मागील भागात आपण पाहिले की मैत्रिणींसोबत असणाऱ्या सुमेधाला घरी जायला उशीर होतो आणि तिची रिक्षा मध्येच थांबते. आता बघू पुढे काय होते ते.
" रिक्षा का थांबवली?" घाबरलेल्या आवाजात सुमेधाने विचारले. काही न बोलता रिक्षावाल्याने करंगळी दाखवली. बेचैन झालेल्या सुमेधाने परत वॉटसॲप बघितले. विशालचा काहीच रिप्लाय दिसत नव्हता पण तो ऑनलाईन मात्र होता. अर्ध्याच अंतरावर घर होते. हे सगळं लवकर संपेल तर बरं होईल असं तिला वाटू लागलं होतं. अचानक तिच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला. तो रिक्षावाला लाल डोळ्यांनी सुमेधाकडे बघत होता. बहुतेक तो दारू पिऊन आला असावा. सुमेधा पाठी सरकू लागली. ती त्याचा प्रतिकार करू लागली. त्याने तिला खाली ढकलले. खालच्या दगडावर पडून तिच्या डोक्याला लागले. तो पुढे येणार तोच एक गाडी थांबण्याचा आवाज आला. सुमेधाने कसेबसे त्या गाडीकडे बघितले. गाडीतून विशाल बाहेर पडताना दिसला. तिच्या चेहर्यावर हसू आले आणि ती बेशुद्ध झाली.
रिक्षावाल्याची मात्र विशालला बघून घाबरगुंडी उडाली. तो पळू लागला. पण विशालने त्याला पकडून त्याला बेदम चोपले. त्यानंतर त्याने पोलिसांना फोन करून त्याला त्यांच्या ताब्यात दिले. नंतर तो बेशुद्ध झालेल्या सुमेधाकडे वळला. त्याने हलक्या हाताने तिला उचलून गाडीत ठेवले. तो घराकडे वळला. गाडी सुरू झाल्यावर गार हवेने सुमेधाला जाग आली होती. पण विशालच्या भितीने तिने डोळे गच्च मिटून घेतले. दोघे घरी पोहोचले. ती अजूनही बेशुद्ध आहे असे समजून विशालने तिला परत उचलून घेतले. तिला पलंगावर ठेवले. तिची जखम पुसायला औषध आणि कापूस आणले. हळूवार हाताने तो ती जखम पुसू लागला. त्याच्या राकट शरीरात असलेला तो हळूवारपणा बघून सुमेधाच्या डोळ्यातून पाणी आले.
"तू आलीस शुद्धीवर?" विशालने विचारले.
" थांब मी पाणी आणतो."
" थांब मी पाणी आणतो."
" तुम्ही चिडला नाहीत माझ्यावर?" सुमेधाने धीर करून त्याचा हात पकडत विचारले. विशालने तिच्या हाताकडे बघितले. उठत असलेला तो परत खाली बसला.
" चिडलो तर खूप होतो. पण मगाशी तुला खाली पडलेलं बघून शांत झालो."
" तो रिक्षावाला?"
" त्याला दिले पोलिसांच्या ताब्यात. मला खरंतर हे तुला कधीपासून सांगायचे होते पण आईबाबा म्हणाले की तू घाबरशील म्हणून सांगत नव्हतो. काही महिन्यांपूर्वीच तिथे एका मुलीवर बलात्कार झाला होता. म्हणून आम्ही तुला बाहेर एकटीला पाठवताना थोडं घाबरत होतो."
" एवढी काळजी होती तर काल घ्यायला का नाही आलात?" सुमेधाने चिडून हात सोडला.
" खूप यावंसं वाटत होतं." तो हात परत हातात घेत विशाल बोलला. "पण तुझ्या मैत्रिणींना काय वाटेल म्हणून नाही आलो."
" मग मला मेसेज तरी करायचा.. मी लोकेशन पाठवले नसते तर? माझे काही बरेवाईट झाले असते तर? त्या माणसाने काही काही... " सुमेधाच्या डोळ्यात पाणी आले.
" सॉरी. माझी चूक झाली.. मी पण चिडलो होतो. तू एकतर फोन उचलत नव्हतीस. पाठवले ते थेट लोकेशन. तरी लगेच निघालो.." विशाल तिला मिठीत घेत बोलला. "आणि तुला काहिही अगदी काहिही होऊ दिलं नसतं मी.."
" असं फक्त बोलतात.. माझ्या एका लांबच्या बहिणीवर एकाने बलात्कार केला, तर तिच्या नवर्याने तिलाच सोडले. तुम्हीपण सोडले असते ना.." इतके दिवस बोलायचे धाडस नसलेली सुमेधा आज बोलत होती.
" अग ए वेडाबाई.. तुला मी असा वाटतो का? मग ऐक.. तुझ्यावर बलात्कार जरी झाला असता ना तरी तुला असंच मिठीत धरून ठेवलं असतं.. अजिबात सोडलं नसतं.. झालं समाधान? मला तू खूप खूप हवी आहेस.. ते गाणं आहे बघ.. *तेरा साथ है तो, मुझे क्या कमी है..* अगदी तशी तुझी सोबत मला हवी आहे. समजलं." आपल्या नवर्याच्या अबोल प्रेमाची पहिल्यांदाच जाणिव झालेली सुमेधा त्याच्या मिठीत विरघळून गेली..
कथा कशी वाटली ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा