Login

त्या आठवणी भाग -4

freshers party of first will be held in some days ..

या आधी -

     विवान एका अनोळखी शहरात पोस्ट ग्रॅजुएशन करण्यासाठी आला होता . थोडी फार ओळखीपासून उमेश , अक्षय , जयदीप , दत्ता आणि हा असे पाचजण मिळून रूममध्ये राहण्यासाठी तयार झाले होते . पहिल्या दिवशी फक्त विवानच राहण्यासाठी आलेला होता . दत्ता त्याच्या पुढच्या दिवशी रूममध्ये राहण्यासाठी येणार होता . तूर्तास विवान एकटाच रूममध्ये होता . रात्री जेवत असताना स्नेहल नावाची त्याच्याच मैत्रिणीकडून त्याला मेसेज येतो . मेसेज बघून तो तिला फ़ोन करतो . या दोघांमध्ये खूपवेळ गप्पा चालू होती . मागच्या आठवणी काढत दोघे हरवून गेले होते . त्याच आठवणी आठवत विवान रात्री झोपी गेला .

-------------------------------------------------------------

यापुढे -

     विवानला रूमध्ये राहून खूप दिवस झाले होते . दत्ता , उमेश आणि अक्षय यांनी सुद्धा रूममध्ये राहण्यासाठी आलेले होते . उमेश तर बेड , कॉम्पुटर , टेबल, खुर्ची सगळी सुविधा रूममध्ये आणलेला होता . जयदीपला मात्र बाजूच्या रूममध्ये राहू लागला होता . कारण , एकाच रूममध्ये पाचजण राहणं अवघड होणार होत . नाईलाज म्हणून त्याला बाजूच्या रूममध्ये राहाव लागल . बाजूची रूम आणि विवान राहत असलेला रूम एका दारेने जोडलेली होती . त्यामुळे जयदीप विवानच्या रूममध्ये येऊन गप्पा मारू शकत होता .

कॉलेज 12 वाजता सुरु होत होती . त्यामुळे रूममध्ये सगळे निवांत तयार होत होते आणि खानावळही कॉलेजजवळ असल्याने 11वाजता ते सगळे रूममधून निघत असत . खाणावळमध्ये त्यांचे सिनिअरसुद्धा जेवायला येत होते . त्यांच्याशी सुद्धा ओळख झालेली होती . ओळख इथं पर्यंत झालेली होती कि ते त्यांच्याशी मोकळ्या मनानी  गप्पा मारत होते  .खाणावळमध्ये जेवून तिथूनच कॉलेजला जात असत .अशीच दिनचर्या त्यांची चालली होती .

     नुकताच पहिला लेक्चर संपलेला होता . सगळे त्या मधल्या वेळात गप्पा मारत होते . विवानच्या बाजूला दत्ता बसत होता .

विवान -" मला कळत नाही .. एवढे मुली दररोज एवढ्या लांबून कसे काय येतात ?"

दत्ता हसत म्हणाला .

दत्ता -" घरी धुणीभांडी लावतात म्हणून येतात ..."

हे वाक्य ऐकताच विवानही हसायला लागला . तेवढ्यात वर्गात काही मुलंमुली आले . त्यांना बघताच समजल कि हे सगळे सिनियर आहेत . समोर येताच त्यातला एकजण बोलू लागला . विवान या सिनिअरसोबत ओळख ठेवून होता . त्यामुळे काहीतरी नवीन नक्कीच आहे , अस त्याला वाटू लागल . त्यात एक जण पूढे येऊन म्हणाला .

तो -" तुमच कॉलेज सुरु होऊन 15 दिवस झाले . तर तुमच्या स्वागतासाठी आम्ही म्हणजे एम .एस सी सेकंड इयरचे विद्यार्थी तुम्हाला फ्रेशर्स पार्टी देणार आहोत . तरी तुम्ही सगळे उपस्थित राहावे ."

     यानंतर त्यांच्यासोबत आलेल्या मुलींपैकी एकीने पुढे येऊन म्हणाली .

ती -" त्यादिवशीच जेवण आमच्याकडून असणार आहे . त्यामुळे कोणीही त्यादिवशी टिफिन आणू नका . तुम्ही फक्त मस्त नटून या .."

तो -"  पार्टीमध्ये खुपसारे गेम्स आहेत . त्यामुळे सगळे नक्की या .. आणि हा त्या पार्टीसाठी आम्हाला तुमचे नाव पाहिजे होते . त्यामुळे या कागदावर लिहून द्या ."

     अस म्हणून त्यांनी एक कागद मुलीकडे दिले आणि एक कागद मुलांकडे दिले आणि ते सगळे बाहेर गेले . ते जाताच वर्गात चर्चा सुरु झाली . त्यात मुलींचा जास्त आवाज होता . साहजिकच संख्या मुलींची जास्त होती , म्हणून चर्चा तर होणारच . मुलांमध्ये तेवढी काय उत्सुकता नव्हती . त्यांच्यासाठी ते दिवस मज्जासाठी आणि लेक्चर बंक करण्यासाठी होणार होती .

    सगळे लेक्चर संपले आणि चहाची वेळही झालेली होती . हे नेहमी चहा कॅन्टीनमधून न पीता बाहेर जाऊन पित असत . कॉलेजसमोरील हायवेच्या उताऱ्याला एक मंजुळाचा गाडा होती . तिथली पोहे आणि चहा खूपच प्रसिद्ध होती . कॉलेजचे मुलंमुली इथूनच चहाचा आणि पोहेचा आस्वाद घेत असत . तिथूनच विवान आणि बाकी सगळे चहा घेत असत . 

     हे सगळे चहा पिण्यासाठी त्या गाड्यावर गेले . चहा घेत असताना तिथे त्यांचे सिनियर ही चहा पिण्यासाठी आले . ते सुद्धा चहा घेऊन यांच्यासोबत गप्पा मारू लागले . इथले तिथले गप्पा चालू होत्या .

जयदीप -" अहो सिनियर फ्रेशर्स पार्टीमध्ये काय स्पेसिअल आहे ?"

त्याच सिनिअरपैकी एकाने म्हणाला . 

सिनियर -" जेवण आहे कि तुम्हाला ... अजून काय पाहिजे ?"

जयदीप -" असं नाही ... गेम्स काय आहेत ?"

सिनियर -" आहेत कि ..."

उमेश -" मग सांगा कि ..."

सिनियर -" ते तर सीक्रेट आहे . ते कस सांगता येईल ?"

विवान -" म्हणजे सरप्राईझ आहे तर ...."

सिनियर -" हो तर ..."

    संध्याकाळ होत आलेली होती . अखेरचा निरोप देऊन हे सगळे रूमकडे निघाले . रूममध्ये पोहचताच सगळे आधी फ्रेश झाले . जस सगळे करतात तसे सगळे मोबाइल घेऊन बसले . कोणी फोनवर बोलण्यात बिझी , कोणी मोबाइलला मध्ये विडिओ बघण्यात बिझी तर कोणी मोबाइलवर चॅटिंग मध्ये बिझी होते . विवान मात्र स्नेहलसोबत चॅटिंग करत होता . 

 स्नेहल -" अच्छा ... म्हणजे फ्रेशर्स पार्टी होणार आहे तर ..."

विवान -" हो .... "

स्नेहल -" मग ?"

विवान -" मग काय ?"

स्नेहल -" तू एक्ससायटेड नाहीस का ?"

विवान -" आहे पण नाही पण ..."

स्नेहल -" म्हणजे ?"

विवान -" म्हणजे पार्टीत काय होईल माहिती नाही . पण एक मात्र आहे . मला त्या मुलीबद्दल  नक्की कळेल ."

स्नेहल -" कळल्यानंतर काय करणार ?"

विवान -" काही नाही ."

स्नेहल -" मग कळून काय फायदा ?"

विवान -" काही नाही ..."

    तेवढ्यात दत्ता  विवानला म्हणाला .

दत्ता -" विव्या ... जेवायला जायचं नाही का ?"

तो मोबाइलमधून डोक काढत म्हणाला .

विवान -" जायचं कि चला ..."

जाण्याआधी तो स्नेहलला मेसेज केला .

विवान -" जेवायला जायचं आहे . तुझ्याशी नंतर बोलतो ."

स्नेहल -" ठीक आहे ..."

     सगळे तयार होऊन खानावळीच्या दिशेने निघाले . खानावळ कॉलेजच्या समोर असल्याने यांना कॉलेजमधूनच जावं लागत असत . कारण दुसरा रस्त्यानी जायला वेळ लागत होता . कॉलेजच्या मागे एक छोटस स्टेशन होत . तिथे फक्त लोकल रेल्वे थांबत होती . हे सगळे रात्री तिथूनच जाई . रेल्वे रुळाच्या नंतर कॉलेजमध्ये जात असत . तिथून दुसऱ्या गेटने खाणावळला जात असत .

      जेवत असताना यांचे गप्पा जरा जास्तच असत . कधी भाजीविषयी , कधी चपातीविषयी , तर कधी भात वरून तक्रार होत असत . काहीवेळाने सगळ्यांचं जेवण झाल्यावर रूमकडे निघाले .

    रूममध्ये पोहचताच सगळे अंथरून घालू लागले . अंथरून घातल तरी ते लवकर झोपत नसत . रात्री तर ते अजून दंगा करत . एकमेकांची टांग खेचणे . कोणीतरी जोक करणे , त्यावर सगळे हसणे आणि मुलांचे जोक खूप वेगळेच असतात , जे फक्त मुलातच होत असतात . कधीतरी असा विषय निघायचा त्यावर डिस्कशन करताना रात्रीचे 12 वाजायचे . त्यात उमेश जो वयाने मोठा होता , तो मात्र या डिस्कशनला वेगळीच दिशा द्यायचा .

       काहीवेळा करता हे सगळे शांत झाले . तेवढ्यात उमेश म्हणाला .

उमेश -" तुम्हाला समृद्धी चांडवले माहिती का रे ?"

विवान -" कोण ?"

उमेश परत म्हणाला .

उमेश -" समृद्धी चांडवले .."

दत्ता  -" माहिती नाही रे ... कोण आहे ती ?"

उमेश -" अरे आपल्या वर्गातली आहे . इन्स्टावर सर्च करा ."

तो अस म्हणताच विवान सर्च करू लागला .

*****************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच ... हा भाग कसा वाटला नक्की कळवा ... शेअर करा ... आज तुमची साथीची मला खूप गरज आहे ... धन्यवाद