पूर्वार्ध.....
मागील भागात आपण वाड्याबद्दल थोडक्यात माहिती बघितली.तसेच वाड्यातील सदस्यांची ओळख करून घेतली. त्याप्रमाणेच आक्कासाहेबांबद्दल सुध्दा माहिती बघितली. आता मुळ कथेला सुरुवात करुया.
आता पुढे....
आज खूपच खास असा दिवस होता. त्याला कारणही तसेच होते. अक्कसाहेबांचा नातू म्हणजेच हंबीरराव यांचा मोठा मुलगा सत्यजीत हंबीरराव इनामदार. हा चार वर्षांनंतर आपल्या मायदेशी परतणार होता. त्याच्या स्वागतासाठी वाड्यात जय्यत तयारी सुरू होती. वाडा हा चहूबाजूंनी सजवला होता. आणि हो नुसता वाडा च नाही, तर संपूर्ण गावात स्वागताची तयारी सुरू होती. गल्ली-बोळा रांगोळ्यांनी, पताक्यानी सजलेल्या होत्या. कारण सत्यजीत राजे येणार होते.
सत्यजीत म्हणजे नातवंडांनमध्ये सगळ्यात मोठे. आणि अर्थात अक्कसाहेबांचे लाडके, विश्वासू, जीव की प्राण. त्यामुळे सगळया गोष्टी सत्याच्या आवडीनूसारच व्हायला हव्या. यावर अक्कासाहेबांचा कटाक्ष होता. बाहेरील कामकाजात त्यांची देखरेख होती. तर इकडे आईसाहेब आणि काकू दोघींची लगबग स्वयंपाक घरात चालू होती. काकू फक्त नावाला सोबत होती. वर वर दिखावा. कारण सगळीकडे सत्याचेच कौतुक त्यांना अजिबातच देखवत नव्हते. अगदीच संकुचित मनोवृत्ती बाळगणाऱ्या होत्या त्या. त्यामुळे सगळीकडे त्यांची नाक
मूरडणी सुरू होती.
अगदीं पंच पकवानांचा दरवळ घरभर पसरला होता. अर्थात आज सगळी आवड सत्याचीच. आई साहेबांना तर काय करू नी काय नको असे झाले होते. नोकर चाकर हाताखाली असून सुध्दा त्यांना सगळ्या गोष्टी आपल्या हाताने करायच्या होत्या. आणि तसे त्यांनी केले सुध्दा होते. कारण इतक्या वर्षांनी लेक घरी येणार म्हंटल्यावर स्वतःच्या हातांनी जेवण बनवून आईला सत्याला खाऊ घालायचे होते.
इकडे हंबीरराव सुध्दा मुलगा येणार म्हणून खूष होते. त्यांच्या आनंदात संपतराव (काका ) सुध्दा सामील होते. अर्थात राजघराण्याच्या गादीवरील वारसदार होणार होते सत्यजीत.
त्या साठीच हा सगळा सोहळा संपन्न होणार होता.
त्या साठीच हा सगळा सोहळा संपन्न होणार होता.
पण या सगळ्या गोष्टींना अनभिज्ञ असा सत्यजीत. त्याला या सगळ्या गोष्टींची काडीमात्र कल्पना नव्हती. कारण त्यांचा या सगळ्या गोष्टींवर मुळात विश्वास नव्हता. असे म्हणण्यापेक्षा या गोष्टी पटत नव्हत्या. जहागीरदार, वारस, राजघराण या सगळ्या गोष्टींपासून त्याला दूरच राहायचे होते. आणि यासाठी त्याने परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. पण तत्पूर्वी आपल्या घरच्यांना, अक्कासाहेबांना भेटून, विश्वासात घेऊन आपले म्हणणे पटवून द्यायचे होते. या सर्व गोष्टींची बोलणी समोरासमोर करायची होती. यासाठीच तो पुन्हा आपल्या मायदेशी परतणार होता.
एअरपोर्ट वर बाहेरील बाजूस सत्यजीत ला रिसिव्ह करण्यासाठी गाडी सज्ज उभी होती. अक्कासहेबांचे खास म्हणजेच भरवशाचे असे सेक्रेटरी परांजपे हे सत्यजीत च्या स्वागतासाठी सज्ज होते. सोबत फुलांचा बुके, हार सुध्दा तयार होते. फ्लाईट अगदीच वेळेत पोहोचली होती. सत्यजीत बाहेर येताच. त्यांनी परांजपे काकांना लांबूनच ओळखले आणि स्मितहास्य देत. हाताने इशारा केला. तेवढ्यात परांजपे काका आणि त्यांचे सहकारी यांनी पुढे येऊन सत्यजीत चे स्वागत केले. सत्यजीत यांनी भाऊक होऊन परांजपे काकांच्या पाया पडल्या आणि गळाभेट घेतली. काकांचेही डोळे पाणावले. त्यांनी सत्यजीत च्या पाठीवर थाप देत त्यांचे
" वेलकम सत्यजीत राजे " या शब्दांत स्वागत केले. परदेशी राहून सुध्दा सत्यजीत आपले संस्कार विसरले नव्हते.
स्वभावाने अत्यंत हळवे, प्रेमळ, स्वतःचे मत परखडपणे मांडणारे. दिसायला अत्यंत देखणे , राजघराण्याला शोभतील असे राजसपुत्र, भरभक्कम अशी देहयष्टी, हलकासा गव्हाळ रंग, लांबसडक नाक, मोठे कपाळ, त्यावर येणारे केस, तसेच चेहऱ्यावर शोभणारा गॉगल, लेदर जॅकेट विथ ब्लॅक जीन्स या सगळ्यांनी सत्यजीत अगदीच रुबाबदार दिसत होता. कोणतीही मुलगी त्याला वळून बघितल्या शिवाय पुढे जात नसे.
तर हे आहेत....
* सत्यजीत हंबीरराव इनामदार. - आपल्या कथेचे नायक.
परंतु इकडे वाड्यावर अक्कासाहेब मात्र सत्यजीत यांना राजघराण्यातील गादी वर बसवण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणू पाहत होत्या. घराण्याचा पुढचा सगळा कारभार अगदीच उत्तम रित्या सत्यजीत सांभाळतील याची त्यांना पुर्ण खात्री होती. पण सत्यजीत यांच्या मनातील कल्पनेची यत्किंचितही कल्पना त्यांना नव्हती.
* मायदेशी परतल्यावर आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय हे समजल्यावर काय करतील सत्यजीत..??
* सत्यजीतच्या मनात काय चालू आहे हे अक्का साहेबांना समजल्यावर काय होणार..??
भेटूया पुढील भागात
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा