चांगल्या सोबतीची किमया
पदोपदी वाटते सदा खास
समाधानाने दोघेही खाती
मिळून विश्वासाचा घास
पदोपदी वाटते सदा खास
समाधानाने दोघेही खाती
मिळून विश्वासाचा घास
प्रश्न अन् उत्तरे देण्याची
समजा आली कधी वेळ
चर्चा आणि विश्लेषणाने
एकमत शेवटी घाले मेळ
समजा आली कधी वेळ
चर्चा आणि विश्लेषणाने
एकमत शेवटी घाले मेळ
अर्थ साथीचा गहिरा
त्याला सुधारण्याचा वाव
गैरसमजाने नको घालूस
निर्मळ नात्यावर घाव
त्याला सुधारण्याचा वाव
गैरसमजाने नको घालूस
निर्मळ नात्यावर घाव
अहंकाराचा परिणाम वाईट
एक पाऊल मागे घ्यावे
न सुटता गुंता कधी
त्या क्षणास सोडून द्यावे
एक पाऊल मागे घ्यावे
न सुटता गुंता कधी
त्या क्षणास सोडून द्यावे
© विद्या कुंभार
सदर कवितेचे हक्क लेखिकेकडे आहेत.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा