Login

तो बंगला भाग ४

A story about paranormal activity.

जुई न खुप मन लावुन अभ्यास केला आणि छान पेपर्स दिले. शेवटच्या परीक्षेनंतर शाळेतुन येताना ती त्या बंगल्या जवळ थांबली. दिवसा उघडी राहणारी ती खिडकी आज ही पूर्ण उघडी होती. आज तिथे तिला एक आकृती स्पष्टं जाणवली, कोणी तरी तिला हाताच्या इशार्यानं बोलवत होतं.बागेतली मुर्ती पण तिच्या कडे बघून हसत आहे असं जुईला वाटलं. तिच्या चेहऱ्यावर रोजच्या सारख उदास पण नाही जाणवलं आज, जणु खुप दिवसांनी तिला पाहून खुश होत होती. लोखंडी मेनगेट मात्र तसाच बंद होता.
जुई संध्याकाळी दिलीप मामा कडे गेली. दिलिपजींना माहीत होतं कि जुई आज नक्की येणार आहे,ते तिची वाट पाहतच होते. जुईनं त्यांना दुपारी घडलेलं सगळं सांगुन टाकलं.
"मामा, तुम्हाला काही माहिती मिळाली त्या घरा बद्दल? कोणाचा आहे तो बंगला,का इतक्या वर्षांनी बंद आहे, काय घडल असेल तिथे,कोण त्याचे टेक्स वगेरे भरतं........
"अगं हो हो ,एक सात किती सारें प्रश्न.....सगळं सांगणार आहे मी तुला,बस आधी आरामात."
"सांगाना मामा लवकर, तुम्हाला माहीत आहे मी किती मुश्किलीने हे दिवस काढले आहे".
"हो कळतंय मला, हे बघ मला जमेल तितकी माहिती मी काढली आहे,पण खुप कमी लोकांना त्या घरा विषयी माहिती आहे.मला जी काही माहिती  मिळाली आहे त्यानुसार तो बंगला साठ वर्षां पासून असाच बंद आहे. तो एका मोठ्या साहुकाराचा बंगला होता.त्याचे आई ,वडील, पत्नि आणि दोन मुलं,लहान भाऊ,त्याची बायको आणि त्यांचा मुलगा असे सगळे मिळून नऊ जण रहात होते तिथे. साहुकाराला दोन मुलं होती,मोठा मुलगा जो लंडन ला शिक्षण घेत होता आणि एक मुलगी जी गावातच शाळेत बारावीला होती. त्याच्या भावालाही एक मुलगा होता.
              एक दिवस साहुकाराच्या मुलीनं आपल्या काकाला आणि मोठ्या भावाला सोडून घरातल्या सगळ्यांना, तिच्या बाबांच्याच शिकारी बंदुकीने ठार केलं आणि तिथून पळून गेली. काका काही कामानिमित्त बाहेरगावी गेला होता आणि मोठा भाऊ लंडन ला होता म्हणून वाचला. मग साहुकाराचा भाऊ, आणि मुलगा, सगळे सोपस्कार पार पाडून जे इथुन गेले ते कधीच परत आले नाही.त्याच्या मुलीला सुद्धा परत कोणी पाहिलं नव्हतं गावात.
               "मामा ही तर फार मोठी गोष्ट आहे, पण कुठे ही वाच्यता कशी नाही आहे, कोणाला ही काही कौतुहल किंवा उत्सुकता नसेल का ह्या बंगल्या बद्दल,त्या मुली बद्दल..
"साठ वर्षां पूर्वीची गोष्ट आहे ही बाळा, तेव्हा झाला पण असेल खुप बोभाटा,पण हळुहळू सगळे सगळं विसरतात आणि आयुष्यात पुढे चालत जातात, शिवाय तिथल्या बद्दल लोकांना कधीच काही वेडेवाकडे अनुभव नाही आलें आहे,म्हणून कोणालाच काही घेणं देणं नाही आहे त्या घरा बद्दल.
बरं आता मुद्याचं बोलुयात हे बघ, जसं मी तुला सांगितलं होतं की काही अतृप्त आत्मा असतात ज्यांचा मृत्यू अप्राकृतिक रित्या झालेला असतो, म्हणजे त्यांना कोणी तरी मारलेलं असतं किंवा त्यांनी स्वताच आपला जीव घेतलेला असतो,त्या आत्मा मुक्त होण्यासाठी धडपडत असतात. त्या साठी त्यांना कोणाच्या तरी आधाराची गरज असते. ते सतत अश्या व्यक्तीच्या शोधात असतात जो त्यांना मदत करु शकतो.कारण आत्मा असल्या तरी, त्यांच्या शक्तीला पण काही मर्यादा असतात,त्यांचे पण काही नियम असतात त्यांच्या पलीकडे जाऊन ते सुद्धा काही करु नाही शकत.मी कॉलेज मध्ये असताना मला ही असाच एक अनुभव आलेला आहे, म्हणुन मी तुला साथ देण्याचं ठरवलं आहे.

तिथे काय आणि कोण आहे, त्यांना तुझ्याशी काही काम आहे का हे आपल्याला त्या बंगल्याच्या आत जाऊनच कळेल आणि आपण त्या बंगल्याच्या आत समोरच्या गेट मधून कधीच जाऊ शकत नाही, हे ही खरंय.आपल्याला दुसरा मार्ग शोधावा लागणार आहे.

जुनें लोकं जेव्हा मोठं मोठे घरं बांधायचे तेव्हा त्याचा एक चोर दरवाजा नक्कीच ठेवायचे, जो आपात्कालीन स्थितीत घरच्यांच्या कामात यायचा,त्यावर एक खूण असते.तोच चोर दरवाजा आपल्याला शोधायचा आहे आधी. तर उद्या दुपारी तू कॉलेज जवळ ये आपण जाऊ तिथे. हे बघ जुई आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी कि रस्ता सापडला तरी मी तुझ्या सोबत आत  येऊ शकतो का नाही हे त्या आत्मा वर निर्भर आहे,जर तिला फक्त तूलाच आत येऊ द्यायचं असेल तर ती मला अडवेल हे नक्की,पण तू घाबरायचंं नाही, तुला ती काहीच करणार नाही.माझ्या काही सूचना फक्त तेवढ्या लक्षात ठेव, तुला काहीच होणार नाही.मी बाहेर तूझी वाट पाहिन.
       दुसर्या दिवशी ठरलेल्या वेळे प्रमाणे जुई मामांना कॉलेज मध्ये भेटली, आणि ते दोघं त्या बंगल्याकडे जायला निघाले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने रस्ता अगदी सुनसान होता म्हणून ते आपलं काम आरामात करु शकत होते. खुप जास्त त्यांना मेहनतही  करावी नाही लागली आणि बंगल्याच्या मागच्या बाजूला, मोठ्या भिंती वर एका जागेवर क्रास कोरलेलं होतं, मामांना कळालं की तो नक्कीच चोर दरवाजा असणार . त्यांनी तिथे जोर्यात हात मारुन पाहिला तर खरोखरच ते एका दारा प्रमाणे सरकलं आणि चमत्कारी रित्या उघडलं. जुई पटकन आत शिरली पण मामा आत शिरायच्या आधीच ते दार बंद झालं. आता जुई आत आणि मामा बाहेर होते.
क्रमशः
         

0

🎭 Series Post

View all