टेंम्पररी सासू

टेम्पररी सासू
रविवारची सकाळ.

शर्वरी किचन मध्ये स्वयंपाक करायची तयारी करत होती. पंकज हॉल मध्ये बसुन मोबाईल बघत होता.रविवारचा दिवस म्हणजे हक्काची सुट्टी. फक्त आराम अस काहीस गणित होत पंकजच. त्याला आराम करताना बघून तिला त्रास होत होता.

' म्हणजे रविवार असून हा आराम करणार आणि मी रविवारची सुट्टी काय किचन मध्ये काम करण्यात घालवणार! '

" पंकज ss, काय रे नुसता मोबाईल बघत बसला आहेस."

पंकज मोबाईल बघण्यात इतका दंग होता. की त्याला ती काय बोलतं होती. ते ऐकू आलं नव्हत.

" पंकज, मला जरा मदत कर म्हणजे मला पण आराम करता येईल." ती भाजी पिशवीतून बाहेर काढत म्हणाली.

" पंकज, अरे ऐक ना , मशीन मध्ये कपडे धुवायला लावले होते. बघ ना जरा. मशीन झालं का ? पाणी जात दुपारी."

ती आज आता कोणती भाजी करायची हे ठरवत होती. सगळ्या भाज्या वेगवेगळ्या करून ठेवत होती.

पण अजून ही पंकज महाराज मोबाईल बघण्यात व्यस्त होते. तिन आज मिक्स व्हेजिटेबल भाजी बनवायची ठरवली. त्या प्रमाणे तिने टोमॅटो , कांदा, आलं,लसूण, गावर, सिमला मिर्ची, बटाटा बाजुला काढून टेबल वर ठेवलं. बाकीच्या भाज्या तात्पुरत्या प्लॅस्टिक बॅग मध्ये वेगवेगळ्या भरून बाजुला ठेवून दिल्या. तिच एक काम हातावेगळ झालं , तरी देखील पंकजच लक्ष मोबाईल मधून तुसभर देखील हटल नव्हत.

" अरे पंकज, कुठ आहेस तु, माझी भाजी निवडून झाली तरी देखील तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल नाही."

ती स्वतः शी बडबड करत बाहेर हॉल मध्ये आली. समोर पंकज टी पॉय वर पाय ठेवून सोफ्यावर आरामात बसला होता. समोर टीव्ही पण चालू होता. सोफ्याच्या बॅक रेस्ट वर नॅपकिन तसाच पडला होता. समोर चहाचा कप ठेवला होता. तळाशी राहिलेला चहा सुकून गेला होता. करवडला होता कप. ते बघून तिच डोकं सटकल.

" पंकज ss, काय हे, कसा बसला आहेस, नुसता पसरला आहे सोफ्यावर."

तिचा चिडलेला आवाज ऐकून तो जरा सावरून बसला.

" चहा प्यायला, तर रिकामा कप आत धुवायला आणून द्यायला काय झालं होतं? "

" हा नॅपकिन, हा टी पॉय वर का टाकला आहे. ?धुवायला का नाही टाकला. ? मगाशी मशीन लावलं तेव्हा टाकला असता ना ! "

ती त्याला ओरडत होती. बोलता बोलता तिने सोफ्यावरच्या उश्या नीट मांडून ठेवल्या. टी पॉय वरचा न्यूज पेपर घडी करून ठेवला. बाजूच्या सेठी वरची बेडशीटची चुणी सरळ केली. एक बाहेर आलेलं टोक नीट आतल्या बाजूला खोचून ठेवलं. ती काम करत होती तरी देखील पंकज मोबाईल वर रिल बघत बसला होता.

" पंकज ss, चल उठ बर, खुप वेळ झाला मोबाईल बघत आहेस. जरा मला मदत कर. म्हणजे दोघांना आराम करता येईल."

" पच्च.. काय ग, आजची रविवारची सुट्टी एन्जॉय करु दे ना " तो वैतागत म्हणाला. पण बायकोचा चेहरा बघून गप बसला.

" हो कर ना, पण आधी मला थोडी मदत कर म्हणजे मला पण सुट्टी एन्जॉय करता येईल." ती हट्ट करत म्हणाली.

" बरं चल. पण त्या आधी मला एक कप चहा बनवून दे."
तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला लाडाने , विनंती करत म्हणाला. ती नुसतीच हसली.

" बर चल. देते चहा करून."

ते दोघ किचन मध्ये आले. तिने चहा साठी आधण ठेवलं. एका बाजूला परातीत कणीक काढून ठेवली. त्यात मधे विहीर केली. किंचित् मीठ भुरभुर वल. ड्रॉवर मधून चहा साखरेचे डबे काढून ओट्यावर ठेवले.

" अग पाणी जरा गरम होऊ दे. मग चहा पावडर घाल." पंकज. ती शांत उभी राहिली.

" आलं ठेचून घाल. किसून नको टाकू."

" अग साखर ss.. बास बास दोन चमचे घाल. साखरेचा पाक नाही करायचा. मला चहा हवा आहे."

" अग चहा पावडर जास्त घाल. मला स्ट्राँग चहा प्यायला आवडतो."

" अग दूध कमी घाल. मला दुधाळ चहा प्यायला नाही आवडत."

" अग साय नको घालू. चहा गाळल्या नंतर कप मध्ये साय घाल."

त्याच्या सूचने प्रमाणे तिने चहा बनवला. त्याला कप मधे गाळून दिला. त्यात थोडी मलई पण घातली. तो तिथेच उभा राहून चहा पित होता.

तिने चहाच भांड सिंक मध्ये घासायला ठेवलं. कणीक मळून ठेवली. हात धुताना चहाच भांड गाळण धुवून ठेवलं. तरी देखील पंकज चहा पित तिथेच उभा होता.
तिने कणीक मळून ठेवली. भाज्या चिरायला घेतल्या.

" अग , सिमला मिर्ची चे तुकडे छोटे कर."

" बटाटाच्या फोडी केल्या आहेस की , चौकोनी ठोकळे केलें आहेस."

" कोथिंबीरीची फक्त पानच घे. काड्या नको घेऊ. दाताखाली कचकच येते."

" या कोथिंबिरीच्या काड्या टाकून नको देऊ.वाटणं करतांना घाल. म्हणजे छान टेस्ट येते."

" अग, तेल कमी घाल, मला कोरेस्ट्रोल होईल."

" अग टोमॅटो कांदा ची प्युरी करताना किती साखर घालते. मला डायबेटिस नाही आहे."

" अग तिखट भाजी करायची आहे. किती साखर घातली तू ."

" अग मसाला कमी घाल. जास्त मसाला झाला की भाजी जळजळीत होते."

तिन वाटणं करण्यासाठी भाज्या थोडया परतून घेतल्या होत्या. तेव्हा पंकज चहा पित तिला सूचना देत होता.

" अग पोळी नको. पराठे कर."

भाज्या गार होईल पर्यन्त तिने पराठे बनवण्यासाठी लसूण कोथिंबीर कलोंजी एका ताटात काढून ठेवली.

" अग किती जाड लाटली आहे पोळी नाही करायची. जरा पातळ लाट. "

" गोल लाट ना,पराठा करायचा आहे. "

" किती पातळ लाटली आहे,पापड नाही करायचा."

" अग तेल कमी वापर. दिवाळी नाही आहे."

" अग किती मीठ भुरभूरल आहे, खारट होईल."

आता तिचा पेशन्स संपला होता. तिने त्याचा हात पकडला. त्याला घेउन बाहेर हॉल मध्ये आली. टी पॉय वरचा मोबाईल त्याच्या हातात देत त्याला म्हणली.

" तू इथ बसुन मोबाईल फोन बघ. मला काम उर कायची आहेत. दुपारी आराम करायचा आहे."

तो शांत चित्ताने मोबाईल बघत चहाचे घुटके घेत होता. त्याने त्याचे पाय टी पॉय वर पसरले. पाठीला टेकायला उशी घेतली. दुसरा पाय बाजूच्या उशीवर टेकवला.

त्याच्या त्या पसरलेल्या आवतारा कडे बघून ती म्हणाली,

" रविवारी माझा नवरा मला टेंम्पररी सासू वाटतो."

🎭 Series Post

View all