधडणारे हेच हृदय बंद पडू शकते...तो रागावला तर त्याला समजवण्यासाठी अधीर होऊ शकते...एक हृदय आपल्याला ही प्रेमाचा संकेत देऊ शकते..
आजी आणि अरुण बाहेर पडत असतांना अचानक अरुण च्या बाबांची गाडी तिथे येते..
क्रमशः..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा