Login

ती चांदरात भाग ४

नक्की काय आहे वाड्याचे रहस्य.. त्यासाठी वाचत राहा ती चांदरात
पूर्वार्ध.....

परंतु इकडे वाड्यावर अक्कासाहेब मात्र सत्यजीत यांना राजघराण्यातील गादी वर बसवण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणू पाहत होत्या. घराण्याचा पुढचा सगळा कारभार अगदीच उत्तम रित्या सत्यजीत सांभाळतील याची त्यांना पुर्ण खात्री होती. पण सत्यजीत यांच्या मनातील कल्पनेची यत्किंचितही कल्पना त्यांना नव्हती.



* मायदेशी परतल्यावर आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय हे समजल्यावर काय करतील सत्यजीत..??
* सत्यजीतच्या मनात काय चालू आहे हे अक्का साहेबांना समजल्यावर काय होणार..??


आता पुढे....

*****************


" अग गार्गी आवरलं का नाही तुझ आजुन.. चल लवकर.. हि बस जर चुकली ना मग पुढचे दोन दिवस मग बस नाहीये गावाला जायला..." बाबा


" हो हो... झाल आलेच पाच मिनिटात..." गार्गी


" तुझे पाच मिनिटं म्हणजे आमचा अर्धा तास.. म्हणजे आता आपल जाणं दोन दिवस पुढेच ढकलावे लागणार वाटत.."
बाबा मुद्दाम मोठ्या आवाजात बोलत होते.


तेवढ्यात गार्गी आत मधून बॅग घेऊन बाहेर येत म्हणते..
" असं कसं पुढे ढकलणार.. हे बघा आले मी. तुम्ही घेतलाय ना सगळ बरोबर, काही राहील नाही ना. तुमच्या गोळ्या, मोबाईल चार्जर."


" हो ग बाई सगळ घेतलय. तू तुझ सामान घेतलं ना सगळ. परत हे राहिलं ते राहिलं करू नकोस."
बाबा डोळ्यांवर चष्मा चढवत बोलत असतात.


"  हो घेतलय मी पण सगळ."
असे म्हणत गार्गी आणि बाबा दोघेही घराला कुलूप लावून बस स्टँडवर जाण्यासाठी घराबाहेर पडतात.


गार्गी लहान असतानाच. तीची आई आणि लहान भाऊ या दोघांचा अपघातामध्ये मृत्यु झाला होता. तेव्हापासून गार्गी चा सांभाळ तिच्या बाबांनीच केला. सावत्र आईचा जाच नको यासाठी त्यांनी दुसरे लग्न नाकारून. स्वतःच आई आणि वडिलांचे कर्तव्य पार पडले. अगदींच तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांनी आपल्या मुलीचे संगोपन केले होते. कोणत्याच गोष्टीची झळ तिला लागू दिली नाही. बाबांसाठी आपली लेक म्हणजे जीव की प्राण होती. आणि गार्गी सुध्दा अगदी तशीच होती.

बाबांशिवाय तीचे पान हालत नव्हते. सगळ्या गोष्टीत तिला बाबा लागायचे. त्यांना विचारल्याशिवाय ती कोणतीच गोष्ट करत नसे. अभ्यासात हुशार होती. तिला पुरातन गोष्टींमधे जास्त रस होत्या. जुने वाडे, त्यांचें बांधणी कौशल्य, त्यांची रचना. या सगळ्या गोष्टींची तिला आवड होती. आणि आपली आवड जोपासण्यासाठी तिने त्या पद्धतीने शिक्षणं घेऊन. त्यात पारंगत होऊन ती आर्किटेक्चर झाली होती. तिला नोकरीसाठी  चांगल्या ठिकाणी रुजू होण्यासाठी तसे पत्र हि मिळाले होते.


पण तत्पूर्वी गावी जाऊन आपल्या आजी आजोबांना भेटून यावं हा विचार करून ती बाबांसोबत गावी जायला निघाली होती. कामावर रुजू होण्यासाठी आजुन पंधरा दिवस बाकी होते. त्यामुळे गावाकडे दहा बारा दिवसाचा मुक्काम होता.


गार्गी नावाचं अर्थ म्हणजे हुशार बुद्धिमान स्त्री. अगदी नावाला
साजेशी होती ती. सगळ्या गोष्टीत हुशार, अभ्यास, स्वयंपाक, सगळ्यात पारंगत. आपल्या गोड स्वभावाने सगळ्यांची मने जिंकणारी. शिवाय आपले मत परखडपणे मांडणारी.
तिचा भूतदया, अंधश्रद्धा यावर मुळीच विश्वास नव्हता. पण त्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यात तिला अतिशय रस होता. पुरातन काळातील गोष्टी, त्यामागील रहस्य, त्यामागची कारणे शोधून काढण्यात तिला जास्त आवड होती. मात्र तीचे बाबा या गोष्टींच्या विरोधात होते. पण फक्त लेकीच्या आवडी पुढे ते शांत होते. त्यांना आपल्या मुलीच्या काळजीपोटी चिंता वाटत असे.

गार्गी ची आई सुध्दा यासगळ्यावर विश्वास ठेवत होती. त्यामुळे त्यांचा अपघात झाला. हे सांगणे फक्त जगासाठी होते. मात्र मुळ कारण काही वेगळेच होते. ते फक्त आणि फक्त बाबांना ठाउक होते. गार्गीला अद्याप तरी काहीच माहीत नव्हते. त्यामागे सुध्दा रहस्य दडलेले होते. म्हणून या सगळ्या गोष्टींपासून आपल्या मुलीने दूर राहावे असे त्यांना वाटत होते. कारण यामुळेच त्यांनी आपली पत्नी आणि मुलगा यांना गमावले होते. आता फक्त गार्गी च त्यांचा आधार होती.

आणि गावाकडे असणारे आपले आई वडील. म्हणजेच गार्गी चे आजी आजोबा. आधी सगळे एकत्रच गावी राहत असे. पण पत्नी आणि मुलासोबत अस घडल्यामुळे बाबा स्वतः आपली मुलगी गार्गी हिला घेऊन गाव सोडून इकडे मुंबई ला राहायला आले. मुलीवर त्या सगळ्याची सावली सुध्दा पडली नाही पाहिजे. असा निर्णय घेऊन त्यांनी गाव सोडले. फक्त आजी आजोबांना भेटायला तेवढं गार्गी आणि तिचे बाबा एखाद वर्षाआड जात असे.


* नक्की काय असेल गार्गीच्या आईं आणि भावाच्या मृत्यु मागचे रहस्य..??
* सत्यजीत घरी आल्यावर काय होणार..??
*अक्का साहेबांचा निर्णय सत्यजीत ला मान्य असेल का..??