Login

त्या आठवणी भाग -5

Freshers party starts with her name and Vivan is happy with that ...

याआधी -

विवानला आता रूममध्ये राहून खूप दिवस झाले होते . उमेश, जयदीप , अक्षय आणि दत्ता हे सुद्धा रूममध्ये राहायला आलेले होते . कॉलेज चालू असताना त्यांचे सिनियर येऊन फ्रेशर्स पार्टी संदर्भात सूचना देतात . त्या पार्टीसंदर्भात खूप चर्चा वर्गामध्ये होऊ लागली होती . त्या पार्टीतली खेळ मात्र गुपित ठेवण्यात आलेली होती . असेच रात्री गप्पा मारत असताना अचानक उमेश वर्गातील एका मुलीच नाव सांगून इंस्टाग्रामवर शोधायला सांगतो . 

-------------------------------------------------------------

यापुढे -

उमेश -" तुम्हाला समृद्धी चांडवले माहिती का रे ?"

विवान -" कोण ?"

उमेश परत म्हणाला .

उमेश -" समृद्धी चांडवले .."

दत्ता -" माहिती नाही रे ... कोण आहे ती ?"

उमेश -" अरे आपल्या वर्गातली आहे . इन्स्टावर सर्च करा ."

      तो अस म्हणताच विवान सर्च करू लागला . सर्च करताच काही अकाउंट दिसत होते . तो प्रत्येक अकाउंटच प्रोफाइल चेक करू लागला . त्यामध्ये त्याला वर्गात दिसणाऱ्या चेहऱ्यांपैकी एका मुलीच चेहरा अनुभवला . ती वर्गात शेवटच्या बाकावर बसणारी होती . 

विवान -" हि तर मागे बसते ना ?"

विवान प्रश्न उपस्थित केला .

उमेश -" होय ... सापडलं का अकाउंट ?"

विवान -" होय ..."

      विवान परत मोबाइलमध्ये डोकावला . इंस्टाग्रामवर तिला फॉलो करायचं का नाही ? हा प्रश्न त्याच्या मनात शंका उत्पन्न करत होती  . शेवटी कॉलेजच्या कामात मदत लागेल म्हणून तो फॉलोचा बटण दाबला . त्यानंतर तो स्नेहलसोबत चॅट करू लागला . त्याची स्नेहलसोबत एक वेगळीच भावनिक बंधने होती . तो प्रत्येक घडलेली घटना तिला सांगत असे . 

      असेच त्यांचे दिवस जाऊ लागले . सकाळी उठणे , तयार होणे , खानावळीला जाणे , तिथून कॉलेजला जाणे , कॉलेज संपल्यावर टपरीवर जाणे , चहा घेत गप्पा मारणे , परत रूमवर येताना एकमेकांचे टांग खेचणे , रूममध्ये आल्यावर परत फ्रेश होणे , रात्री जेवून आल्यावर गप्पा मारत बसणे . संध्याकाळच्या वेळी तर खोडकरपणा जास्त व्हायचा . संध्याकाळच्या वेळी जर कोणी टॉयलेट वापरत असेल तर हि त्यांना सुवर्ण संधी होती . कोणीतरी बाहेरील लाईटचा बटण बंद करत असत . टॉयलेटमध्ये जो असणार त्याची मात्र पंचायत होणार . आतून शिव्या देऊन तो थकत असे आणि त्या विषयाला धरून बाकी सगळे हसत बसणार . संध्याकाळच्या वेळी गोंधळ मात्र खूप होणार . 

     अखेर तो दिवस उजाडला , ज्याची वाट विवान पाहत होता . फ्रेशर्स पार्टीच्या वेळी या सर्वांना लवकर उठाव लागणार होत . दत्ता रोजच्या सारखं अजून झोपलेला होता . आज सकाळी लवकरच कॉलेजला जाव लागणार होत . सर्वात आधी विवान उठला . तसही तो दररोज लवकर उठत असे . त्याच्यासाठी हे काय नवीन नव्हत . फ्रेशर्स पार्टी म्हणल्यावर अगदी नवीन कपडे घालावं लागणार होत . पाच जणांना तयार होण्यासाठी वेळ तर  लागणार होती खरी ..  . बाथरूम एक असल्याने अजून जरा वेळ लागणार होती . पण दत्ता अजून झोपलेला होता . त्याला बघून उमेश जरा चिडून बोलला .

उमेश -" दत्ता .... उठ कि लगा .."

दत्ता त्या ओढलेल्या चादर मधून फक्त ," हम्म " म्हणाला .

उमेश -" उठ कि माकडा ... आज तर उठ लेकाच्या ..."

दत्ता -" हा .."

     एवढंच त्याच्या तोंडून निघालं . अक्षय नुकताच अंघोळ आटपून आलेला होता . दत्ताला झोपलेल पाहताच तो त्याच्याकडून चादर जोरात ओढून घेतला . 

अक्षय -" दत्ता ... ***** उठ कि .."

अखेर त्याला साखर झोपेतून उठाव लागल . 

दत्ता -" किती मस्त स्वप्न पाहत होतो माहिती का ?"

विवान -" काय पाहत होता ?"

दत्ता -" विसरलो ..."

अस म्हणताच विवान किंचितसा हसला आणि त्याला म्हणाला .

विवान -" उठ आता .. आपल्याला उशीर होईल ."

दत्ता -" सगळे तयार झाले काय ?"

विवान -" जयदीप गेलाय बाथरूमला , येईल थोड्यावेळात .."

अंथरून व्यवस्थित करण्यासाठी उठला . 

दत्ता -" आज कपडे काय घालायचं रे ?"

विवान -" तू असच ये ."

यावरून थोडी हश्या पिकल . 

दत्ता -" आज मुली साडीवर येणार ."

अक्षय -" मग काय झाल ?"

दत्ता -" आज मुलांचे डोळे सुखावणार ..."

अक्षय -" शहाणा आहेस जा . अंघोळीला जा पहिला ..."

   त्यावरून तो फ्रेश होण्यासाठी बाहेर पडला . थोड्यावेळात वेळात सगळे तयार झाले . बाहेर पडण्याअगोदर केस विंचरणे वैगैरे आटपत होते . 

दत्ता -" अक्ष्या ... डियो काढ रे . आज मुली येणार आहेत ."

अक्षय दियो देत म्हणाला .

अक्षय -" तुला बघण्यासाठी येणार नाहीयेत ."

दत्ता -" आल्यावर मला बघाव म्हणून दे .." 

     हळू हळू सगळे त्या डियोनी अंघोळ केले . सगळे तयार झाले आणि रूममधून निघाले . रोजच्या सारखेच गप्पा मारत कॉलेजच्या दिशेनी निघाले . कॉलेजमध्ये पोहचताच ते पहिल्यांदा गणित विभागाकडे गेले . विभागामध्ये सिनियरचेच मुले होते , अजून त्यांच्या वर्गातले मुले अजून आलेले नव्हते . विभागातले मूळ त्यांना हॉलमध्ये जायला सांगितले . कॉलेजमध्ये वेलणकर नावाचं मोठ हॉल होत . त्यात कॉलेजचे सगळे मोठे कार्यक्रम होत असत . हे सगळे त्या हॉलजवळ गेले असता त्यांना कळाल कि चहाची आणि त्यासोबत बिस्कीटची व्यवस्था देखील तिथे झालेली होती . या सर्वांना सकाळी चहाची गरज असतेच , त्यामुळे वेळ न घालवता चहा पिण्यासाठी गेले .

    चहाची वाटप काही सिनियरचे मुलंच करत होते .हे पाची जण चहाच आस्वाद घेत उभे होते . थोड्या वेळाने हळूहळू मुलंमुली येऊ लागले . सगळेजण नटून आलेले होते . मुलीतर अगदी लग्नात तयार झाल्यासारखी आल्या होत्या . त्यांच्यावरून नजर हटतच नव्हती . एकापेक्षा एकजण नटून आलेल्या होत्या . त्यांनासुद्धा चहा देण्यात आल . काहीवेळाने मुलंमुली हॉल मध्ये प्रवेश करू लागले . जसे ते प्रवेश केले , तेंव्हा सगळे सिनियर मुलंमुली टाळ्या वाजवू लागले . फ्रेशर्स पार्टीसाठी सगळ्या नवीन वर्षाच्या मुलांना स्वागत करू लागले . आपापले जागा पकडल्यावर कार्यक्रमाला सुरुवात झाली . सिनियरचे अँकर स्वागतासाठी काही ओळी म्हणल्या . विभागाचे प्रमुख आणि मुख्यद्यापकांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन संपन्न झाल्यावर खऱ्या कार्यक्रमाला सुरुवात झाली . सगळे नवीन चेहरे या कार्यक्रमासाठी उत्सुक होते . सर्वात आधी ओळख करून घेण्याच कार्यक्रम सुरु झालं . त्यात सगळ्या फ्रेश मुलांचं नाव घेण्यात येत होत आणि त्यांना सिनियर मधले एकजण एक फ्रेंडशिप बँड  आणि चॉकलेट देत होते . अशीच प्रत्येक जणांची नावे पुकारण्यात येत होत . मुलेतर प्रत्येक मुलींचे नाव जाणून घेण्यात उत्सुक होते . कोणी मुलगी स्टेजवर आली कि त्याच नाव ऐकण्यासाठी मुलांचे कान उभे होत होते . 

      अखेर विवानचा नंबर आला . तो स्टेजवर गेला . सिनियर असलेली एक मुलगी त्याच्यासाठी बँड आणि चॉकलेट देऊ केली . तो घेऊन परत आला . त्याला फक्त एका मुलीच नाव जाणून घ्यायची इच्छा होती . 

     शेवटी एका मुलीच नाव घेण्यात आल . विवान वाट पाहत असलेली मुलगी स्टेजवर चढू लागली . ती अगदी सुंदर दिसत होती . तिच्या चेहऱ्यावर स्माईल खूप शोभत होती . स्टेजवर चढत असताना विवानची नजर तिच्यावरून हटतच नव्हती . बँड आणि चॉकलेट घेतल्यावर तिच्या ओठाच्या हालचालींवरही त्याच लक्ष होत . ती ' thank you ' म्हणत होती हे त्याला कळाल. खाली येत असताना सुद्धा त्याच लक्ष तिच्यावर निरखून होती . बघत असताना तो अचानक उभारला . दत्ता त्याच्या बाजूलाच बसला होता .

दत्ता -" काय झालं रे ? उभा का झालास ?"

त्याच्या त्या प्रश्नाने विवान जागा झाला . ' काही नाही ' म्हणत तो खाली बसला . अखेर त्याला तीच नाव कळाल , यावरच तो समाधानी होता .

*********************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच ... माहिती आहे हा भाग लहान आहे आणि उशिरा आलेला आहे , पण माझी परीक्षा जवळ आल्याने मला लिहायला वेळ कमी भेटत आहे . प्लिज समझून घ्या .. हा भाग कस वाटलं नक्की कळवा ... शेअर करा .. आणि मला फॉलो करा .. धन्यवाद ...