आपण मागील भागात बघितलं, मेघनाच्या भावाची म्हणजेच मनोजची एक फ्रेंड मनोजसोबत अमेरिकेतून आलेली असते, तिला विद्याच्या लग्नाला यायचे असते पण मनोज घरी जुलियाची ओळख त्याची फ्रेंड म्हणून करून देऊ शकणार नसल्याने यात मनोज मेघनाची मदत मागतो. यावर मेघना उपाय शोधते की जुलिया शिवानीच्या होणाऱ्या नवऱ्याची फ्रेंड आहे असं ते घरच्यांना सांगायचे ठरवतात. आता बघूया पुढे काय काय होईल?
ठरल्याप्रमाणे जुलिया शिवानीसोबत लग्नघरी आली. शिवानी व मेघनाने घरातील सर्वांसोबत जुलियाची ओळख करून दिली. जुलिया ख्रिश्चन असली किंवा अमेरिकेत राहत असली तरी तिला मराठी उत्तम बोलता येत होतं फक्त बोलण्यात अमेरिकन टोन जाणवत होता. जुलियाने घरातील सर्व वडीलधाऱ्या व्यक्तींना पाया पडून नमस्कार केला. जुलिया मेघनाच्या आई बाबांच्याही पाया पडली. जुलियाने मेघनाला व तिच्या आईला घट्ट मिठी मारली. जुलियाने विद्यासाठी अमेरिकेतून आणलेले गिफ्ट दिले, गिफ्ट थोडे महागडे असल्यामुळे विद्याला घेण्यात कसेतरी वाटत होते पण जुलियाने खूपच आग्रह केल्याने विद्याला गिफ्ट नाकारता आले नाही. जुलियाने मेघना व तिच्या आई बाबांसाठीही गिफ्ट्स आणलेले होते पण ते गिफ्ट्स तिला सर्वांसमोर मेघना व तिच्या आई बाबांना देता आले नाही, जुलियाने एकांतात भेटून मेघनाला तिचे व तिच्या आई बाबांसाठी आणलेले गिफ्ट्स दिले. जुलिया सर्वांशीच आपुलकीने, प्रेमाने बोलत होती. मनोज जुलिया सोबत बोलणं कटाक्षाने टाळत होता.
संध्याकाळ झाली, संगीत असल्याने मुलाकडची सर्व मंडळी आली होती, मुलीकडच्यांची तयारी, धावपळ सुरू होती. मेघनाने लहंगा घातला होता तर कानात लोंबते झुमके घातले होते, झुमके व लहंगा मेघनाला शोभून दिसत होते. मेघनाने जुलियाला लहंगा घालायला दिला होता. जुलिया व मेघना दोघीही अतिशय सुंदर दिसत होत्या.
आदित्य त्याच्या कॉलेजच्या मित्रांसोबत आला होता. आदित्यने ब्लॅक कलरचा पठाणी सूट घातला होता. मेघनाने आदित्य व मनोजची ओळख करून दिली.मेघनाची आई व आदित्यची ही भेट झाली. आदित्यने मेघनाला नजरेने व इशाऱ्याने " सुंदर दिसतेस" अस सांगितलं. आदित्य मेघनाकडे एकटक बघत असल्याने मेघना लाजून दुसरीकडे निघून गेली.
वैभवने थ्री पीस घातला होता तर मेघनाने लॉंग गाऊन घातला होता. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरवात झाली. पहिला परफॉर्मन्स वैभव व विद्याचा " रब ने बना दी जोडी" या गाण्यावर झाला, वैभव व विद्याने अप्रतिम डान्स केला होता. दुसरा डान्स विद्या, मेघना व त्यांच्या बहिणींनी " एली रे एली" या गाण्यावर केला. मेघना व तिच्या बहीण भावांनी " खिलें खिलें चेहरों के साथ घर ये मेरा" या गाण्यावर ग्रुप डान्स केला. वैभवच्या फॅमिलीकडून बरेचशे डान्स झाले. सर्वच जण डान्स अप्रतिम करत होते. आता वेळ होती ती fusion डान्सची यात मुलीकडून मेघना डान्स करणार होती तर मुलाकडून कोण येणार याची आतुरता लागली होती. मेघना स्टेजवर जाऊन उभी राहिली, म्युझिक सुरू झाल्यावर आदित्यने स्टेजवर एन्ट्री केली, सुरवातीला मेघनाला भीती वाटली होती की कोणा अनोळखी मुलासोबत कसा काय डान्स करायचा? पण आदित्यने एन्ट्री घेतल्यावर मेघनाचा जीव भांड्यात पडला. गाण्याला सुरुवात झाली आणि मेघना व आदित्यने गाण्यावर ताल धरला,
"वाह वाह रामजी,
जोडी क्या बनायी
भैया और भाभी को बधाई हो बधाई
सब रसमो से बडी है, जग में दिल से दिल की सगाई
