जुई न एकदा रमाबाईंना सांगितलं होतं की, तिला असं वाटतं की त्या थोड्याश्या उघड्या खिडकीतून कोणीतरी पाहत आहे,हे अइकल्यावर तर रमाबाईंच्या पाया खालची जमीनच सरकली, तेव्हा पासून त्यांना जुईची फारच काळजी वाटायची,त्या तिला तिथं उभं रहायला पण नाही म्हणायच्या. म्हणूनच आज त्यांना जुईचा फारच राग आला होता.
तसं तर इतक्या वर्षात त्या बंगल्या बद्दल काहीच वेडंवाकडं अईकलेलं न्हवतं. पण तरीही आता त्यांना भिती वाटायला लागली होती. कारण जुईचं त्या बंगल्या बद्दलचं आकर्षण दिवसेंदिवस वाढतच जात होतं.
आईला राग येईल आणि ती ओरडेल ह्या भितीनं जुई खूप दिवस त्या घरा बद्दल काहीच बोलली नाही. पण रोज मात्र नियमितपणे त्या बंगल्याकडे बघत उभी रहायची. हळूहळू पाच मिनिटाची वेळ वाढतं गेली आणि ती जरा जास्त वेळ तीथे उभी राहुन त्या जराश्या उघड्या खिडकी कडे टक लावून पाहु लागली. जवळपास जास्त घरं किंवा दुकानं वगैरे न्हवती म्हणुन कोणाचं तिच्या कडे फारसं लक्षं नसायचं. पण ह्या नादात मैत्रीणी मात्र तिनं गमावल्या. तिचा हा रोजचा उपक्रम त्यांना काही आवडायचा नाही. पण जुईला मात्र त्या घराकडे पाहिल्या शिवाय काही रहायचं नाही.
एक दिवस शाळेत जाताना त्या घराजवळ थांबुन पाहताना जुईच्या लक्षात आलं कि आज ती खिडकी थोडीशी जास्त उघडी आहे, म्हणजे अगदी तिची एक पट पूर्णपणे उघडी होती. असं कधीच झालं न्हवतं म्हणून तिला फार आश्चर्य वाटलं.
शाळेला वेळ होत होता म्हणून नाईलाजाने ती पळाली,पण शाळेत पूर्ण वेळ त्या आर्धया उघड्या खिडकी बद्दलच विचार करत बसली होती.कसी बसी एकदाची वेळ संपली आणि तीनं धाव घेतली.
आता पाहते तर काय ती खिडकी पूर्ण बंद होती, अगदी बाकीच्या खिडक्यां सारखीच घट्ट बंद.आधी जितकी थोडीशी होती, तेव्हढी पण उघडी न्हवती. हे कसं झालं? कारण बंगल्याचा तो लोखंडी गेट तसाच बंद होता म्हणजे कोणी आलं पण नसेल तिथे. विचार करत करत ती घराच्या दिशेने चालू लागली.
आता कोणाला सांगायचं सगळं, आईला तर अजिबातच सांगू नाही शकत. कोणी जवळची मैत्रीण पण न्हवती.
पूर्ण वेळ तोच तोच विचार करुन तीला कशी बशी झोप लागली. आता ती वाट पाहत होती ती सकाळची.
सकाळी रोजच्या पेक्षा लवकर उठून आणि पटापट आवरून ती शाळे साठी निघाली तीला प्रचंड उत्सुकता होती की आज ती खिडकी उघडी असेल का काल सारखी बंद. जशी जशी ती त्या बंगल्या जवळ जात गेली,तिची उत्सुकता पण वाढतच गेली.
आता ती त्या बंगल्याच्या अगदी समोर उभी होती, आणि पहाते तर काय कि ती खिडकी पूर्ण उघडी होती. काल शाळेतुन येताना तिनं अगदी लक्ष देऊन पाहिले होते की ती खिडकी अगदी घट्ट बंद होती. तिनं गेटवर लागलेलं मोठ्ठ कुलूप पण चाचपून पाहिलं तर धूळीनं माखलेलं ते कुलूप जसं च्या तसं होतं, कोणी ते उघडून आत गेल्याचं कोणतंच चिन्ह त्यावर न्हवतं.
आता तिनं विचार केला कि आपण शाळेतून येताना पुन्हा लक्ष देऊन पाहुया आणि ती त्या खिडकी कडे पाहतच शाळेत निघाली.
दुपारी शाळा सुटली आणि ती सायकल घेऊन नुसती धावतच सुटली. आता पाहते तर काय सकाळी साताड उघडी ती खिडकी आता अगदी घट्ट बंद होती. दोन तीन दिवस हा असाच खेळ चालत राहिला. तिनं विचार केला की आपण एकदा त्या बंगल्याच्या माघे जाऊन पाहुया, कदाचित तिथे पण गेट असेल आणि कोणीतरी त्यातून आत बाहेर करत असेल.
दुसऱ्या दिवशी ती खूप लवकर तैय्यार झाली, आईला मैत्रीणीशी काही काम आहे ही थाप मारुन घरातून निघाली. रागवल्या नंतर बरयाच दिवसांनी जुईनं रमाबाईं समोर त्या बंगल्याच्या संदर्भात विषय काढला नव्हता, म्हणून त्यांना वाटायचं की जुई आता विसरली असणार. त्यांनी ही सहज तिला मैत्रीणीला भेटायची परवानगी देऊन टाकली होती.
जुई बंगल्याच्या मागच्या बाजूला गेली आणि पहाते तर काय तीथे एकही गेट किंवा दार वगेरे न्हवतं, नुसत्या उंच उंच भिंती होत्या.भिंतीही इत्क्या उंच होत्या कि त्यावर चढून कोणालाही आत बाहेर करणं शक्य नव्हतं.
आता मात्र जुईची उत्सुकता अगदी चरण सीमेवर आली होती. आश्चर्य म्हणजे तिच्या मनात कणभरही भिती न्हवती.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा