Login

धन्यवाद ईरा

धन्यवाद ईरा
काल माझी ईरावर लाईव्ह मुलाखत घेतली त्याबद्दल मी संजना मॅम, सुप्रिया मॅम, ईरा टीमचे आभार मानते. तसेच सर्व लेखक आणि वाचक यांनी माझी मुलाखत पाहून माझ्या आनंदात सहभागी झाले त्यांचे देखील मनःपूर्वक आभार ??

साहित्यिकांची मांदियाळी
देखिली ईरावरी
थाप कौतुकाची
लाभली ईरावरी
उत्तम लेखक वाचकांची टोळी
लेखनास साहाय्य करती

दर्जेदार साहित्य घडविण्यास
ईरा घेते कार्यशाळा
लेखकांचे मनोगत आणि
शुद्धलेखनाचा फळा
एखाद्या कुटुंबासारखे
व्यासपीठ साहित्यिकांचे

संजना मॅम कुटुंबप्रमुख
शोधती नवनवीन क्लुप्त्या
साहित्यिकांसाठी मेजवानी
भरवती वेगवेगळ्या स्पर्धा
आमची ईरा अशीच बहरुदे
आमच्या लेखणीला न्याय मिळूदे

सौ. नेहा उजाळे
ठाणे