आप की कृपा से ये, शुभ घडी आयी
जिजी और जिजा को, बधाई हो बधाई
सब रसमो से बडी है, जग में दिल से दिल की सगाई
वाह वाह रामजी
वाह वाह रामजी
मेरे भैया जो चुप बैठे है
देखो भाभी ये कैसे ऐठे है
ऐसें बडे ही भले है
ऐसें बडे ही भले है
माना थोडे मनचले है
पर आप के सिवा कही भी न फिसले है
देखो देखो खुद पे जीजी इतराई
भैया और भाभी को बधाई हो बधाई
सब रसमो से बडी है जग में दिल से दिल की सगाई
वाह वाह रामजी
सुनो जिजाजी अजी आपके लिये
मेरी जिजी ने बडे तप हैं किये
मंदिरो में किये फेरे
पूजा सांझ सवेरे
तीन लोक तैतीस देवो को ये रही घेरे
जैसी मैंने मांगी थी वैसी भाभी पायी
जिजी और जिजा को बधाई हो बधाई
सब रसमो से बडी है जग में दिल से दिल की सगाई
वाह वाह रामजी"
आदित्य व मेघनाने अतिशय सुरेख परफॉर्मन्स केला होता, डान्स संपल्यावर सर्वांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला. सर्व डान्स बघून जुलियाला डान्स करण्याची इच्छा झाली, तिला डान्स पार्टनर पाहिजे होता, मनोज सोडून सर्वांचे डान्स करून झाले असल्याने सर्वांनी मनोजला जुलिया सोबत डान्स करण्यासाठी प्रोत्साहित केले,
" आज है सगाई सुन लडकी के भाई
जरा नाच के हमको दिखा
कुडी की तरह ना शरमा
हाय तु मेरी गल मान जा
हां तु मेरी गल मन जा
सबको नचाऊ
नच नच के दिखाऊ
आ मुझको गलें से लगा
मुंडे से जरा आँख लडा
होये तु मेरी गल मान जा
हाय तु मेरी गल मान जा
ओ सोनिये
सर पे सजाके सेहरा
बारात लेके आऊ
दुलहन तुझे बनाके
डोली में लेके जाऊ
ओ शावा ओ शावा
ओ शावा ओ शावा
भोली समझके मुझपे
ना डाल ऐसें दाने
शादी नहीं करूंगी
जा मान जा दिवाने
ओ शावा ओ शावा
ओ शावा ओ शावा "
जुलिया व मनोजने अप्रतिम डान्स केला, त्यांची केमिस्ट्री बघून मेघनाला संशय आला की मनोज व जुलिया मध्ये नक्कीच काही तरी चालू असणार. सर्वांत शेवटी " हम साथ साथ है" या गाण्यावर सर्वांनी डान्स केला.
कार्यक्रम संपायला बरीच रात्र झाल्याने सर्वजण पटापट आपापल्या घरी जायला निघाले. आदित्यला मेघनाला भेटण्याची खूप इच्छा होती पण मेघना दुसऱ्याचं कामात व्यस्त होती. आदित्यने मेघनाला फोन करून गेटजवळ बोलावले, मेघना सर्वांच्या नजरा चुकवत चुकवत गेटपर्यंत पोहोचली. मेघना आदित्यला शोधत होती तेव्हा आदित्यने तिचा हात पकडून तिला बाजूला ओढले, त्याने तिला अशा ठिकाणी नेले जिथे कोणाचीही नजर त्यांच्यावर पडणार नाही.
मेघना--- आदित्य हे काय आहे? कोणी बघितलं तर काय विचार करतील आणि घरातील सर्व मला शोधत असतील.
आदित्य--- मेघना पाच मिनिटं फक्त मला तुला बघू देत ना, शांत बस ( आदित्यने मेघनाच्या ओठावर बोट ठेवून तिला शांत बसायला लावले, मेघनाच्या चेहऱ्यावर केसाची एक बट पुढे आली होती, आदित्यने हळूच मेघनाच्या चेहऱ्यावरची केसांची बट मागे केली, आदित्यच्या अचानक स्पर्शाने मेघना मोहरून निघाली होती, आदित्य तिच्या अजून जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण मेघनाने आदित्यला दूर ढकलले, आदित्यने परत मेघना जवळ जाण्याचा प्रयत्न यावेळी मेघनालाही आदित्यचा स्पर्श हवाहवासा वाटत होता, दोघेही एकमेकांच्या मिठीत सामावणार तोच मेघनाचा फोन वाजला. फोनच्या रिंगमुळे आदित्य व मेघना दोघेही दचकले, आदित्य मेघनापासून पटकन बाजूला झाला. मेघना लाजून तेथून निघून गेली)
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा