भाग २
नीलम " परेश ! मी कधीच गेले नाही .. मला या ट्रिप ला जायचंच आहे .. मला पण चेंज आवश्यक आहे ."
परेश " आपण जाऊ ना वीकएंड ला .. नक्की.. आय प्रॉमिस .. आपण फॅमिली ट्रिप काढू .. तू सांगशील ते लोकेशन."
नीलम " बरं .. ते राहू द्या .. तुम्हांला उशीर होईल .. आणि मग उशीर झाला म्हणून माझ्या नावावर आरडा ओरड कराल. "
परेश " थिंक अबाउट इट. "
नीलम " ठीक आहे .. मी कॅन्सल करते प्लॅनिंग .. "
तशी परेशच्या चेहऱ्यावर मिलियन डॉलर वाली स्माईल आली .. फायनली तिला न जाण्यासाठी कन्व्हिन्स केलंच अशी विजयी मुद्रा घेऊन तो आनंदात ऑफिसला गेला .
नीलम ने थोडे किचन आवरलं आणि तिच्या किटीच्या ग्रुप वर मेसेज टाकून कळवून टाकले कि मी नेक्स्ट ट्रिप ला येईन
बऱ्याच मैत्रिणी तिला विचारत होत्या " का ? तू नेहमी असेच करतेस ? तुला कारणच लागतं ? "
असे आरोप ती वाचत होती .. आणि थोडी नाराज होत होती ..
नीलमने मोबाईल बाजूला ठेवला आणि सोफ्यावर मागे डोके टेकून विचार करू लागली
नीलम मनात "का मला परेश ला सांगता येत नाही कि मला जायचंय ? मला साधा हट्ट पण करता येत नाही.. मी कुठे अशी नेहमी जाते .. यावेळी लोकेशन माझ्या आवडीचे होते म्हणून मला जायचं होते . बाकीच्या बायका नाही का मॅनेज करतात .. त्यांचेही संसार आहेतच ना ? त्यांना मॅनेज होत मग माझे का होत नाही ?शी बाबा .. किती नावं ठेवतात मला मैत्रिणी ? जाऊ दे .. काय म्हणा त्या ट्रिप मध्ये एवढं वाढून ठेवलंय ? आठ दिवस म्हणजे खरंच जास्त आहेत ..
जाऊ दे .. मी बाजारात जाऊन येते .. वाणी सामान भरायचय , मुलांचा सगळा खाऊ संपलाय ."
परेश ऑफिसला गेला पण आज गडी खुश होता .. ती जाणार नाहीये याचा त्याला आंतरिक आनंद होता . का ते त्यालाही कळत नव्हतं .. पण ती जाणार नाहीये हे त्याला खूप आवडलं होतं .
बोल बोलता दिवस संपला .. सगळे घरी निघायाच्या तयारी होते .
तेवढयात मनीष आला .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा