ईराने आम्हा लेखकवर्गाला हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आमच्या लेखनाचे कौतुक केले. आमच्या कष्टाचे खरोखरचं चीज झाले.
ईरामुळे मला पहिल्यांदा सर्टिफिकेट आणि ट्रॉफी मिळाली तेव्हा मला जो आनंद झाला होता तो मी माझ्या शब्दांत सांगू शकत नाही. आतादेखील माझे नाव सर्वोत्कृष्ट लेखक म्हणून अकरा लेखकांमध्ये समाविष्ट केले त्याबद्दल मी ईराचे खूप खूप मनःपूर्वक आभार मानते. ईरामुळे मला माझ्या अस्तित्वाची ओळख झाली.
ईराचे उपक्रम स्तुत्य आहेत. लेखकांच्या कलागुणांची कदर केली जाते त्याबद्दल मी ईराच्या सर्वेसर्वा संजना मॅम आणि त्यांच्या टीमचे शतशः आभार मानते.
आमच्या टीम महेश यामधील सदस्यांनी देखील उत्तम कामगिरी केली आणि बक्षिसे मिळवली त्याबद्दल आमच्या टीममधील सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. तसेच इतर टीममधील सर्व विजेत्यांचे खरोखरचं मी कौतुक करते आणि सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करते.
मला अजून एका व्यक्तीचे कौतुक करावेसे वाटते ते म्हणजे आमचे टीमचे कॅप्टन महेश सर यांचे. त्यांच्या कोर्टाच्या कामात व्यस्त असूनदेखील त्यांनी त्यांचे कर्तव्य खूप छान हाताळले. आमच्या टीममध्ये त्यांनी कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. एकदम शांत राहून त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली. आमचे महेशसर खरोखरचं कॅप्टन कूल आहेत.
सौ. नेहा उजाळे
ठाणे
ठाणे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा