आरोही खरतरं विक्षिप्तपणे वागत होती. दुसऱ्या दिवशी जेवत असताना आरोहीच्या आईचे म्हणजेच लक्ष्मीचे लक्ष तिच्या पायाकडे जाते. पायात पैंजण नसते.
लक्ष्मी : "आरोही, तुझे पैजण कुठे आहे?"
आरोहीला माहीत होते तिनेच पैंजण टाकून दिले आहे. उगाच चेहऱ्यावर खोटे भाव आणते , पायाकडे पाहत म्हणते
"मला माहीतच नाही. पैंजण कुठे पडले?"
"मला माहीतच नाही. पैंजण कुठे पडले?"
आई ,बाबा,वैशाली सगळे घरात शोधू लागतात.
आरोहीदेखील पैंजण शोधायचे नाटक करू लागते.
आरोहीदेखील पैंजण शोधायचे नाटक करू लागते.
लक्ष्मी :"किती वेंधळी आहेस गं आरोही. तुला माहीत नाही का पैंजण कधी पडले?"
लक्ष्मीच्या तोंडाचा पट्टा चालूच होता.
"आताच असे तर पुढे कसे होईल? आता किशोरला आणि त्याच्या घरच्यांना संगितले तर किती वाईट वाटेल. किशोरने तुला किती प्रेमाने भेट दिली होती. तुझं लग्न होणार आहे, लग्नानंतर किती जबाबदारी असते . हे असे वागलीस तर नाक कापशील आमचं. लोकं म्हणतील आईने पोरीला वळणच लावले नाही. सगळं खापर माझ्यावर फोडण्यात येईल."
आरोही:"आई,काय गं हरवले पैंजण. मुद्दामून मी हरवणार आहे का? पडलं असेल कुठेतरी."
बाबा आरोहीची बाजू सांभाळत म्हणतात.
"असू दे गं लक्ष्मी, तिने मुद्दाम थोडीच असे केले असणार. तिला किती बोलशील. आता माझी आरु महिनाभरच माझ्याजवळ आहे. जाईल तिच्या सासरी नांदायला.जाऊ दे आपण तंतोतंत डिजाईन असलेलं पैंजण बनवूयात"
लक्ष्मीने आता मोर्चा आरोहीच्या बाबांकडे वळवला.
"तुमचे नेहमीच असे असते, नेहमीच तिला पाठीशी घालता म्हणून ती अशी वागते. काय करायचे ते करा ."
वैशाली सर्वांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होती.
आई आणि बाबा लग्नाची खरेदी करण्यासाठी गेले होते. घरात वैशाली आणि आरोही दोघीच होत्या. आरोही मोबाईलमध्ये होती. वैशालीला आरोहीशी बोलायचे होते.
वैशाली आरोहीच्या जवळ जाते तसा आरोही फोन लगेच बाजूला ठेवते.
वैशालीला आरोहीवर संशय येतो.
"ताई, खरंच तुला माहीत नाही का पैंजण कुठे पडलं?" वैशाली.
त्रासिक चेहरा करून आरोही तिला म्हणते.
"एकदा सांगीतले ना वैशु. मला खरंच माहीत नाही. प्लिज पुन्हा तेच तेच विचारू नकोस."
"एकदा सांगीतले ना वैशु. मला खरंच माहीत नाही. प्लिज पुन्हा तेच तेच विचारू नकोस."
वैशालीला शंभर टक्के खात्री वाटत होती की आरोहीने स्वतःच पैंजण कुठेतरी टाकून दिले आहे.
वैशाली विषय बदलते.
"ताई तुला लग्नात काय घालायचे आहे ह्याचा विचार केला आहेस का?"
"मी काहीच विचार केला नाही." आरोही.
वैशालीला खरं तर आश्चर्य वाटत होते. लग्न महिन्यावर येऊन ठेपले तरी आरोही तिच्या खरेदी बाबत काहीच बोलत नव्हती.
वैशालीने पुन्हा विषय काढला.
"ताई, माझ्या ओळखीची एक पार्लरवाली आहे . छान मेकअप करते. इन्स्टाग्रामवर तिचे मिलियन फॉलोवर आहेत. तिचे तुला विडिओ दाखवते." असे म्हणत तिने फोन आरोहीच्या समोर धरला.
आरोही वैतागलेल्या स्वरात म्हणते "तुला जी पार्लरवाली हवी ती बघ."
वैशालीला खूप वाईट वाटतं.
ती आरोहीचा हात पकडते. डोळ्यात डोळे घालून तिला विचारते.
"ताई, काही प्रॉब्लेम आहे का ? मी तुला पाहते आहे तुझं लग्न ठरलं आहे तरी तुला उत्साह नाही. काल किशोरचे नाव काढले तसे तू एकदम चिडली. तुम्हा दोघांमध्ये काही भांडण झालं आहे का ?"
वैशाली उत्तराची वाट पाहत होती.
क्रमशः
क्रमशः
अश्विनी ओगले.
कसा वाटला भाग दोन नक्की सांगा.
कसा वाटला भाग दोन नक्की सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा