तेरा साथ हो तो
भाग १
परेश अंघोळ करून बाहेर आल्या आल्या बायकोला जोर जोरात हाक मारू लागला .. ती किचन मध्ये त्याच्याच डब्याचं बघत होती .. बिचारी पोळी लाटता लाटता बेडरूम मध्ये आली .
परेश " काय बावळट आहेस का तू ? या शर्ट वर हि पॅन्ट मॅच तरी होतेय का ? काहीपण कपडे काढून ठेवते ? "
नीलम " अहो , मग घ्या ना काढून कोणते हवेय ते ? उगाच माझ्या मागे का लागता ? "
परेश " काय झालंय तुझ्या चॉइसला मला काही कळत नाही .. वेंधळी कुठली .. जा पटकन चहा नाश्ता वाढून ठेव .. माझी मिटींग आहे १० ची मला निघावे लागेल. "
नीलम " हमम .. या खाली " नाक मुरडतच खाली गेली
परेश ओरडतच " बरं ऐक ना .. भाजीच्या डब्याला वेगळी पिशवी लाव ? तेल ओघळते.
नीलम " होय.."
परेश " आणि हे काय ? रुमाल पण नाही काढून ठेवलास ?
नीलम " बाहेर आहे रुमाल .. तुमच्या गाडीच्या चाव्या आहेत ना तिथे ठेवलाय. "
हि भांडणे नव्हती .. अगदी नॉर्मल रुटीन लाईफ जी कि आनंदात चालू होती .. दोघेही खुश होते .
दोघांच्या लग्नाला १० वर्ष होऊन गेलेली .. दोन्ही मुलं सकाळीच शाळेत गेली होती .. आणि आता नवऱ्याची तयारी झाली .. एकदा तो ऑफिसला गेला कि नीलमचा दिवस मोकळा ..
मस्त चाललंय आमचं असे काहीसे रुटीन छान सेट झालेलं त्यांचं
नाश्ता झाल्यावर परेश बॅग उचलून निघाला
नीलम ने एकदम गोड हसून त्याला बाय केलं ..
परेश " चल बाय .. निघतो ."
नीलम " निघतो नाही म्हणावं .. येतो म्हणा ."
परेश " तेच ते .. तू जाणार आहेस का ? तुझा नक्की आहे का ?"
नीलम " मला जायचंय ? पण मी अजूनही विचार करतेय ?"
परेश " नको ना जाऊस ? यार त्या रिकामं टेकड्या बायका आहेत .. ट्रिप बीप ला वेळ आहे का आपल्याकडे ? आणि एक दोन दिवस ठीक होतं ग ? आठ दिवस ? खूप होतील ग ?"

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा